आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोगी कोळपे महिला शेतक-यांना वरदान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार येथील कृषिविज्ञान केंद्राने तयार केलेले ‘मोगी एकचाकी कोळपे’ अवघ्या 1200 रुपयांत उपलब्ध होत असून 7 किलो वजनाच्या या कोळप्यामुळे तण काढण्याचे काम सुलभ झाले आहे. कृषिविज्ञान केंद्राचे जयंत उत्तरवार यांनी संशोधित केलेल्या या अवजाराला आदिवासींची देवता याहामोगीचे नाव देण्यात आले आहे. या यंत्राच्या सहायाने कोळपणीसह अन्य कामेही करता येतात.
कोणत्याही चांगल्या पिकासाठी मशागत आवश्यक असते. पीक 60 दिवस होईपर्यंत शेती तणमुक्त असणे गरजेचे असते. तणांमुळे उत्पादनात 35 ते 45 टक्के घट येते अथवा नुकसान होते. त्यासाठी आंतरमशागत करावी लागते.
तणांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी या एकचाकी कोळप्याचा जन्म झाला आहे. आदिवासी महिला मजुरांना उखळ करून तण काढावे लागे. शिवाय त्यांच्या कामात गती नसायची. हे काम करताना त्यांना मान, कंबर व पाठीचे आजार उद्भवत. महिला मजूरवर्ग निंदणी करण्याच्या कामास येत; पण त्यांच्या कामात गती नव्हती. यातून काही संशोधन करून यंत्र तयार करता येईल का? असा विचार माझ्या मनात येई. त्यातूूनच हे एकचाकी कोळपे बनविले आहे.
एकचाकी कोळप्यामुळे उभे राहून सहजपणे तण काढता येते. या एकचाकी कोळप्याला ‘मोगी एकचाकी सुधारित कोळपे’ असे नाव मुद्दाम दिले आहे. कारण याहा मोगी ही आदिवासी भागातली अत्यंत श्रद्धेय अशी देवता आहे. हे कोळपे महाराष्टÑासह गुजरात व आंध्र प्रदेशातील शेतक-यांच्या पसंतीस उतरलेले आहे. ते बहुपयोगी असून, पिकांना पाणी देण्यासाठी सºया लावण्याचे कामही या कोळप्याद्वारे एक माणूस करू शकतो. त्यासाठी रेझर तयार करण्यात आले आहे. वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळे पाते बसवले की काम होते. मातीचे भरही या एकचाकी कोळप्याद्वारे करता येते. निंदणी, आंतरमशागत, सºया व मातीचे भराव करण्यासाठीही हे यंत्र वापरता येत असल्याने थेट नागपूरपर्यंत या कोळप्याचा लौकिक गेला आहे. मध्यम व हलक्या जमिनीच्या शेतात मशागतीसाठी हे कोळपे फायदेशीर आहे. शिवाय कुठल्याही पिकासाठी हे कोळपे वापरता येते. भाजीपाला लागवडीसाठी सºया सहज केल्या जातात. 15, 20 व 30 इंचाच्या कार्बन स्टीलपासून हे यंत्र बनविले जाते. या मोगी कोळप्यामध्ये सायकलच्या छोट्या चाकावर आधारित रचना करण्यात आली आहे. चाकात बॉल बेअरिंग असल्याने घर्षण कमी होते. तीन राज्यातील 257 हून अधिक शेतकरी या कोळप्याचा उपयोग करीत आहेत.