आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यातील थंडावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सगळ्यांना घर, कॉलेज, नोकरी आणि इतर अनेक गोष्टी सांभाळाव्या लागतात आणि छानही दिसावंसं वाटतं. त्यासाठीच पूर्ण पेहराव बदलवण्याची गरज नाही. काही ट्रेंडी रंग आणि थोडे बदल करून आपला नेहमीचा पेहराव आपण ट्रेंडी करू शकतो.

तुम्ही एक गृहिणी असाल आणि तुम्हाला अपटूडेट राहायला आवडते तर तुम्ही हे नक्की अमलात आणा. तुम्हाला साडी नेसायला आवडत असेल तर या उन्हाळ्यात सुती साड्या वापरून बघा. या साड्यांमध्ये जे थंडावा देणारे रंग आहेत ते वापरल्यास बघणार्‍यांनाही सुंदर वाटेल. उदा. हिरवा, निळा, गुलाबी, पांढरा, जांभळ्यासारखे रंग तुम्ही सहज वापरू शकता. यासोबतच तुम्ही यातले फिकट व गडद रंगही वापरू शकता. या साडीवर जर 4 किंवा 5 इंचांचा काठ असेल तर ती आणखी उठून दिसेल. तुम्ही यावर साधा किंवा थोडा वेगळ्या फॅशनचा, 3/4 बाहीचा किंवा बिनबाहीचा ब्लाउज वापरू शकता.

पण ब्लाउजमध्ये जास्तीत जास्त गडद रंग वापरल्यास आणखी छान वाटेल. त्यासोबतच त्यावर दागिने निवडताना अँटिक ज्वेलरी घ्या, उठून दिसेल. कॉलेज स्टुडंट जर असाल किंवा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालायला आवडत असेल, जसे सलवार सूट, कुरता व लेगीज, पतियाळा, स्कर्ट, जीन्स वगैरे तर तुम्ही गडद आणि हलक्या रंगांचं कॉम्बिनेशन वापरू शकता. यात फुलाफुलांचं प्रिंटही छान दिसेल.

तुम्हाला सलवार सूट घालायला आवडत असेल तर खूप काही आहे निवडण्यासारखं. खूप पॅटर्न्स आहेत. अम्ब्रेला, पतियाळा, साधा चुडीदार असे प्रकार वापरू शकता. अम्ब्रेलामध्ये भरपूर वैविध्य आपल्याला सहज मिळते. यात समारंभांना घालायचे व रोज वापरायचे, दोन्ही प्रकार भरपूर आहेत. तर या उन्हाळ्यात तुम्ही अम्ब्रेलामध्ये फ्रेश कलर वापरा. जसे फिकट गुलाबी, पोपटी, पिवळा, केशरी. यावर थोडे अँटिक कानातले व कडे वापरा, जेणेकरून तुम्ही छान सोज्वळ दिसाल. जर तुम्हाला पतियाळा आवडत असतील किंवा चुडीदार आवडतात, तर तुम्ही कॉकटेल कॉम्बिनेशन वापरू शकता. जसे पतियाळा किंवा चुडीदार हिरव्या रंगात असेल तर त्यावरील कुर्ता केशरी व ओढणी निळी असावी. यावरही अँटिक ज्वेलरी छान वाटेल.

जर तुम्हाला जेगिन्स, जीन्स आणि स्कर्ट आवडत असतील तर तुम्ही हलक्या पण फ्रेश कलर्सचे टॉप वापरा. फ्लोरल प्रिंटमध्ये जेगिन्स घातल्यास लेटेस्ट असा तुमचा लूक वाटेल व त्यावर बीड्सची ज्वेलरी वापरा. फ्लोरल प्रिंटचा स्कर्ट व त्यावर प्लेन टॉप छान दिसतो.
लेगिन्सवर पारंपरिक व आधुनिक दोन्ही प्रकारचे टॉप छान दिसतात. यामध्ये बाजारात भरपूर वैविध्य उपलब्ध आहे. यापैकी काही साइड कट तर काही विदाउट कट असतात. यामध्ये भरपूर कॅची व ट्रेंडी रंग सहज उपलब्ध होतात. यावरदेखील तुम्ही पाहिजे तशा अ‍ॅक्सेसरीज वापरू शकता.

आपल्याला दर वेळी काही तरी नवे पाहिजे असते. श्रग हा असाच एक प्रकार आहे. कोणताही ड्रेस असो, जीन्स, स्कर्ट किंवा लेगिन्स यावर आपण श्रग वापरू शकतो. कोणत्याही ऋतूत श्रग चालतो. श्रगमध्ये भरपूर प्रकार सहज मिळतात. जसे होजियरी, कॉटन, नेट. अनेक रंगही उपलब्ध आहेत. वेगवेगळी डिझाइन्सही आहेत. अर्थात श्रग गडद रंगांचे उठून दिसतात व तुमच्या पेहरावाचे सौंदर्य वाढवतात. उन्हाळ्यात बाहेर पडताना प्रखर सूर्यकिरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी स्टोल वापरावा. स्टोलमध्ये अनेक छान-छान रंग बघायला मिळतात. त्याचप्रमाणे वेगवेगळी डिझाइन्सही सहज मिळतील. शिफॉन, होजियरी, कॉटनसारखा स्टोल त्वचेच्या रक्षणासाठी वापरता येतो. पण स्टोल एखाद्या ओढणीसारखाही वापरू शकतो. लेगिन्स-कुर्ता असो किंवा जीन्स-टॉप किंवा स्कर्ट-टॉप सगळ्यांवर स्टोल वापरू शकतो.

mghsnsre@rediffmail.com