आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस आणि केप्रीज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडघ्याच्या थोडं खालपर्यंत येणारी परंतु घोट्याच्या वर असणारी पँट म्हणजे केप्रीज. केप्रीजमध्ये आपल्याला हवे ते रंग आणि प्रकार मिळतात. त्यात डेनिमच्या फुलाफुलांची नक्षी असलेल्या केप्रीज सध्या जास्त चालतात. डेनिमचे मटेरियल स्ट्रेचेबल असतात त्यामुळे फिटिंगही छान दिसते. यावर तुम्ही लाँग किंवा शॉर्ट कुडती घालू शकता.

केप्रीजचा आणखी एक फायदा असतो. पावसाळ्यात रस्त्यावरून चालताना किंवा चिखलातून जाताना, सलवार किंवा जीन्स/ट्राउजर्स खालून खराब होतात, त्यावर चिखल व पाणी उडते. पण केप्रीज थोड्या वर असल्याने त्या खराब होत नाहीत. अर्थात केप्रीज पावसाळ्यातच वापराव्या, असं बंधन नाही. तुम्ही सुटीत फिरायला जातानाही त्या वापरू शकता. केप्रीजमध्ये डेनिम्स, सुती, कॉरड्रॉय असे अनेक प्रकार मिळतात. तुम्हाला फिटिंग केप्रीज आवडत असतील तर डेनिम वा सुती केप्रीज छान वाटतात. यात अनेक प्रिंटही उपलब्ध आहेत.

केप्रीवर कोणत्याही प्रकारची पादत्राणे छान दिसतात. सँडल्स, बूट, सपाट व उंच टाचांच्या चपला वापरू शकता. केप्रीज एकरंगी असतील तर त्यावर तुम्ही प्रिन्टेड वा रंगबिरंगी कुडता/कुडती वापरा आणि प्रिन्टेड केप्रीज असतील तर कुडता एकरंगी वापरा. या मुळे तूमचे क्लॉथ कॉम्बीनेशन छान दिसेल. केप्रीजमध्ये सध्या भरपूर भडक व उठावदार रंग आपल्याला बघायला मिळतात. या केप्रीजवर गडद रंगांचे टॉप चांगले दिसतात. उदा. लाल, पिवळा, पांढरा, आकाशी, ब्राउन केप्रीज असतील तर काथ्या, गडद हिरवा, केशरी, काळा अशा रंगाचे टॉप वापरू शकता.
mghsnsre@rediffmail.com