Home »Magazine »Akshara» Litearture Which Express Sorrow

वेदना मांडणारे सकस साहित्य निर्माण व्हावे

हयात महंमद पठाण | Feb 20, 2013, 02:00 AM IST

  • वेदना मांडणारे सकस साहित्य निर्माण व्हावे


सत्यशोधक साहित्य संमेलनाचा केंद्रबिंदू थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांचे बहुजनवादी तत्त्वज्ञान असल्याचे संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवरूनच लक्षात आले. त्यांचेच नाव संमेलन परिसरास देण्यात आले होते. परिसंवादाचे विषयही त्याच अंगाने जाणारे होते. ‘हिंदू ओबीसींचा मूळ धर्म, ग्रंथ व गुरू कोणता? परिवर्तन आणि विपर्यास’, ‘ओबीसीला पर्याय धर्मांतर’, ‘ओबीसीची जनगणना न करणे सत्तेची भीती की राजकीय षड्यंत्र’, ‘हिंदू महिलांचे कर्मकांड शोकांतिका की प्रगतीतील अडसर’ आणि जागतिकीकरण व अलुतेदार-बलुतेदार यांच्यावरील परिणाम’ आदी विषय होते.

संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखक प्राचार्य. डॉ. राजेंद्र कुंभार यांनी उद्घाटन सत्रातील भाषणात आपली भूमिका स्पष्ट केले. संमेलनाचा उद्देश, ओबीसी साहित्य व समाजाची वाटचाल याविषयी मांडणी केली. ओबीसी जातींनी सुसंघटित होऊन, ज्ञानाची हत्यारे बनवून निर्वाणीचा लढा उभा केल्याशिवाय केवळ ओबीसींनाच नव्हे तर, देशाच्या प्रगतीलाही तरणोपाय नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. बहुजनांच्या हिताच्या साहित्यासह वारकरी चळवळ आणि महात्मा बसवअण्ण्णा यांच्या चळवळीच्या तत्त्वज्ञानाचा व वाटचालीचा धांडोळा त्यांनी घेतला.ज्या प्रमाणात दलित साहित्य निर्माण झाले आणि त्या साहित्याने दलित समाजाला स्वाभिमान व महत्त्व मिळवून दिले, त्याचप्रमाणे ओबीसी समाजाच्या वेदना मानणारे सकस साहित्य निर्माण होण्यासाठी आपण सर्वांनी मनापासून प्रयत्न करावा लागणार आहे. त्यासाठी देशपातळीवर ओबीसी साहित्य अकादमीची स्थापना करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी केली. ते म्हणाले की, ओबीसींचा असंतोष, आक्रोश कधीही साहित्यातून मांडण्यात आला नाही.

उच्चवर्णीय दहशतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ओबीसी हिंदूंच्या सांस्कृतिक परिवर्तनाची प्रत्यक्षात कृती जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत ओबीसींना आत्मभान मिळणार नाही.‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांहीही भाषणात तोच कित्ता गिरवला.

जागतिकीकरणाच्या परिणामांवर उपायांची चर्चा करताना ओबीसींनी आपली साहित्यासह सर्वच ठिकाणी गुणवत्ता वाढवावी, असे मत डॉ. प्रल्हाद वडगावकर यांनी व्यक्त केले.
संमेलनाच्या समारोपास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले प्रमुख पाहुणे होते. बौद्ध समाज ओबीसींच्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्नाटक मागासवर्ग महासंघाचे अध्यक्ष जी. के. सत्या, विद्रोही चळवळीचे पार्थ पोळके, महात्मा जोतिबा फुले यांच्या नातसून नीता होले, संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार, स्वागताध्यक्ष युवराज चुंबळकर आदी उपस्थित होते.
संमेलनातील साहित्य ठराव :ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी साहित्य अकादमीच्या शाखा सुरू कराव्यात.

Next Article

Recommended