Home | Magazine | Madhurima | marriage-anniversary-neela

वाढदिवस साजरा करण्याची पद्धत नाही आमच्याकडे

नीला पद्मन, कोल्हापूर | Update - Jun 04, 2011, 12:15 PM IST

बाई अशी पद्धतच नाही

  • marriage-anniversary-neela

    आज मी 53 वर्षांची आहे, दोन मुली आहेत. एक कमावती, तर एक शिकते आहे. नव-याची नोकरी उत्तम आहे. गेल्या दहा वर्षांपासून माझा वाढदिवस खूप दणक्यात साजरा होतो. नवरा आणि मुलीच नव्हे, तर मैत्रिणीसुद्धा आठवण ठेवून काहीतरी देतात, मध्यरात्री बारा वाजताच केक कापला जातो, छान जेवण होते. पण तरी दरवर्षी मला माझा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आठवतोच. तीसहून अधिक वर्षे झाली लग्नाला आता. माझे माहेर ठाण्यातले तर सासर देशावरचे, गावाकडचे.
    सासूबाई पूर्णपणे निरक्षर, नव-याने मुंबईत नोकरी करून पाठवलेल्या पैशावर संसाराचा गाडा चालवणा-या. मी ग्रॅज्युएट, नवरा इंजिनिअर. माझ्या वाढदिवसाला नवरा बाहेरगावी गेला होता, तेव्हा फोन नव्हता घरी. त्यामुळे फोनवरून शुभेच्छा मिळण्याचा प्रश्रच नव्हता. घरी सर्वांना माहीत होते, परंतु कोणीच मला काही बोलले नाही. आमच्याकडे बाई असे कोणाचेच वाढदिवस साजरे करण्याची पद्धत नाही, एवढेच मला सांगण्यात आले. मुलींची म्हणजे माझ्या नणंदांची बारशीसुद्धा झाली होती ती केवळ नाव ठेवायचे असते यासाठी. माझे लग्न होईपर्यंत परिस्थिती बरीच सुधारली होती. इथे प्रश्र वृत्तीचा होता, प्रथांचा होता, घरातल्या नव्या सुनेचे वा मुलींचे कौतुक करण्यातल्या अगत्याचा होता.

Trending