आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औषध साक्षरता हवीच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औषधाचा सुयोग्य परिणाम होण्यासाठी त्याचा सुयोग्य वापर होणे महत्त्वाचे (रॅशनल ड्रग युज). डॉक्टर, औषध उत्पादक, फार्मासिस्ट याबरोबरच रुग्णाचा सक्रिय व समजूतदार सहभाग यात आवश्यक असतो. थोडक्यात या प्रक्रियेसाठी ग्राहकाचे ‘औषध साक्षर’ असणे आवश्यक. यासाठीच औषध साक्षरतेचा हा एक थोडक्यात प्रयत्न.


वर्गवारी औषधांची
कायद्यानुसार औषधांचे दोन मुख्य गट. प्रिस्क्रिप्शन औषधे आणि नॉन-प्रिस्क्रिप्शन औषधे. प्रिस्क्रिप्शन औषधे : बहुसंख्य औषधे पहिल्या गटात मोडतात, ती विकत घेण्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन हवे. या गटात सर्व अँटिबायोटिक, स्टिरॉइड्स, बरीचशी वेदनाशामके, अस्थमा, अल्सर, संधिवात, मनोविकार, हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, थायरॉइड वगैरेवरील औषधे आहेत. तुलनेने अधिक प्रभावी अन् गंभीर औषधे गटात असतात. यांची परिणामकारकता जास्त, पण दुष्परिणामांची शक्यताही जास्त, उपयोग आवश्यक असेल तेव्हाच व्हावा व हा निर्णय फक्त वैद्यकीय तज्ज्ञाचाच असावा यासाठी प्रिस्क्रिप्शनचे बंधन. जेणेकरून या औषधांचा दुरुपयोग होणार नाही. कोणती औषधे प्रिस्क्रिप्शन औषधे कसे ओळखायचे? लेबलवर डाव्या बाजूला Rx ही खूण, व लाल रंगाची उभी रेघ असते. शिवाय चौकटीत “Schedule H Drug Warning-फक्त रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरच्या प्रिस्क्रिप्शननेच विक्री करणे, असे स्पष्ट लिहिलेले असते.
दुसरा गट नॉन-प्रिस्क्रिप्शन औषधांचा. हा छोटा गट. ही औषधे आपण स्वमनाने घेऊ शकतो. यांना ओटीसी (Over the Counter) औषधे असेही म्हटले जाते. उदा. पॅरासिटॅमॉल, अ‍ॅस्पिरीन, जीवनसत्त्वे, काही रेचके, अँटासिड्स, क्रीम्स, लोशन्स, बाम वगैरे. यांची जाहिरात करण्यास परवानगी असते. ओटीसी औषधे तुलनेने सुरक्षित, पण योग्यपणे न वापरल्यास तीही घातकच. काही उदाहरणे बघू. पॅरासिटॅमॉल तसे सेफ औषध, पण जास्त डोस घेतल्यास ते यकृताचे काम बिघडवते. लेबलवर यकृत दुष्परिणाम (liver toxicity) लिहिणे अलीकडेच सक्तीचे झाले आहे. अ‍ॅस्पिरीनमुळे रक्तस्राव, पोटात अल्सर होऊ शकतात. लहान मुलांमध्ये व्हायरल तापात अ‍ॅस्पिरीन वापरायचे नसते. कधी कधी दोन-तीन औषधांमध्ये एक औषधद्रव्य कॉमन असते.


उदा. सर्दीसाठी सिनारेस्ट घेतले (प्रिस्क्रिप्शन औषध) आणि तापासाठी समजा क्रोसिन (ओटीसी) घेतले तर दोन्हींमध्ये पॅरासिटॅमॉल असल्याने ओव्हरडोस होऊ शकतो. थोडक्यात, औषध ओटीसी असणे म्हणजे ते बिनधास्त वापरण्याचा परवाना नाही. तेथे ही सावधानता हवीच. आपल्याला होत असलेला तब्येतीचा त्रास आणि आपण मागत असलेले औषध याचा ताळमेळ लागतो ना याची फार्मासिस्टशी बोलून खात्री करून घेणे महत्त्वाचे. दोन- तीन दिवसांत बरे वाटले नाही तर स्वत:वर प्रयोग करत न राहता डॉक्टरांकडे जाणे आवश्यक.


