Home | Magazine | Kimaya | mobile radiation information

मोबाइल रेडिएशनची माहिती देणे अनिवार्य

दिव्य मराठी | Update - Apr 20, 2012, 10:10 PM IST

मोबाइलधारकांचे हित लक्षात घेता टेलिकॉम विभागाने नवे नियम-कायदे तयार केले असून यात मोबाइल टॉवर आणि फोन यासंदर्भात नवे नियम बनवण्यात आले आहेत.

  • mobile radiation information

    मोबाइलधारकांचे हित लक्षात घेता टेलिकॉम विभागाने नवे नियम-कायदे तयार केले असून यात मोबाइल टॉवर आणि फोन यासंदर्भात नवे नियम बनवण्यात आले आहेत. याअंतर्गत मोबाइल फोनपासून निघणा-या रेडिएशनची माहिती विक्री करणा-या आऊटलेटला द्यावी लागणार आहे. हा नियम 1 सप्टेंबर 2012 पासून लागू करण्यात येत आहे. मोबाइल कंपनी आणि टॉवर कंपन्यांना या महिन्याच्या अखेरपर्यंत ही माहिती दिली जाईल.
    मोबाइल फोनवरून किती रेडिएशन निघते हे हँडसेटवर अवलंबून असते. सर्व प्रकारच्या हँडसेट्सवरून रेडिएशनचे प्रमाण वेगवेगळे असते. त्याला स्पेसिफिक एबसोर्पशेन रेट म्हटले जाते. आता नियमानुसार देशात रेडिएशनचे प्रमाण 1.6 वॅटपेक्षा कमी असणारे हँडसेट आयात किंवा विक्री केले जातील. जाणकारांच्या मते, काही कमी किमतीचे आणि चायनीज मोबाइल या नियमाची पूर्तता करत नाहीत. याशिवाय प्रत्येक मोबाइल आता हँडफ्री असणे जरुरी आहे. सरकारचे म्हणणे आहे की, रेडिएशनचा धोका कमी करण्यास यामुळे मदत मिळणार आहे.

Trending