आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madhurima Article About Shabana Azmi, Diya Marathi

अष्टपैलू अभिनेत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी चित्रपटसृष्टीत काही नट-नट्या अशा आहेत ज्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेचं सोनंच केलं. अशांपैकीच एक आहेत शबाना आझमी. प्रसिद्ध शायर कैफी आझमी आणि रंगभूमी कलाकार शौकत आझमी यांच्या कन्या. कलात्मक वातावरणाचं जन्मापासूनच बाळकडू मिळालेल्या शबाना आझमींनी मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून अभिनयाचं शिक्षण घेऊन आईकडून मिळालेल्या अभिनयाच्या वारशाला त्यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेलं.

1973 मधला ‘अंकुर’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं. 1983 ते 85 अशी सलग तीन वर्षे, अर्थ, खंडहर, पार या चित्रपटांसाठी त्यांनी अभिनयासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. त्यांनी समांतर चित्रपटांबरोबरच अनेक व्यावसायिक, प्रयोगात्मक, बालचित्रपटांमध्येही अभिनयाची छाप सोडली आहे. अभिनयासोबतच एड्स जनजागृती करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्नही वाखाणण्यासारखे आहेत. 1997मध्ये राज्यसभा सदस्य झाल्यानंतरची भूमिकाही शबाना तितक्याच जागरूकपणे निभावत आहेत. 1988मध्ये त्यांना पद्मश्रीने गौरवण्यात आलं.