आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिखितरुपी उरावे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाहत्तर-त्र्याहत्तरची गोष्ट असेल. आकाशवाणी पुणे केंद्राला मी कॅज्युअल आर्टिस्ट म्हणून काम करत होते. नवशिकी होते आणि अननुभवीसुद्धा! काही कार्यक्रम आधी रेकॉर्ड केलेले असायचे. काही लाइव्ह असायचे. बहुतेक वेळा श्रोत्यांच्या पत्रांना उत्तरे द्यायची ती ‘लाइव्ह’ असत. हा सरळ श्रोत्यांपर्यंत जाणारा भाग ट्रिकी असे. यात सतत घड्याळावर लक्ष ठेवून बोलावे लागे. पण इतर ज्येष्ठ कलाकार आणि काम करणारी मंडळी यात तरबेज होती. त्यांचा कार्यक्रम अगदी सेकंदानुसारही योग्य वेळी सुरू होई आणि संपेही.
एकदा पत्रोत्तरे मी द्यावीत असे सांगितले गेले. पत्रांचा गठ्ठा बरोबर असे. निर्मला देशपांडे त्यातून सहजी पत्र काढून वाचत, हे मी पाहिलेले होते. त्यामुळे पत्रांसाठी मी वेगळे स्क्रिप्ट केले नाही आणि आयत्या वेळी पत्रे काढून उत्तरे द्यायला सुरुवात केली. माझा खूप गोंधळ उडाला. पत्रे नीट लावलेली होती, तरी सापडेनात. खालची वर झाली. वेळ थोडा. माझी फजिती माझे दोन ज्येष्ठ सहकारी पाहत होते. पण कार्यक्रम ‘लाइव्ह’ असल्याने ते काहीही करू शकत नव्हते.
कार्यक्रमाचे ट्रान्समिशन संपले. लाल बल्ब बंद झाला. निर्मला देशपांडेने कपाळावर हात मारून घेतला. लागलीच ड्यूटी रूमचा प्यून आलाच.
‘वेळ संपत आली, आम्ही खूण करतोय तरी तू पाहत नव्हतीस. पत्र घेतल्यावर तरी गप्प राहायचंस? आता तुझं बोलणं एअरवर गेलंय रेडिओतून सगळीकडे. तुला गप्प बसता येत नव्हतं? पत्रोत्तरही अर्धवट झालं. सगळा गोंधळ?’
‘आता काय करायचं?’ हा माझा प्रश्न हास्यास्पद होता. मी त्या बोललेल्या वाक्यासाठी लेखी क्षमा मागितली. हा विचार करत राहिले, की तो कार्यक्रम किती जणांनी ऐकला असेल आणि किती जणांना ती चूक कळली असेल?
तेव्हापासून बोलणे आणि लिहिणे याबद्दलचा माझा काहीएक विचार तयार झाला. मोबाइल अस्तित्वात आणि वापरात आला, तसे या एकत्रित माध्यमाचा उपयोगही लक्षात आला. टेक्स्टिंग हा शब्द टेक्स्टपासून तयार होऊन क्रियापद रूपात आला. पूर्वी टेक्स्ट या शब्दाचा एक अर्थ पवित्र शब्द किंवा पवित्र ग्रंथ असा होता. त्या शब्दाचे अनेक शब्द भुयारातून मुंग्या फुटाव्यात तसे फुटले. आता या मोबाइलवर लिहिल्या जाणा लिखाणाचेही विश्लेषण चालल्याचे कळले. मिशिगन युनिव्हर्सिटी ऑ फ सोशल रिसर्च या विद्यापीठाने केलेल्या सर्वेक्षणात असे आढळले की लिखित निरोप हे बोलण्यापेक्षा जास्त प्रामाणिकपणे लिहिले जातात. माणूस शब्द हे जास्त प्रामाणिकपणे लिहितो. एकमेकांशी संपर्क करताना लिहून संपर्क हा बोलण्याच्या तुलनेत जास्त संतुलित असतो, असा सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. यात आपले विचार नीट संपादित करून लिहिता येतात आणि वाचणाची प्रतिक्रिया विचारात घ्यायची असेल तर तेही करता येते. लिहिणे हे जास्त व्यक्तिगत आणि जवळचे असते. त्यातून दिशा निश्चित करता येते.
कित्येक वेळा अगदी जवळच्या मित्रांमध्ये किंवा भावंडांमध्ये भांडणे होतात. आवाज वाढतात. वाक्याने वाक्य, शब्दाने शब्द वाढतो, तसा त्याचा स्वर तर तीव्र होतोच, पण अर्थही तीव्र होतो. ती तीव्रता ऐकणाला दुखावू शकेल याचे भान राहत नाही. त्या वेळी एकमेकांना ओरबाडून झाल्यावरही ‘अहं’ मागे हटत नाही. आपली या भांडणात अजिबात चूक नाही, असे दोघांनाही सारख्या तीव्रतेने वाटते. अशा भांडणानंतर अबोला राहतो. किती काळ राहील सांगता येत नाही. शेवटी मित्रच तो. त्याच्याशी बोलायची ओढ वाटते. चूक उमगलेली. अशा ‘बोलक्या’ भांडणानंतर दोन ओळी कागदावर लिहितो, ‘चुकलो, पुन्हा घडणार नाही’, चिठ्ठी सरकते. समेट होतो.
