आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हीच माझी आई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागच्या महिन्यात मदर्स डे सगळीकडे साजरा झाला. त्याचा इतका बोलबाला होतो, पण त्या निमित्ताने मुलं वेळात वेळ काढून आईला शुभेच्छा देतात हे किती चांगले. आमच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या पार्वती काकूंना या निमित्ताने छान अनुभव आला. त्यांच्या घरी काका, मुलगा व सून. सगळे आपापल्या कामात. काकू निवृत्त झाल्याने घरी मन रमवायचा प्रयत्न करतात. मुलाचे लग्न झाले काही महिन्यांपूर्वी, तेव्हापासून त्या थोड्याफार बाहेर पडू लागल्या. एक दिवस त्या शेजारच्या निर्मला वहिनींकडे गेल्या, खूप आनंदात होत्या. वहिनी सरबत करू लागल्या तर म्हणाल्या, मी आज खूप खुश आहे. आनंदाची गोष्ट सांगायचीय बघ तुला. वहिनींना वाटले, गोड बातमी असेल. पण, पार्वती काकू सांगू लागल्या, काल तुमचा काय तो मदर्स डे होता ना, मला तर त्यातलं काही समजत नाही. पण माझ्या सुनेनं मला तो काय असतो ते दाखवलं. म्हणाली, आज किनई सगळे आईचा दिवस साजरा करतात, तिला शुभेच्छा देतात, काही भेटवस्तू देतात, तिच्या आवडीचे खायला देतात. आता लग्न झाल्यावर तुम्हीच माझ्या आई, तुम्हाला नमस्कार करते. काकूंचा ऊर भरून आला. त्यांनी तिला जवळ घेतलं नि आशीर्वाद दिला.
मला ऐकल्यावर वाटलं, खरंच का सुशिक्षित घरांमध्ये असं घडेल? मुलगी आपल्या घरी लग्न करून येते, आपण तिची काळजी घेतो. तरी तिच्या मनात सासूविषयी अढी असतेच. मग अशा निमित्ताने ती अढी बाजूला ठेवून सासूला आईसारख्याच आहात, असं नुसतं म्हटलं तरी किती धन्य वाटेल. त्या दोघींचं नातं अधिक स्नेहाचं होईल. अर्थात प्रेमाने राहणाऱ्या सासवा सुनाही आहेतच, आपल्या माहितीत अशा अनेक जणी असतात.
पूर्वी आम्हाला सांगितलं जायचं, सासर हेच तुझं घर, सासूसासरे हेच तुझे आईवडील. आता एखाद्या मुलीला आईने असं सांगितलं, तर मुलीला ते पटेल का?