आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैद्यकीय संशोधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मित्रहो! गेल्या आठवड्यात आपण मेडिकल सीईटीविषयी माहिती घेतली. आता आपण जरूर लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मेडिकलच्या सीईटीला केवळ दीड महिनाच बाकी आहे. तर पुढील वर्षाच्या सीईटीला 13 महिने बाकी आहेत. पण केवळ सीईटी देऊन आपले काम संपत नाही. आपण असा विचार करू की मर्यादित अ‍ॅडमिशन असल्यामुळे व थोडा वेळ असल्याने मेडिकलला प्रवेश मिळाला नाही तर कोठे प्रवेश घ्यायचा याचा विचार आपण केला पाहिजे. हे पर्याय कोणते ते पाहू.
* नॅनोटेक्नॉलॉजी (बी.टेक),
* फार्मसी (बी.फार्म.),
* बी.टेक. (फूड),
* बी. टेक. (कॉस्मेटिक्स),
* बायोटेक-बी.टेक. (12 वी नंतर +4 वर्षे),
* बायोइन्फमेटिक्स (12 वीनंतर 4 वर्षे),
* बीएस्सी (बायोटेक),
* एमएस्सी -कॅन्सर,
* एमएस्सी- टीबी,
* डेंटल,
* एमएस्सी -ब्लड,
* एमएस्सी- व्हायरल डिसीज,
* एमएस्सी- पर्यावरण.
या सर्व शाखांत 12 वीनंतर प्रवेश घेऊन आपण डॉक्टर होणार नसलात तरी यातून वैद्यकीय शाखेत एरवी जो अभ्यास करणार होता, त्यातील काही (बायोलॉजीचा) करू शकाल. उदा. बायोइन्फर्मेशनमध्ये तुम्ही इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीचा बायोलॉजी व बायोटेकमध्ये कसा वापर करतात त्याचा अभ्यास करू शकाल.


तसेच पर्यावरण (बीएस्सी) यात (वादळ, वारे, पाऊस, झाडे, पक्षी) यांचा व पृथ्वीवर परिणाम करणा-या घटकांचा व जीवशास्त्राचा अभ्यास करू शकता. एमएस्सी-कॅन्सर (बीएस्सीनंतर दोन वर्षे- बीएस्सीला बी ग्रुप) हा तर उत्तम असा अभ्यासक्रम आहे. मुंबई-पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रिसर्च करून आपण यात पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकाल. अर्थात यासाठी 12वीनंतर बीएस्सीमध्ये उत्तम गुण मिळालेच पाहिजेत. कॅन्सर हा सर्वात धोकादायक रोग मानला जातो. पण तो होण्याची (तंबाखू, दारू, सिगरेट, वगळता इतरही) जी इतर कारणे आहेत त्यांचा अभ्यास जगभर मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये सुरू आहे.


हे संशोधनकार्य एमएस्सी-ऑन्कॉलॉजी अभ्यासक्रमातून शिकवले जाते. तसेच एमएस्सी (व्हायरल डिसीज) हादेखील उत्तम अभ्यासक्रम आहे. बीएस्सीनंतर दोन वर्षात आपण हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. संसर्गजन्य रोगांची कारणे अनेक आहेत. यामध्ये प्रदूषण, पर्यावरणाचा नाश, रक्त, थुंकी यातून होणारा संसर्ग व इतरही कारणे आहेत.
बी.टेक. (बायोटेक) करून 12 वी नंतर 4 वर्षे, अभ्यास करू शकता. होतं असं की आपण केवळ बीएस्सी करण्याऐवजी बी.टेक. केले तर टेक्नॉलॉजी व बायोलॉजी यांचा अभ्यास एकत्र करू शकता. अर्थात त्यासाठी तुम्हाला फक्त बी ग्रुप, बायोटेक्नॉलॉजी यातही रस हवा. तुम्हाला 12 वी नंतर गणिताचाही (थोडा) अभ्यास करावा लागेल. या सर्वांचा अभ्यास करून आपण डॉक्टर नाही पण संशोधक होऊ शकता. त्याचा फायदा वैद्यकीय क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.


प्रवेश कोठे घ्याल
* आयआयटी. पवई,

* वेल्लोर टेक्निकल इन्स्टिट्यूट (VTI),

* डीवाय पाटील मेडिकल -नेरूळ, नवी मुंबई,

* मुंबई -पुणे-मराठवाडा-नागपूर विद्यापीठ,

* इंडियन सायन्स इन्स्टिट्यूट

* मुंबईतील केईएम/ जेजे/सायन रुग्णालय. तुम्हाला क्रम ठरवून प्रवेशाचा विचार करावा लागेल. म्हणजे मेडिकलला प्रवेश मिळाला नाही तर 1) डेंटल, 2) फार्मसी, 3) बायो-इन्फर्मेटिक्स, 4) कॉस्मेटिक्स, 5) एमएस्सी (ब्लड) हे आले.


फी किती आहे?
या सर्व अभ्यासक्रमांना सर्व मिळून (12 वी नंतर 4/5 वर्षे) खर्च 5 लाखांपर्यंत आहे. नोकरीच्या संधी आहेत. पण त्यापेक्षाही मेडिकल रिसर्च यात स्वयंरोजगार -अध्यापन अशा संधी आहेत.


देशाबाहेर जाता येते का?
हे सर्व कोर्सेस करून आपण ब्रिटन,अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये जाऊ शकतो. यासाठी प्रथम जीआरई-टॉफेलची परीक्षा बीएस्सी, बीटेक, एमएस्सीनंतर देऊ शकता. तिथे आपण एमएस्सी, पीएचडी करून नोकरीही करू शकता. यासाठी त्या त्या विद्यापीठात उत्तम शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. पण एमएस्सी किंवा बीटेकला मिळणारे गुण व जीआरई-टॉफेलचे गुण यांवर शिष्यवृत्ती मिळणार की नाही हे ठरते.


प्रवेश मर्यादित आहेत का?
बीएस्सीनंतर देशातील 130 विद्यापीठांत 30 हजारांवर जागा आहेत. सीईटीला उत्तम स्कोअर केल्यानंतर चांगल्या विद्यापीठात प्रवेश मिळणे अशक्य नाही. त्यामुळे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले तरी वैद्यकीय क्षेत्रात इतर अनेक क्षेत्रे खुली आहेत की तेथे आपण बुद्धिमत्तेची चमक दाखवू शकतो. त्यामुळे आशावादी राहणे महत्त्वाचे.

jogkiran2010@gmail.com