आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एमपीथ्रीची मजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वांना परिचयाचा असलेला हा एमपीथ्री हा शब्द खरं म्हणजे संगीत/गाणे साठविण्याचा फॉरमॅट आहे. याद्वारे आपल्याला अत्यंत उच्च प्रतीचा ध्वनी मिळतो तसेच विकत घेऊन ऐकता पण येतो. एमपीथ्रीचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला या फाइल्स छोट्या/कॉम्प्रेस करता येतात. त्यामुळे त्या वापरायला सोप्या आणि लोकप्रिय आहेत.


एमपीथ्री कसे काम करते ?
गाण्यात/संगीतात असलेले बारीक आवाज, जे आपले कान ऐकू शकत नाही ते एमपीथ्री सहजपणे कॉम्प्रेस करते. त्याचबरोबर गणिती अल्गॉरिदम वापरून आणखीन कमी करते. त्याचमुळे मूळ गाण्यापेक्षा एमपीथ्री ट्रॅक/गाणे 11 पट कमी/छोटे असते. म्हणूनच 50 एमबीचा ट्रॅक फक्त 4 एमबी साइजचा होतो. एका ऑडियो सीडीमध्ये 100 एमपीथ्री ट्रॅक्स बसू शकतात त्याउलट हेव, हअश् फाइल्समध्ये फक्त 16 ट्रॅक्स बसू शकतात.


एमपीथ्रीचे फायदे एमपीथ्रीची साइज लहान असल्यामुळे तुम्ही सहजपणे वेबसाइटवरून डाउनलोड किंवा इमेलने पाठवू शकता. एमपीथ्री वाजवण्यासाठी अनेक प्रोग्रॅम्स उपलब्ध आहेत जसे विन्डोज मीडिया प्लेयर, रियल प्लेयर, आयट्यून्स किंवा विनअ‍ॅम्प. हे प्रोग्रॅम्स जरी एमपीथ्री वाजवू शकत असले, तरी जेव्हा तुम्ही त्यांच्याकडून म्युझिक खरेदी करता तेव्हा ते तो ट्रॅक वेगळ्या फॉरमॅटमध्ये डाउनलोड करतात. एमपीथ्रीमधून इतर फॉरमॅटमध्ये किंवा इतर फॉरमॅटमधून एमपीथ्रीमध्ये गाणं बदलण्यासाठी सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. पण ही सगळी यातायात टाळण्यासाठी तुम्ही गाणे कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये वाजवणार आहात हे ठरवून घेणे केव्हाही चांगले.


अनेक वेबसाइटसवर अल्प शुल्क घेऊन अधिकृत एमपीथ्री डाउनलोडसाठी उपलब्ध आहेत. अनेक जण त्याच्या सीडीज त्यांच्या संगणकावर एमपीथ्री अपलोड करतात. एकदा तुमच्या हार्डड्राइव्हवर एमपीथ्री सेव्ह झाल्या की तुम्ही स्पीकर्स किंवा हेडफोनच्या साहाय्याने गाणी ऐकू शकता. तुम्हाला तुमचे स्वत:चे अल्बम्स आणि प्लेलिस्ट तयार करता येते. तुम्ही जेव्हा सीडीवरून तुमच्या संगणकावर संगीत कॉपी करता तेव्हा तुम्हाला ती गाणी छोटी compress करता येतात. तुमचे कॉम्प्रेशन जितके जास्त असेल (48-192 Kbps) तितकी तुमची फाइल साइज लहान होईल परंतु तुमच्या गाण्याच्या गुणवत्तेत (audio quality) मात्र घट होईल. तुम्ही एमपीथ्री फाइल्स तुमच्या एमपीथ्री प्लेयर, सीडी प्लेयर, आयट्यून्स, आयपॉड किंवा अ‍ॅपलच्या इतर साधनांवर कॉपी करू शकता. अजून एक पर्याय म्हणजे नेटवरून तुमच्या संगणकावर डाउनलोड केलेल्या एमपीथ्री नवीन सीडीवर कॉपी करून ठेवणे.


गैरवापराची शक्यता सध्या संगीतक्षेत्रात चोरीने अनधिकृत डाउनलोड आणि प्रसार (Piracy) ही डोकेदुखी झाली आहे. एमपीथ्री हे डाउनलोडला सोपे असल्याने त्याचा प्रसार अनेक माध्यमांतून सोपा झाला आहे. परंतु अशा पध्दतीने केलेला प्रसार शिक्षेस पात्र ठरू शकतो.