आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरहुन्नरी सचिन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता या तिन्ही भूमिकांमध्ये सचिन यांची यशस्वी कारकीर्द आहे. मुख्य म्हणजे मराठीप्रमाणेच हिंदी तसेच काही भोजपुरी चित्रपटांतूनही सचिन नायक म्हणून चमकले आहेत. कृष्णधवल चित्रपटांचा 1960 च्या सुमाराचा काळ सचिन यांनी बालकलाकार म्हणून गाजवला आहे. हा माझा मार्ग एकला (1962) हा सचिन यांचा बालकलाकार म्हणून पहिला चित्रपट होता.
नायक म्हणून सचिन यांचे गीत गाता चल (1975), बालिकावधू (1976), अंखियों के झरोके से (1978) तसेच नदिया के पार (1982) हे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही यशस्वी ठरले. त्यानंतर मात्र हिंदी चित्रपटात प्रामुख्याने सहायक भूमिका त्यांनी केलेल्या दिसतात. शोले, त्रिशूल, सत्ते पे सत्ता, अवतार, सूरसंगम अशी अनेक नावे सांगता येतील. सुभाष घई यांच्यासाठी सचिन यांनी ‘प्रेमदीवाने’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यात माधुरी दीक्षित, ज्ॉकी र्शॉफ, पूजा भट, विवेक मुर्शन यांच्या भूमिका होत्या.
मराठी चित्रपटात सचिन यांनी 1982 च्या ‘मायबाप’ चित्रपटापासून दिग्दर्शनास प्रारंभ केला. नवरी मिळे नवर्‍याला, गंमतजंमत, माझा पती करोडपती, अशी ही बनवाबनवी, आमच्यासारखे आम्हीच, भुताचा भाऊ, आत्मविश्वास, एकापेक्षा एक, आयत्या घरात घरोबा, कुंकू, नवरा माझा नवसाचा, आम्ही सातपुते, आयडियाची कल्पना असे अनेक चित्रपट सचिन यांच्या कल्पक दिग्दर्शनाचे उत्तम नमुने आहेत. यातील 80 टक्क्यांहून अधिक चित्रपट व्यावसायिकदृष्ट्याही अत्यंत यशस्वी ठरले, हे आवर्जून सांगायला हवे. अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून सचिन यांनी आपली कारकीर्द गाजवली आहे. छोट्या पडद्यावरही तू तू मैं मैं, हद कर दी, एकापेक्षा एक अशा मालिका त्यांनी यशस्वी केल्या. ‘नच बलिये’ या रिअँलिटी शोचे विजेतेपद मिळवले. सतत पन्नास वर्षे रुपेरी पडद्यावर टिकून राहणे ही गोष्ट सोपी नाही. कालचे स्टार इथे आज एक्स्ट्रा म्हणून वावरतात. हीरोचा एका क्षणात झीरो बनतो. या पार्श्वभूमीवर सचिन यांचे कर्तृत्व प्रशंसनीय आहे.