याचा अर्थ लिहिताना जे आवश्यक तेवढे लिहिले जाते. वाचणाला त्रास न होता विचारांचे आदानप्रदान होते हे निश्चित. मुख्य म्हणजे जो माणूस बोलताना गोंधळू शकतो, आपले म्हणणे नीटपणे मांडू शकत नाही, त्याच्यासाठी लिहिणे जास्त चांगले आहे. कित्येकांना भिडेपोटी नाही म्हणणे जमत नाही. अशा वेळी लिखित निरोप काम करून जातो. उसने पैसे मागणाला ‘सॉरी सर/यार/फ्रेंड’ असा एसएमएस पुरेसा होतो. कित्येक वेळा मृत्यूची बातमी कळल्यावर संबंधित माणसाशी त्या वेळी बोलणे शक्य नसते, तेव्हा सांत्वना शब्दांनी लवकर पोहोचते.
आपल्या मनातल्या भावना, संवेदना या ई-मेलवरून सहज कळवू शकतो, असे तरुण पिढी म्हणते. प्रामाणिकपणे कित्येक गोष्टी समोरासमोर सांगू शकत नाही, अशा वेळी ई-मेल असो की एसएमएस, चिठ्ठी किंवा पत्र फार उपयोगी पडते. म्हणून पत्रांना ऐतिहासिक महत्त्व आहे. स्थिर स्वरूपातील एखाद्याची पत्रे ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकून जातात. एखादा दोष वा गुण किंवा वैफल्य दाखवू शकतात. म्हणून पत्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंडित नेहरूंची इंदिरा गांधींना लिहिलेली पत्रे ही आपल्या देशाचा इतिहास अधोरेखित करतात, तर एखाद्या कार्यालयातील कागदपत्रावरची टीप ही एखाद्याला कोर्टाची पायरी चढायला लावते किंवा तुरुंगात पाठवू शकते. माणूस चुकीचे बोलला आणि चूक लक्षात आली तर जीभ चावणे, डोके खाजवणे यासारख्या देहबोलीतून चूक झाली, हे कबूल करतो. ते लिखित गोष्टींबाबत होऊ शकत नाही. त्यामुळे जाहीर दिलगिरी प्रकट करण्याशिवाय पर्याय उरत नाही. तसेच लेखी काही न देता आज कित्येक लोकनेतेसुद्धा खोटे बोलतात किंवा बोलण्याची दिशा बदलतात. म्हणजे दिलगिरी द्यावी लागत नाही! म्हणून वाटते की चुकीचे बोलणे हे चुकीच्या लिहिण्यापेक्षा जास्त सोपे आहे.
तसेच बोलीभाषेतील शब्द, विशेषत: ज्यांना सांकेतिक अर्थ आहेत, लिहिले गेले तर त्यातून भरपूर मनस्ताप होऊ शकतो. ‘श्वार्झा’ हा शब्द काळ्या निग्रोंसाठी वापरला जातो. एकदा एअरहोस्टेसने एका प्रवाशाला विचारले की, ‘वुड यू लाइक टू हॅव श्वार्झा कॉफी ऑ र व्हाइट कॉफी?’ प्रवाशाला बोलीभाषेतला शब्द माहीत होता. तो चांगलाच गोंधळला. तसेच ‘ईएसपीएन’च्या एडिटरबाबत झाले. त्याने एका बिगर गो माणसासाठी कॉमेंट्रीत ‘चिंक’ हा शब्द वापरला, पण जेव्हा तोच शब्द ‘ब्रेटॉस’ या एडिटरने वर्तमानपत्रात हेडलाइनमध्ये वापरला, तेव्हा मोठाच गोंधळ उडाला.
संशोधकांच्या मते, आपल्या मेंदूत ‘ब्रोक्लाज एरिया’ किंवा ‘वेरनिक्ज एरिया’ सारखे भाग लिखित भाषेचे विश्लेषण करतात. याशिवाय कथा, गोष्टी इत्यादीसारखे लिखित आकृतिबंध मेंदूला चलित करतात. त्यामुळे वाचकांमध्ये चैतन्याची संवेदना प्रसृत होते. साबण, कस्तुरी, चंदन, केशर यासारखे शब्द फक्त या भाषांच्या भागाला चलित करतात असे नाही, तर त्याबरोबर वासालाही ओळखतात. लिखित शब्दांतून हालचाल, अर्थाचा पोत तर कळतोच, पण आपले सामाजिक कौशल्य, आपण कोणत्या मुद्द्यावर भर द्यायला हवा आणि इतर माणसे समजून घेण्याची क्षमताही त्यातून आपोआप शिकली जाते. शब्दांच्या या किमयेतून कविता, कथा, कादंब जन्मल्या आणि त्यांनी आपल्याला जाणिवांच्या प्रदेशातून नेणिवांच्या प्रदेशात न पोहोचवले तर नवल! रामदास स्वामी उगाच नाही म्हणाले, ‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे.’ ते काहीतरी ‘बोलावे’ म्हणाले नाहीत!