आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीस वर्षांपासून भाषासमृद्धीचे काम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांमध्ये मराठी वाङ्मयाची आवड निर्माण होऊन त्यांच्या वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी मत्स्योदरी महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे गेल्या 20 वर्षांपासून वाङ्मय मंडळाच्या माध्यामातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

विद्यार्थीच करतात मंडळाचे संचलन :
विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञान घेऊन शिक्षण घेत असल्याने त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण देण्याचा प्रयत्न वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून केले जात आहे. मत्स्योदरी महाविद्यालयात 1992 पासून हे मराठी वाङ्मय मंडळ स्थापन झाले. या मंडळामध्ये सर्व प्रकारचे नियंत्रण हे विद्यार्थ्यांचे असते. महाविद्यालयातील मराठी, हिंदी, उर्दू भाषेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते व त्यामधून एक समिती स्थापन करण्यात येते यासाठी निवड चाचणी घेतली जाते. त्यामधून वर्षभरासाठी 8 प्रतिनिधींची निवड करण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सर्व भाषा विषयाच्या प्राध्यापकांची वाङ्मय समिती स्थापन करण्यात येते.

लेखक आपल्या भेटीला, लेखनविकास कौशल्य कार्यशाळा, भित्तिपत्रक आदी उपक्रम :
मंडळाच्या माध्यमातून भाषा विकासासाठी लेखक आपल्या भेटीला, उपयोगीत मराठी लेखन विकास कौशल्य कार्यशाळा, वार्षिक अंक, मला आवडलेले पुस्तक यावर स्पर्धा घेतली जाते. तसेच सामाजिक ज्वलंत विषयावर मंडळाच्या वतीने जनजागृती करण्यात येत. तसेच पथनाट्य, कार्यशाळा, भित्तिपत्रक या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यात येते. अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून वाङ्मय मंडळ कार्य करत आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्मिती :- गत वीस वर्षांपासून मराठी वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषाविषयी आवड निर्माण केली जात आहे. तसेच सामाजिक प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात येते. सर्वच स्टाफचे येथे मोठे योगदान आहे. प्रा.बसवराज कोरे, कार्यक्रम अधिकारी आहेत.