औषधाचा वापर : काही महत्त्वाचे मुद्दे :
डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेल्यावर :
1. सध्या घेत असाल तर त्या सर्व औषधांविषयी डॉक्टरांना / दंतवैद्यांना सांगावे.
2. कोणत्याही औषधाची अ‍ॅलर्जी असल्यास तसे आवर्जून सांगावे.
3. डॉक्टरांकडे तपासणीसाठी नियमित जावे.
औषधे विकत घेताना :
1. जुन्या प्रिस्क्रिप्शनवर वारंवार औषधे खरेदी नको.
2. लायसन्सधारी औषध दुकानांतून व फार्मासिस्टच्या देखरेखीखालीच औषधांची खरेदी करावी.
3. प्रिस्क्रिप्शननुसार औषधाचे नाव, मात्रा तपासून बघावी, अंतिम मुदत व पॅकिंग तपासून घेऊन औषधाचे बिलही अवश्य घ्यावे.


औषधे सेवन करताना :
1. कोणतीही औषधे योग्य मात्रेत व पूर्ण कालावधीसाठी घेणे आवश्यक असते.
2. डोस रोज ठरावीक वेळी घ्यावा. त्या वेळी विसरल्यास लक्षात येईल तेव्हा लगेच घ्यावे. पण पुढच्या डोसची वेळ जवळ आली असेल तर घेऊ नये. डबल डोस कधीही घेऊ नये.
3. औषधे जेवणाआधी घ्यायची की नंतर, हे डॉक्टर/फार्मासिस्टना विचारावे.
4. द्रव औषधे घरगुती चमच्याने घेऊ नये. टीं२४१्रल्लॅ उंस्र/रस्रङ्मङ्मल्ल ने घ्यावे. एक टी स्पून म्हणजे 5 मिली औषध घेणे
5. मिश्रण स्वरूपातील (२४२स्रील्ल२्रङ्मल्ल) औषध घेताना बाटली जरूर हलवून घ्यावी.
6. टॅबलेट्स आवरणाच्छादित (उङ्मं३ी)ि असल्यास त्या अखंडच घ्याव्यात. तुकडे वा चूर्ण करू नये.
7. अंतिम तारीख नमूद केलेल्या भागातील गोळी सर्वात शेवटी घेणे. मार्कर पेनने स्ट्रीपच्या दोन्ही कडांवर अंतिम मुदत लिहिणे.
8. आय ड्रॉप्स बाटली उघडल्यानंतर एका महिन्यापर्यंतच वापरावे व तारखेची नोंद बाटलीवरील लेबलवर केल्यास एक महिना मोजण्यास सुलभ होईल.
9. अँटिबायोटिक्स, टीबीच्या औषधांचा कोर्स पूर्ण करणे अत्यंत आवश्यक, नाही तर कालांतराने आजार तीव्र स्वरूपात उलटू शकतो.
10. मधुमेह, उच्च रक्तदाब यासाठीची औषधे बहुधा कायमस्वरूपीच घ्यावी लागतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधे थांबवणे धोकादायक.
11. गरोदरपणी कोणतेही औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.


औषधांची घरातील साठवण :
1. औषधे सूर्यप्रकाश, दमटपणा, पाळीव प्राणी व लहान मुले यांच्यापासून दूर ठेवावीत. खिडकीत, गॅसच्या जवळ, फ्रिजवर, बाथरूममध्ये औषधे ठेवू नयेत. गोळ्या एका डब्यात, द्रव औषधे ट्रे अथवा बास्केटमध्ये ठेवून कपाटात ठेवावीत.
2. घरातील औषधांची सूची बनवून त्यात नाव, उपयोग, अंतिम तारीख याची नोंद करणे व वेळोवेळी ती अपडेट करणे.


