आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराकोटीचा पुरूषार्थ व परमार्थ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फाळणीनंतर सिंधी समाज महाराष्‍ट्रात आला. या समाजाचे दोन प्रकारे वर्गीकरण केले जाते. (1) आमिल, (2)भाईबंद.
आमिल हे सुशिक्षित, शिकले-सवरलेले. त्यामुळे त्यांनी नोक-या मिळवल्या. या सुशिक्षित सिंधी समाजास ‘आमिल’ म्हणतात. तर ज्यांना चांगली नोकरी मिळवण्याइतपत शिक्षण नव्हते आणि ज्यांना व्यापार करायचा होता किंवा करणे भाग होते, अशा सिंधींना भाईबंद म्हणतात. अर्थातच भाईबंद हे जास्त कष्टाळू, रात्रंदिवस काम करणारे, कामात लहान-मोठे काम असा भेदभाव न करणारे आहेत.

भाईबंद (सिंधी) लोकांची एक व्यापारनीती आहे. ‘थोरे खटिए घणी बर्पत’ म्हणजे थोडाच फायदा मिळवा, त्यात अधिक प्रगती आहे. या तत्त्वानुसार सिंधी समाजातील व्यापारीवर्ग फार मोठ्या नफ्याच्या मार्जिनपेक्षा अधिक काम करून जास्त उलाढाल करणारा आहे.

महाराष्‍ट्रात आलेल्या सिंधी समाजाचे जीवनव्यवहार या पद्धतीने घडत राहिले. फाळणीच्या वेळी आलेल्या सिंधी समाजातील महिलांना पर्दापद्धती (म्हणजे आपल्याकडे गोषापद्धती होती तशी) असल्यामुळे त्या नोकरी-व्यवसायासाठी बाहेर जाऊ शकत नव्हत्या. त्यामुळे घरात बसून करायचे उद्योग त्या करू लागल्या. पापड, शिवणकाम, लोणची व इतर खाद्यपदार्थ बनवणे असे घरात बसून जे करणे शक्य आहे, असा उद्यम करून चार पैसे मिळवण्यात त्या पुरुषांना मदत करू लागल्या. सिंधी लोकांचा हा सगळा प्रवास संघर्षाचा आहे. ज्यांच्या अखंड भारतात सिंधमध्ये शेकडो एकर जमिनी, प्रॉपर्टी होत्या, त्यांच्या मुलांना भारतात आल्यावर रेल्वेतून छोट्या-छोट्या वस्तू विकण्याची वेळ आली.
अशा परिस्थितीतही सिंधी समाजाची आजुबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेण्याची वृत्ती, प्रवाहाविरुद्ध शक्यतो न जाण्याची वृत्ती यांमुळे हा समाज तग धरून पुन्हा उभा राहिला.

सिंधी समाजाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे राष्‍ट्रीय विचारधारांचा आदर करणे. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे, गोळ्या बिस्किट विकेन पण भीक मागणार नाही, पैशासाठी गुन्हेगारी करणार नाही, अशा संस्कारांमुळे सिंधी समाज हा मुख्य राष्‍ट्रीय प्रवाहात सतत राहिला.
‘अढाई घरनि जो खैरू धुरंदो’ या म्हणीप्रमाणे सिंधी समाजाची जीवनशैली राहिली आहे. या म्हणीचा अर्थ, प्रत्येक जवळच्या माणसाचे (अढाई घरनि-अडीच घराच्या अंतरावर) भले चिंतत जाणे व आपले भलेपण त्यात सामावून घेणे. या विचारधारेतून त्यांनी भारतीय समाज आणि राष्‍ट्राला आपले योगदान दिले आहे.

सिंधी समाजजीवनात तीन टप्पे सामावले आहेत.
1. शरणार्थी, 2. पुरुषार्थी, 3. परमार्थी.
विशिष्ट कालपरिस्थितीत ते परिस्थितीशरण झाले, नियतीशरण झाले; पण पुढे आपल्या चिकाटी, मेहनत, कष्टाळू वृत्ती यांतून पुरुषार्थ प्राप्त केला. चार पैसे हाती आल्यावर त्यांनी परमार्थाची संगत धरली.
फाळणीच्या वेळी आले आणि निर्धन अवस्थेतून आज अनेक जण कोट्यधीश झाले. हा प्रवास फार सुखावह व सोपा नव्हता. इथे आल्यावर काहींनी भाजीपाला विकायला सुरुवात केली, काहींनी कापडाची किरकोळ विक्री सुरू केली, काही ट्रान्सपोर्ट व्यवसायात गेले, तर काही किरकोळ स्वरूपाची सिव्हील बांधकामे, काहींनी विटकाम, खडी अशा व्यवसायात श्रमाची गुंतवणूक करून व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली.

