आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशन...!!! अ‍ॅडमिशन मेडिकल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपला मुलगा/मुलगी हुशार आहे की नाही हा प्रश्न नसून मेडिकल सीईटीला बसू पाहणा-यांपैकी फक्त 6 हजार (डेंटल धरून) विद्यार्थ्यांना वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळणार आहे. 180 गुणांना वैद्यकीय शाखेचा प्रवेश बंद झाला होता यावरून परीक्षा किती कठीण आहे हे लक्षात आले असेल. अनेक विद्यार्थी 12/12 तास मेहनत घेतात; पण कमी जागा असल्याने पदरी निराशा पडते.

मित्रहो! 12 वी परीक्षेस बसणा-या अनेक मुला/मुलींच्या आई-वडिलांची इच्छा आपल्या मुलांनी डॉक्टर व्हावे, अशी असते; पण मुळात आपण वास्तवाचा विचार केला पाहिजे. यंदा मे महिन्यात होणा-या मेडिकल सीईटीला राज्यातून हजारो विद्यार्थी बसणार आहेत व जागा मात्र केवळ सहा हजार आहेत. गेल्या अनेक वर्षांत लोकसंख्या वाढूनही गरजेच्या प्रमाणात मेडिकलच्या जागा वाढवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे सगळीकडे पेशंट अधिक पण डॉक्टर कमी असे चित्र दिसते. या पार्श्वभूमीवर जागा वाढवायला खूपच स्कोप आहे. त्यामुळे आपला मुलगा/मुलगी हुशार आहे की नाही हा प्रश्न नसून प्रश्न हा आहे की 12 वी मेडिकल सीईटीला बसू पाहणा-यांपैकी फक्त 6 हजार (डेंटल धरून) विद्यार्थ्यांना वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळणार आहे. इतर मुलांना जर परवडत असेल तर पैसे भरून खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईत मेडिकल सीईटीला 180 गुणांना किमान वैद्यकीय शाखेचा प्रवेश बंद झाला होता यावरून परीक्षा किती कठीण आहे हे लक्षात आले असेल. अनेक विद्यार्थी 12/12 तास मेहनत घेतात; पण कमी जागा असल्याने त्यांच्या पदरी निराशा पडते. त्यामुळे आपल्या मुलांना वैद्यकीय सीईटीची माहिती देण्यासाठी पालकांनी प्रथम वास्तव समजून घेतले पाहिजे.

ही माहिती कशी असावी हे पाहा...

1)महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालये किती आहेत? प्रत्येक महाविद्यालयात किती जागा आहेत?
2)वैद्यकीय शाखेत सरकारी जागा वा पेमेंट जागा किती आहेत व त्यांची जिल्हावार विभागणी कशी आहे?
3)पाच-साडेपाच वर्षांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी एकूण खर्च किती आहे व तो आपणास परवडण्यासारखा आहे का?
4) 9 वी ते 11 वी बायोलॉजी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या विषयांत आपल्या मुला/मुलीला किती गुण मिळाले आहेत?
5) रक्त/ लघवी/थुंकी/पेशंट या सामाजिक कार्यामध्ये काम करण्याची (कायम) आपल्या मुला/मुलीची तयारी आहे का?
6) हॉस्पिटल/दवाखाना येथील वातावरण आयुष्यभर आपल्या मुला/मुलीला आवडणार आहे का? व त्यासाठी तो / ती भावनिक /मानसिकदृष्ट्या समर्थ आहे का?
7) जर वैद्यकीय महाविद्यालयात आपल्या मुला-मुलीला प्रवेश मिळाला नाही तर पॅरामेडिकल कोर्सेस कोणकोणते आहेत, याची माहिती आपल्याकडे आहे का?
8) या पॅरामेडिकलला प्रवेश घेण्यात आपल्या मुला/मुलींना रस आहे का? त्याची आवड आहे का?
या सर्व प्रश्नांचा एकत्रित विचार सर्व पालकांनी मुला/मुलींनी घरात बसून करावा व मग निर्णय करावा.
माहिती कुठे मिळेल?
(1) डिपार्टमेंट ऑफ मेडिकल एज्युकेशन, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल, सीएसटी स्थानकाजवळ, मुंबई.
(2) आर्मड फोर्स मेडिकल कॉलेज, सोलापूर रोड -पुणे. या दोन संस्थांमध्ये सविस्तर माहिती मिळू शकेल. आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या वेबसाइटवरही ही माहिती मिळू शकेल. तसेच केंद्र सरकारच्या वैद्यकीय- शिक्षण विभागात (नवी दिल्ली) येथे माहिती मिळू शकेल. इंटरनेटवर गुगलमध्ये सर्च केल्यास माहिती लगेच मिळेल. शिवाय आपण ज्या शहरात राहत आहात त्या शहरातील सरकारी मेडिकल हॉस्पिटल व महाविद्यालये आहेत तेथे माहिती मिळू शकते. मुंबईत जे. जे. हॉस्पिटल, केईम, नायर महाविद्यालय येथे ही माहिती उपलब्ध असून पुण्यातील बीजे महाविद्यालयात पॅरामेडिकल विषय व त्यासाठी उपलब्ध असणा-या जागा यांची सविस्तर माहिती उपलब्ध आहे.