आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुंबकीय जल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चुंबकाच्या उत्तर व दक्षिण ध्रुवावर 12 ते 14 तास पाणी ठेवले की, चुंबकीय जल तयार होते. त्या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करून अनेक प्रकारचे रोग दूर होऊन लाभ मिळवता येतात. हे पाणी निर्जंतूक होते. तसेच गंगेच्या पाण्याप्रमाणे कधीही खराब होत नाही. या पाण्यात चुंबकाच्या प्रवाहामुळे सोडियम व पोटॅशियम या घटकांचे प्रमाण नियमित होते. तसेच या पाण्यात सूक्ष्म जलस्फटिक तयार होतात. ते शरीरात गेल्यावर ऊर्जेमुळे आश्चर्यकारक बदल घडतात.

चुंबक जलाचे आरोग्य चमत्कार
1. रोज सकाळी व संध्याकाळी एक ग्लास पाणी काचेच्या ग्लासने प्यावे.
2. चुंबक जलामुळे शरीरातील साचलेल्या विषारी द्रव्याचा निचरा होतो.
3. सुटलेले पोट, लठ्ठपणा कंबरेचा घेर, इत्यादी तक्रारी दूर होतात.
4. बारीक मुतखडे विरघळून मूत्रदोष जातो.
5. सर्दी, ताप, खोकला या तक्रारी नेहमीसाठी दूर होतात.
6. रक्तात कोलेस्टेरॉल साचत नाही. रक्ताभिसरण सुधारून हृदयकार्य वाढते.
7. रक्त शुद्धी होऊन दोष नाहीसे होतात.
8. दात, हिरड्या यावर या पाण्याने मसाज केल्यास दाढदुखी व ठणक थांबते.
9. संसर्गजन्य रोगात श्वेतकण कमी होतात.
10. रक्तदाब कमी होऊन (बी.पी.) रक्तातील हिमोग्लोबीन वाढते.
11. चुंबकीय क्षेत्रात कॅन्सरची वाढ खुंटते.
12. सांधे-गुडघेदुखीवर प्रभावी उपचार.
13. बद्धकोष्ठता कमी होऊन आम्लपित्ताचा त्रास नाहीसा होतो.
14. हार्मोन्सचे कार्य सुधारते. भूक वाढते व पचनक्रिया सुधारते.
15. पायाच्या टाचेच्या भेगा या पाण्याने कापूस भिजून धुतल्यास भेगा कमी होतात.
16. रोज सकाळी हे पाणी डोळ्यावर मारल्यास डोळ्याचे त्रास कमी होतात.
17. पुरुषांची दिव्यशक्ती वाढते. मल विसर्जनास सहजता येऊन पोट साफ राहते.
18. स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात, थकवा कमी होतो.
19. शरीराच्या जखमा लवकर भरतात.
20. पाणी शरीराची आवश्यक उष्णता टिकवते अनावश्यक उष्णता बाहेर टाकते.
21. मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित सुरू होऊन मूत्र विसर्जनाला गती येते. मेद व अतिरिक्त उष्णता कमी होते.
22. रक्तदाब, कावीळ, यकृत दोष, टी.बी., मधूमेह हे विकार दूर होण्यास मदत होते.
23. चुंबकीय तेल लावल्याने केस गळणे, केस पांढरे होणे, इत्यादी त्रास दूर होतो व केस काळे होतात.
24. चुंबकीय जल पिल्याने मुलांची प्रतिकार शक्ती वाढते. शारीरिक, बौद्धिक उंची वाढते.