सिंधी समाजातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणून ‘हिंदुजा फॅमिली’चा उल्लेख करावा लागेल. सर्वात मोठे बांधकाम व्यावसायिक म्हणून मेलवानी आणि श्याम सानी (अमेरिका) यांचे नाव घ्यावे लागेल.
सिंधी समाजाचे सामाजिक कार्यातील योगदान लक्षणीय आहे. मुंबई येथील विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शिक्षण व सामाजिक कार्याचा डोंगर त्यांनी उभा केला आहे. साधू वासवानी हॉस्पिटल आणि संशोधन केंद्रातून बहुविध प्रकारची सामाजिक कामे केली जातात. परदेशात जाणा-या दोनशे हुशार उमेदवारांना ते शिष्यवृत्ती देतात. सिंधी उद्योजकांनी या दोन्ही संस्थांना आजपर्यंत काही कोटीत देणग्या दिल्या आहेत. या संस्था सिंधी समाजाप्रमाणेच सर्व धर्माच्या लोकांसाठी काम करत असतात.

मुंबईत वांमुल इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी ऑफ इंजिनिअरिंग, या अतिशय नावाजलेल्या संस्थेप्रमाणेच 15पेक्षा अधिक महाविद्यालये व शिक्षणसंस्था आज ज्ञानदानाचे उत्तम काम करत आहेत. यात जयहिंद कॉलेज आणि के. सी. कॉलेजचा उल्लेख मुद्दाम करावा लागेल. मुंबईची विवेकानंद एज्युकेशन सोसायटी आणि पुण्याची मीरा एज्युकेशन सोसायटी यांनी शिक्षणाचा उत्तम दर्जा सांभाळताना फक्त सिंधी समाजासाठी नव्हे तर सर्वधर्मीयांसाठी या संस्थांची कवाडे उघडी ठेवली आहेत.

सहकारी गृहरचना आणि फ्लॅट सिस्टीमद्वारा अनेकांना घरे देणा-या ‘रहेजा बंधू’चा उल्लेख टाळून कसा चालेल. माहीम, चेंबूर, बॉम्बे सेंट्रल अशा महत्त्वाच्या ठिकाणी जेठी सिपाही, मालानी यांच्या नवजीवन हौसिंग सोसायटीने असंख्य घरे सहकारी तत्त्वावर बांधली आहेत. आदिपूर आणि गांधीधाम या दोन शहरांची उभारणी करणारे भाई प्रताप हे मोठे बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळखले जातात.

पुण्याच्या अतुर संगतानी यांचा उल्लेख केवळ बांधकाम व्यावसायिक म्हणून करता येणार नाही. ‘द पुना हेरॉल्ड’ हे वृत्तपत्र त्यांनी दीर्घकाळ चालवले. संस्थात्मक व औद्योगिक कामाप्रमाणेच बौद्धिक कौशल्याने अनेक सिंधी व्यक्तींचे व्यक्तिगत योगदान दखलपात्र आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. मेन्डा, भारतीय तत्त्वज्ञान काँग्रेसचे जी. आर. मलकानी, इंडियन बार कौन्सिलचे अनेक वर्षे अध्यक्ष असलेले राम जेठमलानी यांची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही.

