आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्न करताय ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


त्यादोघांमध्ये जर कोणी थोडी जरी उणीव काढून दाखवली तर त्याला मोठं बक्षीस द्यावं इतकी ती दोघं एकमेकांना अनुरूप दिसत होती. त्यांच्याकडे बघणा-या प्रत्येकाला त्यांचा जन्म केवळ एकमेकांसाठी झाल्याचा भास होत होता. पत्रिका, नाडी, छत्तीस गुण, शैक्षणिक पात्रता, आर्थिक परिस्थिती इ. सर्व काही एकदम मेड फॉर ईच अदर! प्रचंड खर्च करून धूमधडाक्यात लग्न पार पडलं. हे लग्न झाल्यानंतर केवळ दोन वर्षांच्या आतच आयुष्यात पुन्हा कधीही सासरी न जाण्याचा निश्चय करून माहेरी आलेली ‘ती’ अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी मला विचारत होती, ‘नक्की कोणाचं चुकलं, माझं की माझ्या नव-याचं?’
दोन्ही घरं आत्यंतिक आस्तिक व पापभीरू. रोज कमीत कमी दोन तास चालणारी देवपूजा, अगदी नेमाने केली जाणारी व्रतवैकल्ये व उपासतापास, वर्षातून एकदा देवदर्शनासाठी शेगाव, माहूर व शिर्डीला अगदी चुकता होणारी वारी असं सर्व काही अनेक वर्षांपासून विनातक्रार सुरू होतं.

लग्नाच्या निमित्ताने ती दोन घरं एकत्र आली. वैदिक पद्धतीचा आदर्श विवाह कसा असावा याचा वस्तुपाठ ठरेल असा विवाह सोहळा साग्रसंगीत पार पडला. सगळं कसं अत्यंत लोभस दिसत होतं. हे कौतुकाचं लग्न होऊन आता तीन वर्षे झाली आहेत व पती-पत्नीमध्ये वेळी-अवेळी होणारे भांडणांचे स्फोट अख्ख्या इमारतीला हादरवून टाकत आहेत. या विवाहाच्या यशासाठी देवपूजा व व्रतवैकल्ये उपयोगी पडली नसतील का? आणि आता एका उपवर मुलीचं थोड्या वेळापूर्वी मला आलेलं हे पत्र. मी एक पोस्ट ग्रॅज्युएट तरुणी असून विवाहाच्या उंबरठ्यावर उभी आहे. माझं लग्न जुळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न होत असताना काही प्रश्नांनी मला विलक्षण बेचैन करून सोडलं आहे व या प्रश्नांच्या समाधानकारक उत्तरांच्या मी प्रतीक्षेत आहे. ज्योतिषशास्त्राच्या आधारे लग्न जुळवणे कितपत योग्य आहे? ज्योतिष्याने सुचवलेल्या पूजा, जसे नारायण नागबळी, कालसर्प योग, पितृदोष इ. करणे खरंच आवश्यक आहे का? अशा प्रकारच्या पूजांनी अथवा उपाययोजनांनी समस्यांचे समाधान होते का? हस्तरेषा, कुंडली व ग्रहमानावर युवापिढीचे भवितव्य खरंच अवलंबून आहे का?

shrikantpohankar@gmail.com