आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वांसाठी मेडिकलचे जनरल नॉलेज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज या पुस्तकाची आठवी आवृत्ती प्रसिद्ध झाली आणि लवकरच नववी आवृत्ती बाजारात येईल सुंदर अर्थपूर्ण सर्वांच्या मनात असलेले प्रश्न आणि चित्र असलेले मुखपृष्ठ हे देखील त्याचे आकर्षक बाह्यरूप म्हणता येईल. साध्या प्रश्नातून आरोग्य जागृती असे त्याचे स्वरूप आहे. ताप का येतो, रक्तगट कशावरून ठरवतात, सॅकरीन म्हणजे काय, तोंड येते म्हणजे काय, उपास करणे चांगले की वाईट, घरातील पिण्याचे पाणी शुद्ध कसे करावे, माझे वजन व उंची किती असावी, दूषित पाण्यामुळे कोणते आजार होतात, उच्च रक्तदाब म्हणजे काय, जमालगोटा म्हणजे काय, कम्पोस्ट म्हणजे काय, जंतूंचा शोध कुणी लावला, आजकाल देवीची लस का देत नाहीत, नागीण का होते, अमांश का होतो, लघवीस वारंवार का जावे लागते, हिमोफिलिया म्हणजे काय, क्षयरोग म्हणजे काय, तो बरा होतो का, कुष्ठरोग्याचे नाक बसके का होते, सायकल चालवल्याने हृदयाला घट्टे का पडतात, पोटात उठणे म्हणजे काय, गॅस्ट्रोकोपी म्हणजे काय, कावीळ म्हणजे काय, लहान व मोठ्या मेंदूत काय फरक असतो, चव कशी समजते, उवा का होतात, कानात तेल टाकावे की नाही, गोळ्या चांगल्या की इंजेक्शन, झटके का येतात-त्यावर उपाय काय, तोंड येते म्हणजे काय, हवाबंद डब्यातील अन्न खाल्ल्याने विषबाधा होते का, कांचबिंदू म्हणजे काय, अश्रुधूर म्हणजे काय, गॅँगरीन म्हणजे काय, लिंबुपाणी पिल्याने आम्लपित्त कमी होते का, पल्स पोलिओ म्हणजे काय, अ‍ॅँजिओप्लास्टी म्हणजे काय, करणी म्हणजे काय, म्हाता-या लोकांच्या चेह-यावर सुरकुत्या का पडतात, मुले अंथरुणात लघवी का करतात, पाण्याच्या खाली जातांना पाणबुड्यांच्या शरीरात काही बदल होतात का, तापमान जास्त असल्यास थकवा लवकर का येतो, इलिझॉरॉव्ह तंत्र म्हणजे काय. अशा 93 प्रश्नांची सरळ साध्या सोप्या भाषेत डॉ. जगन्नाथ व अंजली दीक्षित यांनी माहिती दिली आहेत. साधारणत: 100 ते 150-200शब्दांत एका एका प्रश्नाचे-मुद्द्याचे उत्तर दिले आहे व एक एक प्रश्न मुद्द्यांच्या स्वरूपात मांडला आहे. त्यास तितकीच समर्पक साधी व्यगचित्रे मुद्द्यांच्या शीर्षकाच्या बाजूस काढली आहेत. छायाचित्रांचा वापर करण्याऐवजी रेखाचित्रांचा वापर प्रत्येक मुद्द्यात केला आहे. लहान मुलांसाठी हे कुतूहल शमवणार आणि चांगल्या आरोग्यसवयी लावणार व आरोग्यमाहिती देणार हे अप्रतिम पुस्तक आहे. खरे तर मोठ्यांनीही ते वाचावं असं आहे.


पुस्तकाचे नाव :
मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज
लेखकाचे नाव : डॉ. जगन्नाथ दीक्षित,
डॉ. अंजली दीक्षित
प्रकाशन : मनोविकास प्रकाशन, पुणे
पृष्ठसंख्या : 76, मूल्य : 70 रुपये.