हरिजन सेवा संघाला आपले आयुष्य देणारे जीवनलाल जयरामदास यांना आपण विसरू शकत नाही. दादा सेवक भोजराज यांच्या ‘बापू व्हिलेज’च्या माध्यमातून आदिवासींसाठी केलेल्या कामाची नोंद घेणे आवश्यक आहे. युएनआय (युनायटेड न्यूज ऑफ इंडिया) ही भारताची अग्रेसर न्यूज एजन्सी. जी. जी. मलकानी यांनी या संस्थेची अनेक वर्षे धुरा सांभाळली. तर अशोक अडवानी यांनी ‘बिझनेस इंडिया’ला प्रतिष्ठा दिली. के. के. वासवानी यांचे स्वामी विवेकानंद केंद्रासाठीचे काम आणि हरी आत्माराम यांचे हिंदू विश्व परिषदेचे विश्वस्त असताना केलेले काम सर्वमान्य आहे.
भारताच्या न्यायव्यवस्थेत सिंधी व्यक्तींनी महत्त्वाच्या जबाबदा-या सांभाळल्या आहेत. न्यायमूर्ती नैन यांनी एमआरटीपीसी (मोनोपोलिज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस कमिशन)ची तर न्यायमूर्ती चइनानी यांनी मुंबई हायकोर्टाचे, तर न्यायमूर्ती थडानी हे आसाम हायकोर्टाचे जज्ज म्हणून कार्यरत होते. टी. एम. अडवानी हे मुंबई आणि काश्मीरचे कुलगुरू होते. के. एल. पंजाबी हे महाराष्‍ट्र राज्याचे मुख्य सचिव होते. एम. के. कृपलानी हे कॅनडात राजदूत होते. अशाप्रकारे उद्योग, बांधकाम क्षेत्राप्रमाणेच बौद्धिक क्षेत्रातही या छोट्याशा सिंधी समाजाने नावलौकिक व प्रतिष्ठा कमावली आहे. हिंदुजा ग्रुप, एचएमटी, अशोक लेलँड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, अडवानी ओरलिंकन्स या मोठ्या उद्योगसंस्था सिंधी समाजातील कर्तृत्ववान लोकांची देणगी आहे.

राजकारणातही सिंधी समाजातील अनेक प्रभृतींनी आपला ठसा उमटवला आहे. आचार्य कृपलानी यांना तर सर्वच पक्षातले लोक मानतात. एल. के. आडवानी, सुचेता कृपलानी, डॉ. चोइथराम, प्रो. एन. आर. मलकानी, राम जेठमलानी, कृष्णा कृपलानी यांनी लोकसभा व राज्यसभेतही आपल्या कार्यकर्तृत्वाची चमक दाखवली आहे. हशु अडवानी यांनी महाराष्‍ट्रात विधानसभेत अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले. काही काळ ते मंत्रीही होते.

कला आणि साहित्य क्षेत्रातील सिंधी समाजाचे योगदान लक्षात घ्यायला हवे. कल्याण अडवानी, एम. यु. मलकानी, लेखराज अझिज, तिर्थ बसंत, राम पुंजवानी, हरु सदारंगानी, पोपटी हिरानंदानी अशा अनेक साहित्यिकांना साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळाले आहेत. कृष्णा कृपलानी यांनी काही काळ साहित्य अकादमीचे अध्यक्षपद व नंतर एन.बी.टी.चीही जबाबदारी सांभाळली आहे. प्रकाशन क्षेत्रातील एच. जी. मिरचंदानी यांच्या ‘इंडिया बुक हाऊस’ या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘अमर चित्रकथा’ने विक्रीचे विक्रम केले आहेत.

सिनेमा क्षेत्रातही सिंधी समाजातील अनेक व्यक्तींनी नाव व प्रसिद्धी मिळवली आहे. भारतभर त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. जी. पी. सिप्पी, एन. सी. सिप्पी आणि अशी अनेक नावे चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात आघाडीवर राहिली आहेत. गोविंद निहलानी, राज सिप्पी, रमेश सिप्पी, कुमार शहाणी अशा दिग्दर्शकांप्रमाणेच सुधीर, राज किरण (मराठी), असरानी, शैला रमाणी, बबीता, साधना अशा अनेक कलावंतांनी व आता त्यांच्या पुढील पिढीनेही मोठी लोकप्रियता मिळवली आहे.

गोरगरिबांना औषधे, रुग्णोपयोगी सेवा, आर्थिक मदत देणारे पंचवीसपेक्षा अधिक सिंधी सोशल ग्रुप पिंपरी (पुणे) येथे आहेत. सिंधु हेल्थ सेंटर, सिंधी सोशल ग्रुप, सिंधी विकास मंडळ अशा अनेक संस्था सर्व धर्मीयांतील गरजू व्यक्तींसाठी काम करत आहेत.

एकूणच विविध उद्योग व्यवसाय, सामाजिक संस्था, साहित्य, राजकारण, सिनेमा अशा बहुविध क्षेत्रांत ठळक कामगिरी करून या समाजाने भारताच्या बौद्धिक व आर्थिक संपत्तीत भर घातली आहे. टाटा मेमोरिअल, जसलोक (मुंबई), बुधरानी (पुणे) अशा हॉस्पिटलमधून होणारी रुग्णसेवा पाहिली, तर सिंधी समाजाने आपले शरणार्थीपण विसरून पराकोटीचा पुरुषार्थ व परमार्थ साधला आहे.

