आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात मूळ पेशींवरील संशोधनाबाबतचे आपले आश्वासन पाळले.Embryonic Stem Cells भ्रूण मूळ पेशींच्या संशोधनाला आता राष्ट्रीय कोशातून पैसा मिळू शकणार आहे. याचे दोन अर्थ काढता येतील. एकतर मूळ पेशींवरील संशोधनाला आता चांगला वेग येईल व दुसरे म्हणजे त्याला राजमान्यता मिळेल.
मूळ पेशींचा वापर करून रुग्णांवर उपचारास अनेक ठिकाणी सुरुवात : मूळ पेशींचा वापर करून रुग्णांवर उपचार करण्यास अनेक ठिकाणी सुरुवात झाली आहे. मनुष्यात आढळणा-या अनेक व्याधींमध्ये विशेषत: Degenerative(वि-हासी) व्याधींमध्ये शरीरातील त्या भागातील काही पेशी नष्ट होतात. स्वाभाविकच त्या अवयावाचे कार्य कमीअधिक प्रमाणात ठप्प पडते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हृदयाचे काही स्नायू कमीअधिक प्रमाणात नष्ट होतात. हीच बाब मेंदूच्या झटक्यात घडते. अल्झायमर रोगामध्येसुद्धा मेंदूच्या पेशींचा -हास होऊ लागतो.
मधुमेहात Islets of Pancreasमधील काही विशिष्ट पेशी नाहीशा होतात. या व इतर अनेक दुर्धर व्याधींमध्ये मूळ पेशीद्वारे केले गेलेले उपचार रोग्याला जीवनदान देऊ शकतात. मूळ पेशी या शरीरात निर्माण होणा-या सुरुवातीच्या आद्यपेशी असतात. या पेशी गरजेप्रमाणे आवश्यक त्या पेशीसमूहात बदलू शकतात. मूळ पेशींचे ठळक दोन प्रकार सांगता येतील. भ्रूण मूळ पेशी / गर्भ मूळ पेशी (Embryonic Stem Cells) प्रौढ मूळ पेशी / कायकापेशी (Somatic Stem Cells/ Adult Stlls)संशोधकाच्या मतानुसार गर्भ मूळ पेशी या सर्वोकृष्ट पेशी ठरतात. कारण त्यांना विशिष्ट प्रकारे उद्दिपित केले असता त्यांना हव्या त्या पेशीसमिहात बदलता येते. अगदी मेंदूच्या पेशीत किंवा Nerve तंत्रिका पेशीत. शिवाय त्यांना प्रयोगशाळेत खूप दिवस टिकवता येते.
याउलट कायकापेशी शरीरातील विशिष्ट अवयवांमधून मिळवता येतात. उदाहरणार्थ त्वचेमधून मिळणा-या कायकापेशीमधून फक्त त्वचेचीच निर्मिती करणे शक्य होते. अर्थात त्याला काही अपवाद आहेत. उदाहरणार्थ अस्थिमज्जा (बोन मॅरो) किंवा नाळेपासून (अंबिलिकल कॉर्ड) मिळणा-या मूळ पेशींपासून अनेक प्रकारच्या पेशींची निर्मिती करणे शक्य असेल तरी त्याला भ्रूण मूळ पेशींची सर येत नाही.
जानेवारी 2009 मध्ये इंपेरियल कॉलेज ऑफ लंडनमधील संशोधक सारा रॅनकिन आणि तिच्या सहका-यांनी Mozobil नावाच्या औषधाचा वृधिघटकांशी Natural Growth Factor एकत्र उपयोग करून अस्थिमज्जा (बोन मॅरो) मधील अनेक मूळ पेशींना रक्तप्रवाहात मोकळे करण्यात यश मिळवले. या संशोधनामुळे प्रत्येक रुग्णासाठी त्याच्याच शरीरातील मूळ पेशी मिळू शकतील व त्या पेशींना शरीर अधिक उत्तमपणे स्वीकारेल. सर्वात महत्त्वाचे मूळ पेशींमुळे उद्भवणारे उद्भवणार नाहीत. अस्थिमज्जेला चेतवून त्यातून रक्ताच्या कर्करोगावर इलाज करण्यासाठी मूळ पेशी काढण्याचे कार्य सध्या तरी नियमितपणे केले जात असते. Natural Granulocyte Stimulating Factor GcsfX च्या सहाय्याने रक्तामधून haematopoietic stem cells (hscs) मूळ पेशींची निर्मिती केली जाऊन त्यांना विशिष्ट वातावरणात वाढवले जाते. त्यानंतर रक्ताच्या कर्करोगाच्या रुग्णाला किमोथेरपीनंतर hscs मूळ पेशींद्वारे नष्ट झालेल्या पेशींची संख्या भरून काढल्या जाते. मात्र, सारा रॅनकिन यांच्या संशोधनाने दोन अधिक गटाच्या पेशी समूहाची निर्मिती करणे शक्य होणार आहे. Mesenchymal Stem Cells (mscs) आणि Endothelial Progenitor Stem Cells (epcs)
mscs पेशी समूहामुळे स्नायू आणि हाडांची नवनिर्मिती करणे शक्य होणार आहे. तर epcs पेशी समूहामुळे रक्तवाहिन्यांची निर्मिती शक्य होणार आहे. मुख्य म्हणजे रॅनकिन यांच्या मते Mozobil नावाच्या औषधाचा नैसर्गिक वाढ देणा-या घटकांचा एकत्र उपयोग केल्यास हृदयविकाराच्या झटक्यामुळे निकामी झालेले हृदयाचे स्नायू व रक्तवाहिन्याची निर्मिती आपोआप होणार आहे.
सध्या मात्र हे प्रयोग मूषकांवर यशस्वी झालेले आहेत. सारा रॅनकिन यांच्या मते त्यांच्या या संशोधनातून त्यांनी फक्त नैसर्गिकपणे आढणा-या प्रक्रियेला थोडी चालना दिली आहे. त्या जे हृदयांच्या पेशींसाठी साध्य करू शकल्या त्या इतर पेशींसाठी साध्य करणे शक्य होणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.