आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marmik Godase, Nashik Article About Supplements, Divya Marathi

‘सप्लिमेंट’चा पुरवठा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्याची सुरुवात झाली रे झाली की कॉलेजीयन्सना लहर येते ती वेट गेन आणि फिटनेसची आणि यासाठी कॉलेजीयन्सची पावलं घराशेजारील जिमकडे वळू लागतात. कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त वेट गेन किंवा फिटनेस मिळवण्याचा उद्देश असतो आणि ह्या उद्देशापर्यंत तुम्हाला नेण्यासाठी बाजारात अनेक सप्लिमेंट्ससुद्धा उपलब्ध आहेत. सप्लिमेंट्स? का? ऐकून धक्का बसला का ? हो सप्लिमेंट्सच .. आपण रोज जे अन्न खातो त्यामध्येदेखील प्रथिने, कर्बोदके आणि जीवनसत्त्व असतात परंतु प्रत्येक पदार्थात वेगवेगळे असते. आपल्या शरीराच्या वजनाच्या प्रमाणात प्रथिने आपल्या शरीरात गेली पाहिजेत जसे तुमचे वजन 50 किलो असेल तर रोज 50 ग्रॅम प्रथिनांची गरज शरीरास असते. असे शरीराचे आणि प्रथिनांचे गुणोत्तर असते.

साइड इफेक्ट नसतात
भारतामध्ये सप्लिमेंट्सबद्दल खूप गैरसमज आहेत. सप्लिमेंट्स म्हटलं की लोक कानाला हात लावतात आणि म्हणतात नको रे बाबा! त्याचे साइड इफेक्ट असतात! पण आता हा गैरसमज दूर करायला हवा कारण सप्लिमेंट्समध्येदेखील प्रथिने,कर्बोदके,जीवनसत्त्वे असून ते पाणी केव्हा दुधाच्यामार्फत घेतल्यास ते पचवावयास हलके जाते आणि शरीर ते लगेचच ग्रहण करून झालेली झीज भरून काढते. त्याचप्रमाणे अमिनो आम्ल, जीवनसत्त्व. अ, ब, क झिंक इ. घटक जे तुम्हाला रोजच्या आहारातून कमी प्रमाणात मिळतात. ते तुम्हाला सप्लिमेंट्सद्वारे मिळून तुमच्या शरीराची वाढ करण्यास मदत करतात

व्यायामाच्या आधी म्हणजे pre workout आणि व्यायामानंतर post workout सप्लिमेंट्सचा वापर केल्यास तुम्हाला शरीरात आमूलाग्र बदल लवकरच दिसू लागतील. त्याला pre workout diet आणि post workout diet असे म्हणतात pre workout व्यायामाच्या आदी सेवन केल्यास कर्बोदके तुम्हाला ऊर्जा देतात जी तुमच्या व्यायामामध्ये योग्यपणा आणतात आणि post workout सेवन केल्यास तुमची झीज भरून काढण्यास मदत करतात. चांगली तब्येत कमावण्यासाठी व्यायामपण केलाच पाहिजे.

सप्लिमेंट्सविषयी जागरूकता
सप्लिमेंट्स घेताना तुम्हाला त्या डब्ब्यावर Nutritional facts मध्ये त्यातील समाविष्ट घटकांची माहिती दिलेलीच असते. मोठ्या शहरांमध्ये ही सप्लिमेंट्स कुठेही उपलब्ध आहेत. तर विविध गावांमधील जिममध्येही ट्रेनरला या सप्लिमेंटबद्दल माहिती असते. चला तर मग वाट काय बघता जिम आणि डाएट सुरू करा आणि फिट राहा

गैरसमज दूर झालाच पाहिजे
प्रोटीनविषयी गैरसमज आहे. आपल्या जेवणामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन्स मिळत नाहीत त्यासाठी आपणही प्रोटीन सप्लिमेंट्स वापरतो. आणि ह्या सप्लिमेंट्समुळे जी प्रोटीनची गरज आहे ती भरून काढण्यास मदत होते. सप्लिमेंट्सच्या वापराने शरीराला काहीच धोका निर्माण होत नाही पण ती सप्लिमेंट्स वापरताना त्यातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ल्यानुसारच वापरावे, असे हेल्थ न्यूट्रिशनलिस्ट रवि पवार यांनी सांगितले.

आपण अपडेट झाले पाहिजे
जग बदलत चालले आहे आणि त्याबरोबर आपले ज्ञानदेखील अपडेट झालेच पाहिजे. सप्लिमेंट्सविषयीचा जो गैरसमज आहे तो दूर झालाच पाहिजे. परंतु सप्लिमेंट्स घेताना ती सप्लिमेंट्स न्यूट्रिशनलिस्ट किंवा त्या विषयातील जाणकार व्यक्तीकडून सल्ला घेऊनच वापरावी ज्याने तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल, असे डॉक्टर नीलिमा कदम यांनी सांगितले.