आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहिणी : घरातली समृद्ध ‘अडगळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुस्तकाच्या एका शीर्षकावरून कोसळली माझी ही वैचारिक ‘दरड’
विचारांची होताच ‘पडझड’
दाटून आला उपेक्षिततेचा ‘कढ’
वाटलं आजमावावी आपली आपल्या घरावरची ‘पकड’
बोलून ‘जडजड’ मी व्यक्त केली ‘तडफड’
चडफड करीत कुटुंबीयांची केली ‘धरपकड’
म्हणाले, तुमच्यासाठी मरमरून पेलते संसाराचे ‘जोखड’
कळलंय मला आता खरी काय ‘भानगड’
गृहिणी म्हणजे घरातली समृद्ध ‘अडगळ.’
ऐकून माझी ‘बडबड’
कुटुंबीयांनी दाखविले एकीचे बळ
समृद्ध नाही गं, तू तर घरातली संग्रहणीय ‘अडगळ’
लगेच माझ्या सात्त्विक संतापाची मीच उतरविली झापड
म्हणाले, केली उगीच तुम्हा सर्वांची गंमत
गृहिणीची तर घरात असते अनमोल किंमत
अडगळ-बिडगळ बोलणं होतं बाष्कळ
माहितीय मला मीच तर घराची शोभा
घराचे सर्वस्व अन् घराचं सार्वभौम शक्तिस्थळ