आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये एमबीबीएस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक उदारीकरणाच्या धोरणामुळे 30 वर्षांत चीनचा कायापालट झाला आहे. जगातला सगळ्यात मोठा उत्पादक असून निर्यातीत चीनचा पहिला क्रमांक आहे. चीनकडे परकीय गंगाजळीही इतर देशांपेक्षा जास्त आहे. चीनच्या वेगवान आर्थिक प्रगतीचा वेग पाहता 2025 मध्ये चीनची अर्थव्यवस्था जगात अग्रेसर राहील असे बोलले जाते. चीनची उद्योग व व्यापार क्षेत्राबरोबर शिक्षण क्षेत्रातही घोडदौड सुरू आहे. इंजिनिअरिंग व टेक्निकल, मेडिकल व बायोलॉजी या विषयांमध्ये चीनमधील शिक्षण सर्वेत्तम असून चीनमधील वाईफँग मेडिकल युनिव्हर्सिटी (वामेयु) ही एक अग्रगण्य संस्था आहे.

वाईफँग मेडिकल युनिव्हर्सिटी (वामेयु)
वामेयु हे 100 वर्षे जुने वैद्यकीय विद्यापीठ बीजिंगमध्ये आहे. सुमारे 12 दशलक्ष चौ.मीटरहून मोठे क्षेत्रफळ असलेल्या आवारात हे विद्यापीठ वसले आहे. बीजिंगचे हवामान दिल्ली शहरासारखे आहे. या विद्यापीठातील बहुतेक प्राध्यापक पीएचडी आहेत.
वामेयुमधील एमबीबीएस अभ्यासक्रम

या अभ्यासक्रमाचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
* हा अभ्यासक्रम इंग्रजी भाषेत शिकवला जातो, पण विद्यार्थ्यांना पहिली दोन वर्षे चिनी भाषा शिकावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना चिनी रुग्णाशी बोलता येते.
* दरवर्षी दोन बॅचेस घेतात, म्हणजे सप्टेंबर व मार्च महिन्यात.
* शिक्षणाची कालावधी 5 वर्षांचा आहे.
* या अभ्यासक्राला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन व मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे.
* या अभ्यासक्रमाचा 5 वर्षांचा खर्च आहे रु. 14.01 लाख. यामध्ये शिक्षणाचा, चीनमध्ये राहण्याचा व आमच्या प्रवेश प्रक्रिया फीचा समावेश आहे. साधारणपणे प्रतिवर्षी 27,625 रुपयांचा खर्च येत असून पहिल्या वर्षी 1 लाख 95 हजार रुपये हा प्रवेश प्रक्रियेचा खर्च अधिक आहे.

रशियन वैद्यकीय शिक्षणातील उणिवा - बरेच विद्यार्थी रशियात एमबीबीएस शिक्षणाचा विचार करतात, परंतु चीनमध्ये शिक्षण सुकर आहे ते खालील कारणांमुळे :
* चीनमध्ये एमबीबीएस करण्यासाठी 5 वर्षे लागतात, तर रशियात 6 वर्षे लागतात.
* चीनमध्ये शिक्षणाचा दर्जा रशियाच्या तुलनेत चांगला आहे.
* भारतीय विद्यार्थांसाठी रशियन हवामान सोयीचे नाही. तिथे तापमान -5 ते -20 सेंटिग्रेड असते.

प्रक्रियेचा कालावधी :
पुढली बॅच 15 सप्टेंबरला सुरू होईल. विद्यार्थ्याने नोंदणी केल्यानंतर 10 दिवसांत चिनी विद्यापीठाचे ऑफर लेटर मिळते. चीनमध्ये राहण्याचा परवाना (व्हिसा) इतर कागदपत्रे दाखल केल्यावर 15 दिवसांत मिळतो.

वामेयुचे वसतिगृह : या विद्यापीठाच्या वसतिगृहात एका खोलीत 2 विद्यार्थी राहतात. प्रत्येक खोलीत फोन, इंटरनेट व टेलिव्हिजनची सोय आहे. मुला व मुलींकरिता वेगळ्या खोल्या आहेत.

वामेयुमधील जेवणाची व्यवस्था : वसतिगृहात शाकाहारी/मांसाहारी तसेच भारतीय पद्धतीचे जेवण मिळते. चीनमध्ये महागाई नसल्यामुळे बरेच विद्यार्थी बाहेरच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातात.

एमसीआयची नोंदणी : भारतात डॉक्टर म्हणून नोंदणी करण्यासाठी विदेशात एमबीबीएस मिळवणार्‍या विद्यार्थ्याला मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची परीक्षा पास होणे जरुरीचे असते. दर 6 महिन्यांनी ही परीक्षा दिल्लीत घेतली जाते.
या परीक्षेकरिता दिल्लीमध्ये कोचिंग क्लासेस आहेत. साधारणपणे 2/3 महिन्यांचे कोचिंग पुरेसे असते. कोचिंग क्लासची फी रु. 5,000/- प्रतिमहिना आहे. चीनमधून डॉक्टर झालेले 60 - 65% विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात एमसीआयची परीक्षा उत्तीर्ण होतात. दिल्लीत ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रत्येक डॉक्टरला 1 वर्ष इंटर्नशिप करणे जरुरीचे असते. डॉक्टरने ही इंटर्नशिप दिल्लीबाहेर केली तर त्याला एमसीआयमध्ये 1 लाख रु.भरावे लागतात. उत्तम गुण मिळवूनदेखील जर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थ्याला लाखो रुपये देऊन खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. यापेक्षा चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणे हाच योग्य मार्ग आहे.

अधिक माहितीसाठी www.learningoverseas.inया वेबसाइटवर भेट द्या.