आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Celebrity Talk About Their Memories Of Food Culture In Diwali

दिवाळीची आठवण : वाचा सेलिब्रिटींच्या मनातील रुचकर आठवणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळी हा सण आपल्या प्रत्येकासाठी अनेक आठवणींचा ठेवा असलेला असा सण आहे. विशेषतः आपण जसेजसे मोठे होऊ लागतो, तस तशा लहानपणीच्या दिवाळीच्या आठवणी आपल्या मनात दाटून यायला लागतात. दिवाळीची लगबग सुरू झाली, की या आठवणी आपण अनेकांबरोबर सहज शेअर करू लागतो. अवघ्या महाराष्ट्राच्या हृदयामध्ये घर केलेल्या सेलिब्रिटींही त्याला अपवाद नाहीत. अशाच काही खास व्यक्ती आज त्यांच्या आठवणी आपल्याबरोबर शेअर करत आहेत.


सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री

डाएट करंज्यांची वाट पाहतेय
मला चकली आणि करंज्या करायला खूप आवडतात. दिवाळीत तरी मला फराळ बनवायला आवडतो. करंज्या लाटणेे, त्यात सारण भरून तळणे, या माझ्या आवडीच्या गोष्टी. माझी आजी उत्तम करंज्या करते आणि आई खमंग चकल्या. त्यामुळेच कदाचित मला चकल्या खायला खूप आवडतात. जे खायला आवडतं तेच करण्याकडेही आपला जास्त कल असतो. त्यामुळे आई चकल्या करत असताना माझी लुडबूड असतेच. मी एकटीने कधी दिवाळी फराळ केलेला नाही. पण आई करत असते, तेव्हा मी तिला मदतीला जाते. मी करत असताना आई समोर असते. त्यामुळेच माझ्या चकल्या किंवा करंज्या मोडत नाहीत. काही चुकीचं झालं तर आई सावरतेच. त्यामुळे सुदैवाने माझ्या हातचा मोडलेला फराळ कोणाला खावा लागलेला नाही. माझी आई आजकाल डाएटविषयीचे कुकरी शो पाहते. त्यामूळे यंदा आमच्या घरी डाएट करंज्या आणि डाएट चकल्या बनल्या तर मला नवल वाटणार नाही.
पुढे वाचा, काय सांगतोय अभिनेता जीतेंद्र जोशी...