औषधांची विल्हेवाट (Disposal) :
1. औषधांच्या विल्हेवाटीसाठी आपल्याकडे कोणतीही आदर्श पद्धती आज तरी अस्तित्वात नाही. बाटलीवरील लेबल काढून द्रव औषधात पाणी घालून (dilute करून) sink/टॉयलेटमध्ये, तर गोळ्यांचे तुकडे करून, स्ट्रिप कापून फेकायची.
2. कोणतेही औषधे मूळ पॅकिंगमधे जसेच्या तसे कधीही फेकायचे नाही, हा दंडक पाळणे महत्त्वाचे.


हे लक्षात असू द्या :
1. लक्षणे सारखी असली तरी आजाराचे कारण निराळे असू शकते. म्हणून आजाराचे स्वरूप सारखे वाटत असले तरी दुस-याची औषधे घेऊ नयेत. औषधांच्या बाबतीत ‘आपले ते आपले, दुस-याचे ते दुस-याचेच’ हा मंत्र जपायचा.
2. आयुर्वेदिक, हर्बल औषधांनाही दुष्परिणाम असू शकतात. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
3. माध्यमातील दिसणा-या अतिरंजित जाहिरातींना भुलून औषधांचा प्रयोग स्वत:वर करू नये.
4. उत्पादने/जाहिरातीबाबत शंका, तक्रार असेल तर FDA वेबसाइट http://www.fda-mah.com/Feedbck/FeedbackForm.aspx बघा.
5. MSPC’s औषध माहिती केंद्र ::http://mspcindia.org/DIC/HomeDIC.aspx
symghar@yahoo.com


फार्मासिस्ट :- फार्मसीचे रीतसर शिक्षण (डिप्लोमा इन फार्मसी किंवा बॅचलर ऑफ फार्मसी वगैरे) घेतलेला व्यावसायिक म्हणजे फार्मासिस्ट.अहोरात्र औषधे पुरवण्याचे काम तत्परतेने करणा-या फार्मासिस्टची भूमिका बदलत्या काळाबरोबर अधिक विस्तारितहोत आहे. परदेशात तर फार्मासिस्ट हा रुग्ण व डॉक्टर यांच्यातील दुवा समजला जातो. औषधे व एकंदर आरोग्यविषयक समुपदेशन व इतरही काही सेवा (उदा. रक्तदाब, रक्तशर्करा तपासणे) रुग्णांना फार्मासिस्ट सातत्याने देत असतो. आपल्याकडील फार्मासिस्टही समुपदेशनासाठी सक्षम होत आहेत. आपण औषध विकत घेतेवेळी आपल्या शंका/प्रश्न फार्मासिस्टला जरूर विचारावेत.


ग्राहकांनी / ग्राहक संघटनांनी फार्मासिस्ट/डॉक्टर/ फार्मा कंपन्यांनी
आग्रह धरावा असे काही मुद्दे -

1) दुकानात फार्मासिस्ट उपस्थित असावा व दुकानात registeredफार्मासिस्ट कोण याची चौकशी करून फार्मासिस्टच्या देखरेखीखालीच प्रिस्क्रिप्शन औषधे विकली जावीत.
2) औषधांवरील लेबल ग्राहकाभिमुख असावे व शक्यतो स्थानिक भाषेतही महत्त्वाची माहिती असावी. ओटीसी औषधांबाबत हे अत्यावश्यक.
3) औषधांबरोबर रुग्णांना औषधाची सोप्या भाषेत (इंग्रजी /स्थानिक भाषेत) माहिती देणारे औषध माहितीपत्रक उपलब्ध असावे.
4) पॅकिंग डोसेजला अनुसरूनच असावे.
5) डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन वाचता येईल अशा अक्षरात लिहावे व रुग्णास समजावून सांगावे.
6) स्वस्त ब्रँड्सचा पर्याय डॉक्टर/फार्मासिस्टनी रुग्णानां सुचवावा.