आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचूया ई-बुक्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काळानुसार वाचन संस्कृतीही बदलली आणि वाचन माध्यमेही. निवांत दुपार आणि हातात छानसे पुस्तक ही बहुतेकांना आवडणारी गोष्ट आता इतिहासजमा झाली. तंत्रज्ञानाच्या क्रांतीने पुस्तकाचे ऑनलाइन रूप अवतरले आणि ई-बुक्स अल्पावधीतच लोकप्रिय झाली. ‘ई’ म्हणजेच इलेक्ट्रॉनिक, ही पुस्तके तुम्ही संगणकाच्या फाइल्सच्या साहाय्याने वाचता म्हणून ई-बुक्स.

आपल्या कागदी पुस्तकासारखेच ई-बुक्सचेही लेखक, संपादक, चित्रकार आणि प्रकाशक असतात. ई-बुक्स इंटरनेटवर मोफत किंवा विकत घेऊन ऑनलाइन वाचता येतात. तुम्हाला आपल्यासोबत ही पुस्तके घेऊन ऑफलाइन वाचायची असतील तर त्यासाठी ई-बुक रीडर्स उपलब्ध आहेत. ई-बुक रीडर्सच्या लोकप्रिय कंपन्या आहेत सोनी, अ‍ॅमेझॉनचे किंडल आणि कुबो. काही जण आयपॅडही वापरतात.

ई-बुकचे फॉरमॅट कोणते ?
ई-बुक वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहेत -
PDF (आयफोनसाठी)
KOBO - लहान मुलांच्या चित्रपुस्तकांसाठी खास
HTML - हे पुस्तक तुमच्या ब्राऊझर, आयफोन आणि इतर मोबाइल फोनसाठी
मायक्रोसॉफ्ट रीडर
मोबीपॉकेट अनएन्क्रिप्टेड - किंडलसाठी
ई-बुकवाइज १ रॉकेट
पाम (palm) / ईबुक रीडर
exe. dnl’ - मॅक संगणकासाठी epub - आयपॅड, सोनी, कोबोसाठी

ई-बुक कसे वाचावे?
तुम्हाला वाचायचे पुस्तक ई-बुक कम्पॅटिबल आहे की नाही हे तपासून बघायला हवे, नाहीतर तुमच्याकडे असणार्‍या रीडरवर तुम्ही ते वाचू शकणार नाही. www.ebooks.comसारख्या अनेक साइट्स आहेत ज्या तुम्हाला ई-बुक फाइल्स आणि रीडर्सची कम्पॅटिबिलिटी सहजपणे दाखवू शकतात. काही ई-रीडर्स तुमच्या वायरलेस इंटरनेट कनेक्शनबरोबरच येतात. त्यामुळे त्या रीडर्सच्या साहाय्याने तुम्हाला पुस्तके चाळता आणि खरेदी करता येतात. एकदा पुस्तक डाऊनलोड झाले की ते तुमच्या रीडरमध्ये (खिशातच) राहते. एकदा तुम्हाला स्क्रीनची सवय झाली की वाचनाचा ताणही जाणवेनासा होतो.

काही ई-बुक्ससाठी तुम्हाला वेगळी सॉफ्टवेअर्स लागतील.
१ अ‍ॅडोब अ‍ॅक्रोबॅट रीडर - PDF फाइल्ससाठी १ मायक्रोसॉफ्ट रीडर - LITफाइल्ससाठी १ मोबिपॉकेट रीडर - PRC फाइल्ससाठी फ्लिप अल्बम व्ह्यूअर - windows साठी १ डेस्कटॉप ऑथर - dnl फाइल्ससाठी
ई-बुक्स तुम्हाला फक्त संगणकावर वाचायची अजिबात गरज नाही. संगणकाव्यतिरिक्त छोटे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स तुम्ही वापरू शकता ह्यांना ई-बुक रीडर म्हणतात. हे रीडर तुम्ही घरी, बाहेर, कोणाची वाट बघताना अगदी कुठेही वापरू शकता. लोकप्रिय असलेली ई-बुक रीडर्स आहेत अ‍ॅमेझॉनचे किंडल, ई-बुकवाइज, सायबुक, हॅनलिन ई-रीडर आणि पाम ई-रीडर.
टेक्नोकट्टा