फाळणीनंतर सिंधी समाज महाराष्‍ट्रात आला. या समाजाचे दोन प्रकारे वर्गीकरण केले जाते. (1) आमिल, (2)भाईबंद.
आमिल हे सुशिक्षित, शिकले-सवरलेले. त्यामुळे त्यांनी नोक-या मिळवल्या. या सुशिक्षित सिंधी समाजास ‘आमिल’ म्हणतात. तर ज्यांना चांगली नोकरी मिळवण्याइतपत शिक्षण नव्हते आणि ज्यांना व्यापार करायचा होता किंवा करणे भाग होते, अशा सिंधींना भाईबंद म्हणतात. अर्थातच भाईबंद हे जास्त कष्टाळू, रात्रंदिवस काम करणारे, कामात लहान-मोठे काम असा भेदभाव न करणारे आहेत.

भाईबंद (सिंधी) लोकांची एक व्यापारनीती आहे. ‘थोरे खटिए घणी बर्पत’ म्हणजे थोडाच फायदा मिळवा, त्यात अधिक प्रगती आहे. या तत्त्वानुसार सिंधी समाजातील व्यापारीवर्ग फार मोठ्या नफ्याच्या मार्जिनपेक्षा अधिक काम करून जास्त उलाढाल करणारा आहे.

महाराष्‍ट्रात आलेल्या सिंधी समाजाचे जीवनव्यवहार या पद्धतीने घडत राहिले. फाळणीच्या वेळी आलेल्या सिंधी समाजातील महिलांना पर्दापद्धती (म्हणजे आपल्याकडे गोषापद्धती होती तशी) असल्यामुळे त्या नोकरी-व्यवसायासाठी बाहेर जाऊ शकत नव्हत्या. त्यामुळे घरात बसून करायचे उद्योग त्या करू लागल्या. पापड, शिवणकाम, लोणची व इतर खाद्यपदार्थ बनवणे असे घरात बसून जे करणे शक्य आहे, असा उद्यम करून चार पैसे मिळवण्यात त्या पुरुषांना मदत करू लागल्या. सिंधी लोकांचा हा सगळा प्रवास संघर्षाचा आहे. ज्यांच्या अखंड भारतात सिंधमध्ये शेकडो एकर जमिनी, प्रॉपर्टी होत्या, त्यांच्या मुलांना भारतात आल्यावर रेल्वेतून छोट्या-छोट्या वस्तू विकण्याची वेळ आली.
अशा परिस्थितीतही सिंधी समाजाची आजुबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेण्याची वृत्ती, प्रवाहाविरुद्ध शक्यतो न जाण्याची वृत्ती यांमुळे हा समाज तग धरून पुन्हा उभा राहिला.

सिंधी समाजाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे राष्‍ट्रीय विचारधारांचा आदर करणे. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे, गोळ्या बिस्किट विकेन पण भीक मागणार नाही, पैशासाठी गुन्हेगारी करणार नाही, अशा संस्कारांमुळे सिंधी समाज हा मुख्य राष्‍ट्रीय प्रवाहात सतत राहिला.

‘अढाई घरनि जो खैरू धुरंदो’ या म्हणीप्रमाणे सिंधी समाजाची जीवनशैली राहिली आहे. या म्हणीचा अर्थ, प्रत्येक जवळच्या माणसाचे (अढाई घरनि-अडीच घराच्या अंतरावर) भले चिंतत जाणे व आपले भलेपण त्यात सामावून घेणे. या विचारधारेतून त्यांनी भारतीय समाज आणि राष्‍ट्राला आपले योगदान दिले आहे.

सिंधी समाजजीवनात तीन टप्पे सामावले आहेत.
1. शरणार्थी, 2. पुरुषार्थी, 3. परमार्थी.
विशिष्ट कालपरिस्थितीत ते परिस्थितीशरण झाले, नियतीशरण झाले; पण पुढे आपल्या चिकाटी, मेहनत, कष्टाळू वृत्ती यांतून पुरुषार्थ प्राप्त केला. चार पैसे हाती आल्यावर त्यांनी परमार्थाची संगत धरली.
फाळणीच्या वेळी आले आणि निर्धन अवस्थेतून आज अनेक जण कोट्यधीश झाले. हा प्रवास फार सुखावह व सोपा नव्हता. इथे आल्यावर काहींनी भाजीपाला विकायला सुरुवात केली, काहींनी कापडाची किरकोळ विक्री सुरू केली, काही ट्रान्सपोर्ट व्यवसायात गेले, तर काही किरकोळ स्वरूपाची सिव्हील बांधकामे, काहींनी विटकाम, खडी अशा व्यवसायात श्रमाची गुंतवणूक करून व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली.

