आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Liteature Board 42 Years Old At M . M. Collage Liteaturate In Pachora

पाचो-याच्या एम. एम. महाविद्यालयातील साहित्यिक घडविणारे 42 वर्षांचे वाङ्मय मंडळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची गोडी निर्माण करण्याचे कार्य गेल्या 42 वर्षांपासून पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयाचे मराठी वाङ्मय मंडळ करीत आहे. मंडळाच्या माध्यमातून वर्षभर राबविण्यात येणारे विविध कार्यक्रम हे विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारची साहित्य पर्वणी आहे. त्यामुळे या मंडळाने महाविद्यालयातील प्रत्येक घटकांच्या मनात वेगळे घर केले आहे.

‘विद्यार्थ्यांना साहित्यवाचन, लेखनास प्रवृत्त करणे, त्यांच्यात साहित्यिक दृष्टी विकसित करणे. तसेच विद्यार्थ्यांना विविध साहित्य प्रकारावर मागदर्शन करण्यासाठी मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना करण्यात येते’. मंडळाचे अध्यक्ष हे मराठी विभागाचे प्रमुख असतात. इतर भाषेचे प्राध्यापक व विद्यार्थी त्यांचे सदस्य असतात. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयाची (शेठ मुरलीधरजी मानसिंगका कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय) स्थापना जून 1970 मध्ये करण्यात आली आहे. 1972 मध्ये मराठी विभागाचे प्रमुख प्रा. लीला दंडवते यांच्या पुढकाराने कॉलेजात मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. प्रा. दंडवते हे 1996 पर्यंत मंडळाच्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या काळात साहित्यविषयी अनेक कार्यक्रम झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांना साहित्याची गोडी निर्माण झाली. तसेच अनेकांना वाचन अन् लेखनाचा छंद जडला.

1996 ते 2010 पर्यंत प्रा.खुशाल कांबळे यांच्याकडे या मंडळाचे अध्यक्षपद होते. त्यांनी महाविद्यालयात मंडळाची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी विविध प्रयोग केले. नाट्यलेखन, काव्यवाचन आदींविषयी स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांच्या कलेला वाव दिला. तसेच ‘औदुंबर’ नावाचे अनियतकालिक सुरू केले. यासाठी त्यांनी ‘विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांसाठी’ ही संकल्पना ठेवली होती. तसेच औदुंबरचे संपादक मंडळ हेदेखील विद्यार्थ्यांमधूनच तयार केले होते. जेणेकरून विद्यार्थ्यांना या अनियतकालिकाबद्दल आवड निर्माण होईल आणि ते लिखाण करण्यास सुरुवात करतील हा त्या मागचा त्यांचा मुख्य उद्देश होता. अंकात कथा, कविता, वैचारिक लेख, चारोळ्या, सुविचार प्रकाशित करण्यात येतात. साहित्याची निवड करताना ते किती कसदार अन् विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आहे याचीदेखील मोजपट्टी लावण्यात येते. त्यामुळे अंक प्रकाशित झाल्यानंतर प्रत्येकाला आपले साहित्य यात हवे होते ही खंत वाटते. त्यामुळे तो पुढच्या अंकात हमखास काहीना काही लिखाण करतो.

विशेष म्हणजे या अंकात फक्त मराठी विभागाचे विद्यार्थी लिखाण करीत नाही तर इतर विभागाच्या विद्यार्थ्यांनादेखील त्यात स्थान दिले जाते. अंक बहुरंगी प्रकाशित केला जात असून त्यासाठीचा खर्च जाहिरात किंवा प्राध्यापकाकडून वर्गणी गोळा केली जाते. वेळप्रसंगी खर्च जास्त झाला तर मंडळ पदरमोड करून स्वत:च त्यावर खर्च करते.
मार्च 2010 ते आजपावेतो मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष म्हणून प्रा. वासुदेव वले हे काम करीत आहे. त्यांनी घेतलेल्या विविध धडाकेबाज कार्यक्रमांनी मंडळ चर्चेचा विषय बनले आहे. यासाठी त्यांना प्राचार्य प्रा.बी.एन.पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मोठे सहकार्य लाभत आहे. वले यांनी पूर्वीपासून सुरू असलेल्या ‘युवा साधना’ या हस्तलिखिताच्या कार्याला चांगल्या पद्धतीने गती दिली. यात ते विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय देऊन लिखाण करायला लावतात. याशिवाय ते शुद्धलेखन कार्यशाळा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा दरवर्षी घेतात. सप्टेंबर 2010 मध्ये त्यांनी रामदास कामत (मुंबई) यांचा ‘व्यथा संसाराची’ हा एकपात्री प्रयोगाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमातून अनेकांना आपण जीवनात काही तरी करून दाखवावे याबद्दल जाणीव निर्माण झाली होती.
यांनी दिल्या मंडळाला भेट....
मंडळाला आजवर प्राचार्य प्रदीप पाटील (बुलढाणा), वाल्मीक अहिरे (भडगाव), रामदास कामत (मुंबई), नाटककार मो.ग.चव्हाण (सातगाव डोगरी), अशोक कोळी (जामनेर), प्रा.जतीन मेढे (भालोद), प्रा. किसन पाटील (जळगाव), डॉ. रविकिरण झोळ (दोंडाईचा), डॉ.पुष्पा गावित, डॉ.म.सु.पगारे यांच्यासह अनेक नामवंत लेखक, कवी, ज्येष्ठ पत्रकार, प्राध्यापक, साहित्यिक यांनी भेटी दिल्या आहेत.