Home »Magazine »Madhurima» Madhurima Recipes

रेसिपी : दमआलू

स्नेहा शिंपी | Jul 05, 2012, 23:32 PM IST

दमआलू

साहित्य : 8-10 लहान बटाटे, 2 कांदे, 3 टोमॅटो, 2 लवंगा, 6-8 काजू, 2 लहान चमचे किसलेलं सुकं खोबरं, 2 लहान चमचे कसुरी मेथी, जिरं, हळद, अखंड मसाला वेलची, गरम मसाला, खसखस, अर्धा पेला दही, चवीनुसार मीठ, लाल तिखट, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, 2 चमचे तूप.
कृती : बटाट्याची सालं काढून चाकूने टोचून तळून घ्या. कांदा, आलं, हिरवी मिरची वाटून घ्या. दह्यात काजू भिजवा आणि नंतर टोमॅटोसह हळद, कोथिंबीर व जिरं घालून वाटून घ्या. आता कढईत तूप गरम करून अखंड मसाला टाकून कांद्याची पेस्ट परता. मग त्यात खसखस पेस्ट परतून टोमॅटोची पेस्ट टाका व किसलेलं सुकं खोबरं टाकून, टोमॅटोला तूप सुटेपर्यंत परता.
आता दोन वाटी पाणी टाकून त्यात कसुरी मेथी मिसळा. ग्रेव्ही शिजल्यावर तळलेले बटाटे घाला व दहा मिनिटं शिजवा. गरम मसाला मिसळून सर्व्ह करा.

पेशावरी

साहित्य : कांदा, टोमॅटो, काजू, मावा, क्रीम, आलं-लसूण, धणेपूड, जायफळ, लाल तिखट, दालचिनी पूड, इलायची दूध, नारंगी रंग, साखर, मीठ, घेवडा, फ्लॉवर, गाजर, वाटाणा, पनीर, तेल.
कृती : कढईत अर्धी वाटी तेल घालून गरम करून त्यात किसलेला कांदा लालसर परतून घ्या. मग त्यात चिरलेला टोमॅटो घालावा व परतून घ्या.
त्यातच काजू, मावा, क्रीम, वाटलेले आलं-लसूण, वाटलेली खसखस लाल तिखट, धणेपूड, इलायची पावडर, जायफळ पूड, दालचिनीपूड, हळद, नारंगी रंग, साखर, मीठ, अर्धी वाटी दूध, दोन वाट्या कोमट पाणी घालून चांगले परतून घ्या. नंतर घेवडा, फ्लॉवर, वाटाणा, गाजर व पनीरचे चौकोनी तुकडे घालावेत. झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यावी.

कुरमा
साहित्य : दोन बटाटे, एक गाजर, एक कप मटार, एक कांदा, 100 ग्रॅम फरसबी, दोन हिरव्या मिरच्या, दोन चमचे आलं-लसूण पेस्ट, एक लहान चमचा तिखट, एक वाटी ओल्या नारळाचा कीस, एक लहान चमचा प्रत्येकी धणेपूड, बडीशेप, एक इंच दालचिनीचा तुकडा, दोन वेलच्या, दोन लवंगा, दोन लहान चमचे तेल, थोडीशी कोथिंबीर.
कृती : भाज्यांचे लहान लहान तुकडे करा. मग ओलं खोबरं, बडीशेप, लवंगा, वेलची, दालचिनी एकत्र करून त्याचे वाटण तयार करा. कांदा बारीक चिरून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून कांदा परतून घ्या. मग त्यात भाज्यांचे तुकडे घालून 2-3 मिनिटं परता. इतर सर्व मसाले व आलं-लसूण पेस्ट घालून एक कप पाणीही मिसळा. मग भाजी काही वेळ शिजू द्या. तयार झालेली भाजी कोथिंबिरीने सजवून पराठ्यांसोबत सर्व्ह करा.

Next Article

Recommended