सिंधी समाजातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणून ‘हिंदुजा फॅमिली’चा उल्लेख करावा लागेल. सर्वात मोठे बांधकाम व्यावसायिक म्हणून मेलवानी आणि श्याम सानी (अमेरिका) यांचे नाव घ्यावे लागेल.
सिंधी समाजाचे सामाजिक कार्यातील योगदान लक्षणीय आहे. मुंबई येथील विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शिक्षण व सामाजिक कार्याचा डोंगर त्यांनी उभा केला आहे. साधू वासवानी हॉस्पिटल आणि संशोधन केंद्रातून बहुविध प्रकारची सामाजिक कामे केली जातात. परदेशात जाणा-या दोनशे हुशार उमेदवारांना ते शिष्यवृत्ती देतात. सिंधी उद्योजकांनी या दोन्ही संस्थांना आजपर्यंत काही कोटीत देणग्या दिल्या आहेत. या संस्था सिंधी समाजाप्रमाणेच सर्व धर्माच्या लोकांसाठी काम करत असतात.

मुंबईत वांमुल इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी ऑफ इंजिनिअरिंग, या अतिशय नावाजलेल्या संस्थेप्रमाणेच 15पेक्षा अधिक महाविद्यालये व शिक्षणसंस्था आज ज्ञानदानाचे उत्तम काम करत आहेत. यात जयहिंद कॉलेज आणि के. सी. कॉलेजचा उल्लेख मुद्दाम करावा लागेल. मुंबईची विवेकानंद एज्युकेशन सोसायटी आणि पुण्याची मीरा एज्युकेशन सोसायटी यांनी शिक्षणाचा उत्तम दर्जा सांभाळताना फक्त सिंधी समाजासाठी नव्हे तर सर्वधर्मीयांसाठी या संस्थांची कवाडे उघडी ठेवली आहेत.

सहकारी गृहरचना आणि फ्लॅट सिस्टीमद्वारा अनेकांना घरे देणा-या ‘रहेजा बंधू’चा उल्लेख टाळून कसा चालेल. माहीम, चेंबूर, बॉम्बे सेंट्रल अशा महत्त्वाच्या ठिकाणी जेठी सिपाही, मालानी यांच्या नवजीवन हौसिंग सोसायटीने असंख्य घरे सहकारी तत्त्वावर बांधली आहेत. आदिपूर आणि गांधीधाम या दोन शहरांची उभारणी करणारे भाई प्रताप हे मोठे बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळखले जातात.
पुण्याच्या अतुर संगतानी यांचा उल्लेख केवळ बांधकाम व्यावसायिक म्हणून करता येणार नाही. ‘द पुना हेरॉल्ड’ हे वृत्तपत्र त्यांनी दीर्घकाळ चालवले.

संस्थात्मक व औद्योगिक कामाप्रमाणेच बौद्धिक कौशल्याने अनेक सिंधी व्यक्तींचे व्यक्तिगत योगदान दखलपात्र आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. मेन्डा, भारतीय तत्त्वज्ञान काँग्रेसचे जी. आर. मलकानी, इंडियन बार कौन्सिलचे अनेक वर्षे अध्यक्ष असलेले राम जेठमलानी यांची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही.

