आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mohan Madwanna Article About Science , Divya Marathi

विज्ञान शिक्षण : कुत्र्याची पिले आणि थंडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रात्री गाढ झोपल्यानंतर जर थंडी वाढली तर आपण कुडकुडत जागे होऊन आधी पांघरुणात शिरतो किंवा ते सापडले नाही तर आईच्या किंवा बाबांच्या पांघरुणात घुसतो. आजोळी जेथे सर्व मुले जेथे एकत्र झोपतात तेथे प्रत्येकासाठी वेगळे पांघरूण देण्याऐवजी मोठ्या जाजमावर दोन, तीन, चार मुले एकत्र झोपल्यानंतर आजी सर्वांच्या अंगावर एकच मोठे ब्लँकेट टाकते. अशा वेळी एकत्र झोपल्यानंतर थंडी वाजत नाही. घरी असलेल्या कुत्र्याची किंवा मांजराची पिले थंडीत गुरफटून झोपलेली तुम्ही पाहिली असतील. एकत्र आल्यानंतर त्यांना किंवा आपल्याला थंडी कमी का वाजते. हे आज आपल्याला प्रयोगातून शोधून काढायचे आहे.

साहित्य एकसारख्या आकाराचे चार दंडगोलाकृती काचेचे ग्लास किंवा सरळ उभ्या पाण्याच्या प्लास्टिकच्या अर्धा लिटर क्षमतेच्या बाटल्या. एक प्रयोगशाळेत असतो तसा थर्मामीटर (घरातील तापमापी फक्त 45 अंश से. तापमान दर्शवतो.) भिंतीवरील तापमापीने मात्र 100 अंश तापमान मोजता येते. त्यामुळे प्रयोगशाळेतीलच तापमापी आवश्यक नाही.

आता प्रयोग. एका मोठ्या भांड्यात दोन लिटर पाणी तापवा. ते 60 अंश से.पर्यंत तापले पाहिजे. पाण्याचे तापमान थोडे कमी किंवा अधिक झाले तरी त्याचा प्रयोगावर परिणाम होणार नाही. गरम पाणी चार उभ्या ग्लासमध्ये किंवा रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांमध्ये भरा. चारही बाटल्यांमधील पाण्याचे तापमान नोंदवा. बाटल्यांची झाकणे लावू नका. यातील तीन बाटल्या एकत्र बांधा. त्यावर वर्तमानपत्राचा ओला कागद गुंडाळा. चवथ्या बाटलीवर तसाच कागद गुंडाळा. आता तीन बाटल्यांचा एक समूह व चवथी एकुलती एक बाटली अशी रचना झाली. दर पाच मिनिटांनी तापमापीने प्रत्येक बाटलीतील पाण्याचे तापमान किती कमी होते ते नोंदवायचे आहे.

हा प्रयोग पूर्ण होण्यासाठी फक्त 20-25 मिनिटे लागतील. प्रयोगाच्या शेवटी तुमच्या लक्षात येईल की वेगळ्या एका बाटलीतील पाण्याचे तापमान कक्ष तापमानास लवकर येते, पण एकत्र असलेल्या बाटलीतील पाण्याचे तापमान त्यामानाने सावकाश कमी होते. याचे कारण शोधून काढणे फार अवघड नाही. जो कागद तुम्ही बाटल्यावर गुंडाळलेला आहे त्याचा पृष्ठभाग मोजा. एकट्या बाटलीवर गुंडाळलेल्या कागदाचा पृष्ठभाग आणि तीन बाटल्यांवर गुंडाळलेल्या कागदाच्या पृष्ठभागाच्या गुणोत्तरावर आतील पाण्याचे तापमान कसे कमी होते हे ठरते. जेवढा त्वचेचा पृष्ठभाग अधिक, तेवढ्या क्षेत्रफळावरून अधिक ऊर्जा बाहेरील हवेत पसरते. अधिक पिलांची संख्या असल्यास त्वचेचे क्षेत्रफळ विभागले जाते व कमी ऊर्जा हवा वाहून नेते. पोत्यावर झोपलेले एकटे कुत्र्याचे पिलू कुडकुडत असते, पण तीन एकत्र झोपलेली पिले गाढ झोपलेली असतात. तुम्ही एकटे झोपल्यानंतर पांघरूण घेतले तरी थंडी वाजत राहते. पण आई-बाबांच्या कुशीत तुम्ही अधिक वेळ व गाढ झोपता. आहे की नाही मजा?