आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल वापरताय? सावध व्‍हा, दुष्परिणाम वाढताहेत; काळजी घ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाइलच्या माध्यमातून उत्सर्जक किरणे म्हणजे रेडिएशनचा मानवी जीवनावर होणारा परिणाम. या दुष्परिणामाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील शास्त्रज्ञ फार चिंतित आहेत. दुष्परिणामुळे शारीरिक होणारी झीज यावर शास्त्रज्ञ अभ्यास करीत आहेत. अनेक रिसर्च प्रोजेक्ट यावर कसून संशोधन करीत आहेत व त्याची माहिती जगासमोर ठेवत आहेत. धोक्याच्या इशार्‍याची घंटा वाजवत आहेत. पर्यावरणावरही याचा धोकादायक परिणाम होतो. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे विश्व उष्णतापमान झपाट्याने वाढत आहे. या रासायनिक अशुद्धतेमुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्षेत्रात त्याचे धोकादायक परिणाम येण्यास सुरुवात केव्हाच झाली आहे.

सेल फोनचे धोके : तुम्ही सिगारेट, तंबाखूची जाहिरात पाहिली का? त्यावर स्पष्ट लिहिले आहे की, ‘सिगारेट, तंबाखूमुळे कॅन्सर होतो.’ तशीच आता मोबाइल वापरणार्‍यांसाठी शास्त्रज्ञांना सूचना द्यावी लागत आहे. फिनलॅँड रेडिएशन अ‍ॅँड न्यूक्लियर सेफ्टी अथोरिटी यांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. त्यांच्या अहवालानुसार मानवी शरीरातील पेशी सुकण्यास सुरुवात झाली आहे. त्या आकसून जात आहेत. संशोधनकर्त्यांचे म्हणणे आहे की हे पेशीमधील प्रोटीन वाढवते व ते पेशी खराबीचे एक लक्षण आहे. मोबाइल फोन कानाजवळ ठेवल्यामुळे त्यातून निघणार्‍या रेडिओ लहरी डोक्यात शिरतात. त्यामुळे त्याभागातील उष्णतापमान वाढते व लोकल ब्लडफ्लो वाढतो. त्यामुळे अ‍ॅल्बुनिन रक्तवाहिनीतून निघून मेंदू पेशीत व पेशीजलात येतो. मोटोरोला कंपनीने सांगितले की रेडिएशन जास्त प्रमाणात की पॅड व माउथ पीसमधून पाझरत असते. हेच रेडिएशन मेंदूपेशींमध्ये जबरदस्तीने घुसतात. डोळे, कान या पेशीत शिरतात. डोळे व कान यातील पेशी सूक्ष्म व नाजूकपेशी असतात. मायक्रोव्हेवना अत्यंत संवेदनशील असतात. जी मंडळी मोबाइल कमरेच्या बेल्टला लावतात. त्यांच्या मोबाइलमधून उत्सर्जक किरणे लिव्हर, मूत्रपिंडाकडे जातात. जेव्हा मोबाइल वापरात नसतो म्हणजे तुम्ही बोलत नसताना तो शरीराच्या जवळ ठेवू नका. त्याला शरीरावर चढवू नका. छातीजवळ, खिशात किंवा पॅँटच्या खिशात अगर बेल्टवर नको. त्याला दूर ठेवा. कारण, किरण उत्सर्जनामुळे अवयव खराब होतात. मोबाइल जास्त वापरणार्‍यांना संशोधकांनी सांगितले आहे की, ग्लायोमाचा धोका, श्रवण पेशीचा धोका आहे. ज्या कानाला मोबाइल ठेवता त्या बाजूला ट्यूमर होण्याचा धोका खूप आहे. रोज एकतास किंवा सतत मोबाइल वापरल्याने ट्यूमर होण्याचा धोका दहा वर्षांत होऊ शकतो.

