आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत: बनवा अ‍ॅप्स...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सध्याच्या माहिती युगात ‘अंड्रॉइड’ शब्द जर कोणी ऐकला नसेल तर नवलच. जाहिरातींमधून, वर्तमानपत्रातून, मित्र-मैत्रिणी, भावा-बहिणीच्या मोबाइलमधून सतत हा शब्द आपल्या कानावर पडत असतो. मग ही भानगड आहे तरी काय आणि आपल्याला याचा फायदा कसा होऊ शकतो याचा आपण कधी विचार केला आहे?

‘अंड्रॉइड’ ही लिनक्स या संगणक प्रणालीवर आधारित मोबाइल प्रणाली आहे. साध्या शब्दांत सांगायचे झाल्यास मोबाइलमधील अ‍ॅप्स या तंत्रज्ञानावर चालते. म्हणजे ‘अंड्रॉइड’ ही प्रणाली मोबाइलधारक व मोबाइल संच यांच्यामधील दुवा असतो. 2007 मध्ये गुगल आणि ओपन हँड सेट अलायन्स या दोघांनी ही प्रणाली (Operating System) प्रथम बाजारपेठेत आणली व लगेचच ही प्रणाली झपाट्याने मोबाइलच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लोकप्रिय झाली. भारत सरकार व आयआयटीच्या संयुक्त उपक्रमाद्वारे तयार करण्यात आलेला जगातील सर्वात स्वस्त टॅब्लेट ‘आकाश’ हादेखील अँड्रॉइडवर आधारित आहे.

अँड्रॉइड प्रणालीसंदर्भात काही माहिती
* स्वस्त, जलद चालणारी व वापरायला सोपी असल्यामुळे जगभरातील जवळपास सर्व मोबाइल निर्मिती कंपन्या या प्रणालीचा उपयोग करतात. मोबाइलच्या बाजारपेठेत सध्या 80% मोबाइल हँडसेट या प्रणालीवर चालत आहेत.
* अँड्रॉइडमध्ये सर्वसामान्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. ‘गुगल प्ले’ या संकेतस्थळावर जाऊन आपल्या गरजेनुसार विविध अ‍ॅप्लिकेशन (अ‍ॅप्स) डाऊनलोड करून घेऊ शकता. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत, सर्व व्यवसाय करणा-यांसाठी हजारो अ‍ॅप्स आपल्याला या संकेतस्थळावर मिळू शकतात.
काही अ‍ॅप्स मोफत आहेत तर काही अ‍ॅप्सना पैसे भरावे लागतात. दैनंदिन जीवनात आपल्याला मदत करणारी शेकडो अ‍ॅप्स आहेत.
तसेच विरंगुळा, खेळ अशा प्रकारची अनेक अ‍ॅप्स आहेत.
* पैसा आणि प्रसिद्धी सर्वांना हवीहवीशी असते. त्यात ती मिळत असेल तर उत्तमच. अँड्रॉइड प्रणालीमध्ये तुम्ही स्वत:च्या बुद्धिमत्तेच्या आधारवर सॉफ्टवेअर बनवून पैसे व प्रसिद्धी मिळवू शकता.
* अँड्रॉइड अ‍ॅप्सच्या दुनियेत यशस्वी होण्यासाठी तुम्ही थ्री इडियट्समधील इडियट असले पाहिजे असे नाही. सर्व सामान्यसुद्धा यशस्वी करिअर घडवू शकतात. पण कल्पनाशक्ती हवी.
* सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी सॉफ्टवेअर कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगची माहिती प्रथम करून घ्यायला हवी. या माहितीच्या आधारे एखाद्या कॉम्प्युटर संस्थेत अँड्रॉइड अप्लिकेशनचा कोर्स करावा. अशा कोर्सची फीसुद्धा माफक असते. त्यांचा कालावधीही कमी असतो.
* अन्यथा http://developer.android.com या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती सोप्या भाषेतून उदाहरणांद्वारे देण्यात आली आहे.
* एकदा तुम्ही अ‍ॅप्स तयार करण्यास शिकलात तर तुम्हाला कंपन्यांचे दरवाजे खुले होतील. तुम्ही स्वत:चा व्यवसायदेखील करू शकता.
* एखादा तयार केलेला हटके व उपयोगी अ‍ॅप्स तुम्ही google play (http://play.google.com) या संकेतस्थळावर अपलोड करू शकता. यासाठी गुगलकडे 25 डॉलर रक्कम भरावी लागते. एकदा इंटरनेटवर तुमचे अ‍ॅप्स गेल्यास तुम्ही ते सशुल्क ठेवू शकता किंवा त्याची जाहिरातही करू शकता.
* अँड्रॉइड अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंटसंदर्भात बाजारात मार्गदर्शनासाठी पुस्तके उपलब्ध आहेत.
* येत्या काही काळात अशी अनेक संकेतस्थळे येतील की तुम्ही तुमचे अ‍ॅप्स ऑनलाइनही बनवू शकता.
* आयआयटी मुंबईकडून आकाश व अँड्रॉइडच्या प्रसारासाठी तसेच अशी अ‍ॅप्स विकसित करण्यासाठी प्रोत्साहनपर स्पर्धा आयोजित केली आहे.अधिक माहितीसाठी http://aakashlabs.org/संकेतस्थळाला भेट द्या.
थोडक्यात आपल्या मोबाइलवर इतर अ‍ॅप्सशी खेळत असताना आपणही आपल्या कल्पनाशक्तीचा जोर लावून अशी अ‍ॅप्स विकसित करू शकतो का, याचा विचार जरूर करा. यातून रोजगाराच्या नव्या संधीही मिळून जातील.
बाजारात
झपाट्याने लोकप्रिय
2007मध्ये गुगल आणि ओपन हँड सेट अलायन्स या दोघांनी ही प्रणाली (Operating System) प्रथम बाजारपेठेत आणली व लगेचच ही प्रणाली झपाट्याने मोबाइलच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लोकप्रिय झाली.


prashantpathak26@gmail.com