आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेडिकल, इंजिनिअरिंगसाठी चला रशियाला...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय विद्यार्थ्यांकडून रशियन विद्यापीठांमधील वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि उच्च पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचे प्रमाण वाढत आहे. ‘एड्युरशिया’ भारतात रशियन सरकारच्या विद्यापीठांमधील आंतरराष्‍ट्रीय विद्यार्थी विभागातील प्रवेशासाठीचे अधिकृत प्रवेश कार्यालय म्हणून काम करते. रशियामध्ये एमबीबीएस आणि बीडीएस हे पदवी अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये घेतले जातात. या पदव्यांना भारत आणि इतर देशांमध्ये मान्यता आहे. रशियातील विद्यापीठे विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवीबरोबरच ‘युरोपियन अ‍ॅपेन्हीक्स’ही देते. म्हणजे ज्यामुळे विद्यार्थ्यांना युरोपियन देशांमध्ये आपले पुढील शिक्षण चालू ठेवता येते किंवा करिअर घडविता येते.


रशियात शिक्षण घेताना जेवण, स्थानिक प्रवास आणि वैयक्तिक खर्च या सर्व बाबी पकडून येणारा खर्च हा प्रतिविद्यार्थी प्रतिमहा साधारण 150 डॉलर्स म्हणजे 8000 ते 10,000 रुपयांच्या घरात येतो. रशियातील सर्व विद्यापीठे ही सरकारच्या मालकीची असून त्यांना रशियन सरकारकडून अनुदान मिळते. याचाच अर्थ असा की विद्यापीठातील शुल्कांमध्ये विद्यार्थ्यांना सवलत दिली जाते. हे सर्व फायदे आंतरराष्‍ट्रीय विद्यार्थ्यांना मिळतात. रशियन विद्यापीठांची फी ही प्रतिवर्ष 2.5 ते 3 लाख रुपये एवढी आहे. त्यात हॉस्टेलचा खर्च आणि वैद्यकीय विम्याचाही समावेश होतो. रशियन राष्‍ट्रसंघामध्ये उच्च शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांना भारतीय बँका शैक्षणिक कर्जाची सुविधा प्राप्त करून देतात.


रशियातील शिक्षणाच्या दर्जाबाबत बोलायचे तर, भारतीय विद्यार्थ्यांना ज्या विद्यापीठांमधील प्रवेश प्रस्तावित केला आहे, त्या सर्वच विद्यापीठांमध्ये आंतरराष्‍ट्रीय अभ्यासक्रम शिकविला जातो. त्याशिवाय येथील शिक्षकांची अध्यापनाची रीत ही जागतिक स्तरावर उच्चतम अशीच आहे. उदा. प्रत्येक वर्गामध्ये कमाल 10 ते 12 विद्यार्थी असतात आणि परदेशी विद्यार्थ्यांना समजावे म्हणून सर्व अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये शिकवले जातात. त्यासाठी शिक्षकांना विशेष असे प्रशिक्षण दिले जाते. नियमितपणे चाचण्या घेतल्या जात असल्याने विद्यार्थ्यांची निरंतर प्रगती होत राहते. त्यामुळे वर्षाच्या शेवटी येणाºया वार्षिक परीक्षेचा तणावही कमी होतो.
ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश व अधिक माहिती हवी असेल त्यांनी ‘एड्युरशिया’च्या प्रवेश विभागाशी पुढील दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधा -(+91) 9920868727/ 9769559855/ (022)65295354/ 65174444 त्याशिवाय विद्यार्थी www.edurussia.in
वर जात ऑनलाइन अर्जही दाखल करू शकतात.