आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manjiri Kalwit Article About Waste Management And Civic Response Team

कचऱ्याची कोंडी फोडू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालिकेचे कर्मचारी येतील, आपली कचराकुंडी स्वच्छ करतील, या आशेवर किती दिवस बसणार? आपल्या घरातूनच निघणाऱ्या कचऱ्याचं वेळीच वर्गीकरण आणि व्यवस्थापनाची सोय केल्यास हा प्रश्नच जन्म घेणार नाही. कोणत्याही भागातील कचऱ्याचं १०० टक्के व्यवस्थापन होऊ शकतं, हे सिद्ध केलंय या त्रिकुटानं. तेही आनंदी, उत्साही अन् आरोग्यदायी वातावरणात.

औरंगाबाद, झपाट्याने बेसुमार वाढणाऱ्या भारतातील शहरांपैकी एक. या शहराचाच एक भाग असलेल्या वाळूज महानगरात एप्रिलमध्ये एक आनंदनगरी भरली होती. पण चटपटीत खाद्यपदार्थांऐवजी आनंदनगरीत स्वच्छतेशी संबंधित विविध स्टॉल, बचत गट, कचरावेचक महिला आदी सहभागी झाले होते. आपलं घर, आपली नगरी नव्यानं थाटू पाहणाऱ्या इथल्या नागरिकांनीही उत्साहानं यात सहभाग नोंदवला. घरातल्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, कॉलनीतल्या कचराकुंड्यांना घाणेरडे स्वरूप येण्यापासून कसे रोखायचे, शहरातल्या इतर भागांप्रमाणे आपली नवी वसाहतही ओंगळवाणी होऊ नये, यासाठी काय करता येईल हे सगळं इथल्या नागरिकांनी स्वच्छतेच्या आनंदनगरीतून समजून घेतलं. सीआरटी संस्थेच्या पुढाकाराने ही आनंदनगरी भरवण्यात आली. इथल्या प्रात्यक्षिकांनुसार नागरिकांनी आपल्या घरात, कॉलनीत कचरा व्यवस्थापन प्रक्रिया राबवायला सुरुवातही केली आहे. वाळूजच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्लॅनिंग मॅनेजर म्हणून सीआरटी संस्थेची नेमणूक झाली आहे आणि या संस्थेच्या नावामागे आहे उत्साही महिलांचं त्रिकूट. जेमतेम २६ वर्षांची गौरी मिराशी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून अर्बन पॉलिसी अँड गव्हर्नन्सचं शिक्षण घेतलेली. घनकचरा व्यवस्थापन आिण अन्य कायद्यांचा उत्तम अभ्यास असलेली नताशा झरीन. बिल गेट्स फाउंडेशनची यंग इंडिया फेलेशिपही मिळवलेली ही जिद्दी तरुणी. आणि एमबीए सनवीर छाबडा. उच्च शिक्षण आणि आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या या तिघींनी कॉर्पोरेटमध्ये नोकरी न करता, शिक्षणाचा समाजासाठी काही तरी उपयोग व्हावा, या हेतूने नवे मार्ग शोधले. दीड वर्षापूर्वी अगदी योगायोगाने एकत्र आल्या आणि सिव्हिक रिस्पॉन्स टीम अर्थात सीआरटीची स्थापना झाली. देशात घनकचरा व्यवस्थापनात रोल मॉडेल ठरलेल्या बंगळुरू आणि पुण्यातील ‘स्वच्छ’ संस्थेच्या धर्तीवर औरंगाबादमधल्या कचऱ्याचंही १०० टक्के वर्गीकरण करून दाखवू या जिद्दीला पेटलेल्या या त्रिकुटानं शहरात प्रायोगिक स्तरावर विविध कॉलन्यांमध्ये यशस्वी प्रयोग केले. शहराच्या सिडको वॉर्ड क्रमांक ७२ मध्ये अवघ्या तीन आठवड्यांत सीआरटी आिण पालिका प्रशासनाच्या सक्रिय सहभागाने घनकचऱ्याचं १०० टक्के वर्गीकरण झालं. घनकचरा व्यवस्थापन कायदा २०००ची अंमलबजावणी करणारा हा राज्यातील पहिला वॉर्ड ठरला.
गौरी सांगते, कचरा निर्मूलन अथवा व्यवस्थापन ही फार काही मोठी समस्या नाही. लोक म्हणतात, आम्ही कचरा वेळच्या वेळी बाहेर टाकतो. पण कचरा उचलणारा कर्मचारी किंवा घंटागाडी वेळच्या वेळी येत नाही. कित्येक दिवस कचरा घरात ठेवावा लागतो नाही तर कचराकुंडीवर टाकावा लागतो. यामुळे कचराकुंडीभोवतीचा परिसरही ओंगळवाणा होतो. औरंगाबादमधीलच नारेगाव इथल्या कचरा डेपोवर दररोज फेकल्या जाणाऱ्या ३५० टन कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, हा पालिकेसमोरील मोठा प्रश्न होता. आम्ही ज्या कॉलनीत कचऱ्याचं व्यवस्थापन केलं तिथून नारेगावला जाणाऱ्या ८० टक्के कचऱ्याची कॉलनीतच विल्हेवाट लावली. आपण फक्त पालिकेच्या नावाने ओरडत असतो. पण या कचऱ्याचे योग्य वर्गीकरण केल्यास पालिका कर्मचाऱ्यांवरही ताण येणार नाही आणि आपला परिसर स्वच्छ होईल.
पुढील स्लाइड्सवर पाहा, शहरातल्या सिंधी कॉलनीत कचरामुक्तीचे हे नवे मॉडेल राबवायला कशी केली सुरुवात?