रेडिएशनमुळे मेंदू पेशींमध्ये संवेदना वाहून नेण्याची क्षमता असुरक्षित : रेडिएशनमुळे मेंदू पेशींमध्ये संवेदना वाहून नेण्याची क्षमता असुरक्षित होते. पेशीची कार्यक्षमता खालावते. वर्षानुवर्ष मोबाइल वापरामुळे जे धोके झाले आहेत, त्यात कानाजवळ मुंग्या आल्याची भावना होणे. हे एक सामान्य लक्षण आहे. त्याशिवाय थकवा, गळावट, झोपेतील अनियमितता, लक्ष न लागणे, एकाग्रतेचा अभाव, पटकन प्रतिक्रया न निर्माण होणे, डोकदुखी, बैचनी, अशक्तपणा, हृदयात धडधडणे, रक्तदाब वाढणे इत्यादी लक्षणे दिसतात. या विविध दोषांमुळे ड्रायव्हरसाठी अनेक धोके निर्माण होतात. एकाग्रता विस्कळीत होते व अपघात होण्याची शक्यता वाढते. असे संशोधनकर्त्यांनी सांगितले आहे.
वॉकव्हगन शास्त्रज्ञाने अतिशय स्पष्टपणे घोषित केले आहे की बंद कारमध्ये एसी चालू असताना प्रचंड मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्षेत्र निर्माण होते, जे अत्यंत धोकादायक आहे. मोबाइल जास्त वापराने शुक्राणू आजारी होतात. नॉर्मल साइज, शेप्ड राहत नाही. आकारमान दूषित होते व जनन क्षमता कमी होण्याचा, संभाव्य धोका आहे. प्रतिदिन चार तासापेक्षा ज्यास्त मोबाइल वापरामुळे स्पर्म गणना कमी होते.

स्मरणशक्ती कमी होते : स्पॅनिश शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, अतिवापरामुळे लहान मुलांमध्ये चिडचिडपणा, मूड बदलणे वाढते व ते डिप्रेशनकडे जातात. त्यांची वागणूक व शिकण्याची क्षमता मंदावते, कमी होते. गरोदर स्त्रियांनी मोबाइल वापर थोडावेळ व जपून काळजीपूर्वक करावा. मातेला धोका आहेच, शिवाय बाळालाही धोका आहे. असे शास्त्रज्ञ स्पष्ट सांगत आहेत. ही मुले जशी वाढतात तशी त्यांची स्मरणशक्ती कमी होते. एकाग्रता व शिकण्याची क्षमता मंदावते.डिप्रेसिव्ह सिंड्रोम निर्माण होऊ शकतो. त्यासाठी खोडकर, हट्टी मुलांना मोबाइल देताना पालकांनी काळजी घ्यावी. जी मुले सातव्या महिन्यात जन्मलेली आहेत, त्यांना बालपणात व नंतर मोबाइल देताना पालकांनी जास्त काळजी घ्यावी. जे कर्मचारी रडार प्रयोग शाळेत, मिलिटरीत रडार क्षेत्रात आहेत त्यांनी मोबाइल काळजीपूर्वक वापरावा. ही महत्त्वाची सूचना शास्त्रज्ञ देत आहेत.

मोबाइल अतिवापरामुळे ‘स्ट्रेस बर्न आऊट’ स्थिती निर्माण होते. जितका मोबाइल वापर जास्त तितकेच ‘स्ट्रेस बर्न आऊट’ होण्याची शक्यता जास्त आहे. अति ताणामुळे झोप प्रक्रिया विस्कळीत होते. विश्रांतीसाठी पहिल्या चार तासांची झोप अवश्यक असते. या काळात शरीरातील पेशींची झीज भरून काढण्याचे काम चालते, ते सर्व ‘स्ट्रेस बर्न आऊट’ स्थितीत पूर्ण कोलमडून जाते. मोबाइल वापरामुळे चालणे, फिरणे, व्यायाम, योग्य दिशा मिळणे कमी होते. दुसर्‍यांना मोबाइलवर काम करण्यास सांगितले जाते. त्यामुळे ही मंडळी जास्त आळशी बनते. असे एक वैद्यकीय अहवाल सांगतो.