हरिजन सेवा संघाला आपले आयुष्य देणारे जीवनलाल जयरामदास यांना आपण विसरू शकत नाही. दादा सेवक भोजराज यांच्या ‘बापू व्हिलेज’च्या माध्यमातून आदिवासींसाठी केलेल्या कामाची नोंद घेणे आवश्यक आहे. युएनआय (युनायटेड न्यूज ऑफ इंडिया) ही भारताची अग्रेसर न्यूज एजन्सी. जी. जी. मलकानी यांनी या संस्थेची अनेक वर्षे धुरा सांभाळली. तर अशोक अडवानी यांनी ‘बिझनेस इंडिया’ला प्रतिष्ठा दिली. के. के. वासवानी यांचे स्वामी विवेकानंद केंद्रासाठीचे काम आणि हरी आत्माराम यांचे हिंदू विश्व परिषदेचे विश्वस्त असताना केलेले काम सर्वमान्य आहे.
भारताच्या न्यायव्यवस्थेत सिंधी व्यक्तींनी महत्त्वाच्या जबाबदा-या सांभाळल्या आहेत. न्यायमूर्ती नैन यांनी एमआरटीपीसी (मोनोपोलिज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस कमिशन)ची तर न्यायमूर्ती चइनानी यांनी मुंबई हायकोर्टाचे, तर न्यायमूर्ती थडानी हे आसाम हायकोर्टाचे जज्ज म्हणून कार्यरत होते. टी. एम. अडवानी हे मुंबई आणि काश्मीरचे कुलगुरू होते. के. एल. पंजाबी हे महाराष्‍ट्र राज्याचे मुख्य सचिव होते. एम. के. कृपलानी हे कॅनडात राजदूत होते. अशाप्रकारे उद्योग, बांधकाम क्षेत्राप्रमाणेच बौद्धिक क्षेत्रातही या छोट्याशा सिंधी समाजाने नावलौकिक व प्रतिष्ठा कमावली आहे. हिंदुजा ग्रुप, एचएमटी, अशोक लेलँड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, अडवानी ओरलिंकन्स या मोठ्या उद्योगसंस्था सिंधी समाजातील कर्तृत्ववान लोकांची देणगी आहे.

राजकारणातही सिंधी समाजातील अनेक प्रभृतींनी आपला ठसा उमटवला आहे. आचार्य कृपलानी यांना तर सर्वच पक्षातले लोक मानतात. एल. के. आडवानी, सुचेता कृपलानी, डॉ. चोइथराम, प्रो. एन. आर. मलकानी, राम जेठमलानी, कृष्णा कृपलानी यांनी लोकसभा व राज्यसभेतही आपल्या कार्यकर्तृत्वाची चमक दाखवली आहे. हशु अडवानी यांनी महाराष्‍ट्रात विधानसभेत अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले. काही काळ ते मंत्रीही होते.
कला आणि साहित्य क्षेत्रातील सिंधी समाजाचे योगदान लक्षात घ्यायला हवे. कल्याण अडवानी, एम. यु. मलकानी, लेखराज अझिज, तिर्थ बसंत, राम पुंजवानी, हरु सदारंगानी, पोपटी हिरानंदानी अशा अनेक साहित्यिकांना साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळाले आहेत. कृष्णा कृपलानी यांनी काही काळ साहित्य अकादमीचे अध्यक्षपद व नंतर एन.बी.टी.चीही जबाबदारी सांभाळली आहे. प्रकाशन क्षेत्रातील एच. जी. मिरचंदानी यांच्या ‘इंडिया बुक हाऊस’ या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘अमर चित्रकथा’ने विक्रीचे विक्रम केले आहेत.

सिनेमा क्षेत्रातही सिंधी समाजातील अनेक व्यक्तींनी नाव व प्रसिद्धी मिळवली आहे. भारतभर त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. जी. पी. सिप्पी, एन. सी. सिप्पी आणि अशी अनेक नावे चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात आघाडीवर राहिली आहेत. गोविंद निहलानी, राज सिप्पी, रमेश सिप्पी, कुमार शहाणी अशा दिग्दर्शकांप्रमाणेच सुधीर, राज किरण (मराठी), असरानी, शैला रमाणी, बबीता, साधना अशा अनेक कलावंतांनी व आता त्यांच्या पुढील पिढीनेही मोठी लोकप्रियता मिळवली आहे.

गोरगरिबांना औषधे, रुग्णोपयोगी सेवा, आर्थिक मदत देणारे पंचवीसपेक्षा अधिक सिंधी सोशल ग्रुप पिंपरी (पुणे) येथे आहेत. सिंधु हेल्थ सेंटर, सिंधी सोशल ग्रुप, सिंधी विकास मंडळ अशा अनेक संस्था सर्व धर्मीयांतील गरजू व्यक्तींसाठी काम करत आहेत.

एकूणच विविध उद्योग व्यवसाय, सामाजिक संस्था, साहित्य, राजकारण, सिनेमा अशा बहुविध क्षेत्रांत ठळक कामगिरी करून या समाजाने भारताच्या बौद्धिक व आर्थिक संपत्तीत भर घातली आहे. टाटा मेमोरिअल, जसलोक (मुंबई), बुधरानी (पुणे) अशा हॉस्पिटलमधून होणारी रुग्णसेवा पाहिली, तर सिंधी समाजाने आपले शरणार्थीपण विसरून पराकोटीचा पुरुषार्थ व परमार्थ साधला आहे.

arunjakhade@padmagandha.com