आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Megha Sansare Article About Umbrellas, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छत्र्यांनाही इतिहास आहे !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छत्री सर्वात अगोदर अकराव्या शतकात चीनमध्ये वापरली गेली. बांबूच्या बारीक काड्यांपासून बनवलेली ही छत्री गोल असायची. त्या वेळी इजिप्तमध्येदेखील छत्री वापरली जाई. काही काळ भारतातही या छत्र्या वापरल्या गेल्या. भारतात जी पहिली छत्री बनवण्यात आली, ती केळीच्या पानांपासून बनवलेली होती. पानं जोडायला बारीक काड्यांचा उपयोग करण्यात आला होता. केळीच्या पानांमुळे ऊन जाणवत नव्हते व पाऊसही ओसरून जात होता. त्यानंतर छत्रीसाठी लॅटिन व ब्रिटिश भाषेत नवीन शब्द उदयाला आला - पॅरासोल. म्हणजे सूर्याच्या किरणांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी तयार केलेली छत्री.
पॅरासोल आणि छत्री या पूर्वी वेगळ्या गोष्टी होत्या. छत्री पावसात तर पॅरासोल उन्हात वापरायची. त्यानंतर अठराव्या शतकात रोमनही पॅरासोल वापरू लागले; त्यांनी या पॅरासोलमध्ये बदल केले नाहीत. पण त्यांनी छत्रीला एक नवीन शब्द दिला, सनशेड. छत्री वापरणा-या लोकांची त्वचा काळवंडत नव्हती, गोरी दिसत होती. हे फायदे पाहताच इजिप्शियन राजाने छत्री वापरणे सुरू केले. या राजाकडे 24 पांढरे हत्ती होते व त्या हत्तींच्या 24 अंबा-या या राजाने बनविल्या. 24 मोठे पांढरे हत्ती असल्याकारणाने या राजाला अगोदर ‘दि किंग ऑफ व्हाइट एलिफंट’ म्हटले जात असे. पण छत्रीमुळे त्याला नवीन नाव पडले - दि लॉर्ड ऑफ ट्वेंटीफोर पॅरासोल्स.

आता छत्रीमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. छत्र्या आता ऑटोमॅटिक आहेत आणि बाळगायलाही सोप्या. त्या सहज पर्समध्ये किंवा गाडीच्या डिकीमध्ये राहतात. यात छान आकर्षक रंग आणि हवी तशी नक्षीही सहज उपलब्ध होते. आपण ज्या छत्र्या वापरतो, त्या छत्र्या 1709पासून बनवण्यात येत आहेत. त्या अमेरिकेत लोकप्रिय होत्या. 1930च्या सुमारास याची लोकप्रियता वाढली आणि बायका फॅशन म्हणून छत्री वापरू लागल्या. त्या वेळी त्यांना छत्री बाळगणे सोपे जावे म्हणून काही हुशार लोकांनी फोल्डिंग छत्रीचा शोध लावला. ते अर्थातच लोकांना फार आवडले. छत्री वापरल्याने ऊन व पाऊस दोन्हीपासून बचाव होतो.
आपल्याला हव्या तशा स्टाइलच्या छत्र्या आपण वापरू शकतो. सध्या प्रिंटेड छत्र्यांचा ट्रेंड आहे. छत्री छान फुलांच्या प्रिंटची असावी, असे वाटते. सध्या मोठ्या व फुलांची प्रिंट असलेल्या छत्र्या सगळ्यांना आवडतात. या छत्र्यांमध्ये अनेक रंग वापरलेले असतात.
अम्ब्रेला या शब्दाचे मूळ लॅटिनमध्ये आहे. अम्ब्रेला म्हणजे सावली. जसे झाड आपले ऊनपावसापासून रक्षण करते, तशी छत्रीही उन्हाळ्यात सावली आणि पावसाळ्यात आडोसा मिळवून देते.
mghsnsre@rediffmail.com