आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरी ताठ कणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मला आवडलेले पुस्तक ‘ताठ कणा’ डॉ. पी. एस. रामाणी यांनी लिहिलेले आहे. मला माझी मैत्रीण सौ. गवांदे हिने या पुस्तकाविषयी माहिती दिली. मी ते लगेच वाचनालयातून आणले. एकाच बैठकीत वाचून काढले. यातली भाषा सोपी आहे.
डॉ. रामाणी न्यूरोस्पायनल सर्जन, प्रोफेसर आहेत. अनेकांना आपल्या शरीराचे प्राथमिक ज्ञान नसते. अशांना मेंदू, मणके, पाठीचा कणा या अवयवांबद्दल माहिती कळावी म्हणून सोप्या भाषेत त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. सुरुवातीला डॉक्टरांच्या बालपणीचे वर्णन आहे. एसएससीच्या परीक्षेत गोव्यामधून दुसरे आल्यावर त्यांच्या आईने पुढील शिक्षणासाठी मुंबईस पाठविले. गोव्यातील लहान गावातील शाळेमधून मुंबईला आले. त्यांना डॉक्टर व्हायचे होते म्हणून प्रचंड मेहनत घेतली, भरपूर अभ्यास केला. टीएन मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला. तिथे शवविच्छेदन करताना त्यांना कशी भीती वाटली, याचे वर्णन सुरेख केले आहे. ही भीती नंतर कमी होऊन ते शवविच्छेदनात रमून गेले. हाडांची रचना कशी असते याचा भरपूर अभ्यास त्यांनी केला. हे वर्णन वाचनीय आहे.
पुढे ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले, तेथे फोटोग्राफीही केली, त्यात प्रथम पारितोषिक मिळाले. त्यांना पुढे पाठीच्या कण्याच्या अभ्यासात गोडी निर्माण झाली. आणि ठरवले न्यूरोसर्जन व्हायचे आणि त्याप्रमाणे न्यूरोसर्जन झाले. त्यांनी खूप मेहनत घेतली. रुग्णांची मनोभावे सेवा केली. नायर हॉस्पिटलमध्ये रमून गेले. रुग्णांचे विविध अनुभव पुस्तकात दिले आहेत. ते वाचताना खूप उत्सुकता निर्माण होते आणि त्यांच्या हुशारीचे कौतुक वाटते. त्यांनी अनेक अवघड अशी आॅपरेशन्स केलीत. शिकवणे आवडीचे. लीलावती हॉस्पिटलमध्ये रात्री 10 ते 12 या वेळात लेक्चर्स घेत, तिथे विद्यार्थ्यांची गर्दी असे.
बुद्धिमत्ता आणि अदम्य आकांक्षा, धैर्य, चिकाटी, जिद्द याच्या बळावर त्यांनी आपले स्थान उच्च पदावर ठेवले. त्यांना शिक्षणाचा ध्यास होता. काम करीत जा, हाक मारत जा, मी मदतीसाठी तयार उभा आहे, हे परमेश्वराचे वचन त्यांनी मनात जपले होते. ‘रुग्णांची सेवा, संशोधन आणि शिकवणे’ हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. त्यांनी भव्य स्वप्ने बघितली. स्पायनल सर्जरीतील नवे शोध लावले, परदेशातही ते खूप लोकप्रिय झाले. डॉक्टरांमुळे न्यूरोस्पायनल सर्जरीचा भारतात उगम झाला. त्यांनी ‘प्लिफ’ ही अतिकठीण शस्त्रक्रिया शोधून काढली. भारतातील पहिली ‘बोन बँक’ सायन हॉस्पिटलमध्ये सुरू केली. या बोन बँकमधून हाड वापरून शस्त्रक्रिया करण्याचे कौशल्य डॉक्टरांचे कौतुकास्पद आहे. त्यामुळे त्यांचे नाव जगभर पसरले. माणसाला धैर्य त्याला त्याच्याच ताठ कण्यात मिळते, हे वि.वा. शिरवाडकरांचे वाक्य डॉक्टरांनी त्यांच्या कार्याने सिद्ध करून दाखविले.