Home »Magazine »Madhurima» Magzine, Madhurima, Recipi

रेसिपी -मुगाचे लाडू

सुमती अरकडी, नाशिक. | Oct 13, 2011, 22:58 PM IST

  • रेसिपी -मुगाचे लाडू

मुगाचे लाडू
साहित्य- 4 वाट्या मुगाच्या डाळीचे रवाळ पीठ, 3 वाट्या पिठीसाखर, किसमिस, वेलची पूड, 1 चमचा तूप, थोडे दूध.
कृती- जाड बुडाच्या कढईत तूप टाकून पीठ लालसर भाजावे. भाजत आले की त्यावर थोडा दुधाचा शिपका द्यावा. परातीत काढल्यावर थोडे गार झाल्यावर पिठीसाखर व वेलची पूड घालावी. नंतर चांगले मळावे. मळल्याने लाडू हलका होतो. लाडू वळावे, वरून किसमिस लावावे.
कोकणी निगवऱया
साहित्य- 2 वाट्या तांदळाचे पीठ, 1 वाटी नारळाचा चव, 3-4 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी मटार, कोथिंबीर 1 चमचा, जिरे, साखर, मीठ चवीप्रमाणे, तेल
कृती- तांदळाच्या पिठाची उकड काढावी. मटार वाफवून घ्यावेत. मटार, खोबरे, मिरच्या, जिरे, कोथिंबीर याचे वाटण करावे. नंतर एका बाऊलमध्ये तांदळाची उकड, वाटलेले सारण, मीठ, साखर व थोडे तेल घालून कालवून त्याचे मुटके करावेत. पातेल्यात पाणी घालून व चाळणी ठेवून मुटके वाफवून घ्यावेत किंवा कुकरची शिट्टी काढून वाफवले तरी चालतात. 15 मि. ठेवावे. गार झाल्यावर तुपाबरोबर खावयास द्यावेत.
नारळीपाक लाडू
साहित्य- चार वाट्या रवा, 2 वाट्या नारळाचा चव, 4 वाट्या साखर, 8-10 किसमिस, जायफळ वेलची पूड 1-1 चमचा, दीड वाटी.
कृती- कढईत तूप टाकून रवा लालसर भाजावा. नंतर नारळाचा चव भाजून घ्यावा. साखरेत पाणी घालून एकतारी पाक करावा. नंतर त्यात रवा, नारळ, वेलची, जायफळ पूड किसमिस घालावे व हलवून घट्ट होईपर्यंत ठेवावे. घट्ट झाल्यावर लाडू वळावेत.
लाल भोपळ्याची बोंडे
साहित्य- 1 वाटी लाल भोपळ्याच्या फोडी, अर्धी वाटी गूळ, अर्धी वाटी साखर, 1 वाटी खोब-याचा किस, 2 चमचे तीळ, 1 चमचा वेलची पूड, एक चिमूट सोडा, चवीपुरते मीठ, कणीक, तेल.
कृती- भोपळ्याच्या फोडी वाफवून त्यात गूळ व साखर घालावी. मऊ झाल्यावर गार होऊ द्या. नंतर बारीक करून त्यात खोब-याचा किस, तीळ, मीठ, सोडा घालून मावेल त्या प्रमाणात कणीक घालावी. थोडे पाणी घालून एकत्र करावे. तेल गरम करून त्यात भज्यांप्रमाणे बोंडे तळावीत.

Next Article

Recommended