आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mohan Mawdnna Article About Static Electricity Viewers, Divya Marathi

Divya Education स्थिर विद्युत दर्शक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एप्रिल महिन्यातील विज्ञान शिक्षण या सदरामध्ये आपण पाणी वळवण्याचा एक प्रयोग पाहिला होता. आज आपण करून पाहणारा प्रयोग त्याच वैज्ञानिक संकल्पनेवर आधारित आहे. स्थिर विद्युत कशामुळे आणि कशाकशामुळे तयार होते हे आपल्यास पाहायचे आहे. कृत्रिम धाग्याचे कपडे शरीरावरून उतरवताना खोलीमध्ये ब-यापैकी अंधार असेल तर चट चट असा आवाज येतो. त्याचबरोबर विजेच्या ठिणग्या दिसतात.
कृत्रिम धाग्याचे कपडे आणि आपली त्वचा यामुळे कृत्रिम धागे स्थिर विद्युत निर्माण करतात. आपल्या सभोवती असे अनेक स्थिर विद्युत निर्माण करणारे पदार्थ आहेत. हे किती स्थिर विद्युत निर्माण करतात हे पाहण्यासाठी लागणारे साहित्य - स्टायरोफोमचा ग्लास, (रेल्वेमध्ये चहासाठी असे पांढ-या रंगाचे ग्लास वापरतात. प्लास्टिकचे एकदाच वापरण्याचे ग्लास स्टायरोफोमचे नसतात ) एक स्ट्रॉ, स्टायरोफोम प्लेट, अ‍ॅल्युमिनियम प्लेट, तीन सेमी रुंद व लांब अल्युमिनियम फॉइल शक्यतो शिलाई दोरा, कातरी, रबरी फुगा, कंगवा, स्वेटर, लोकर, केसाळ कपडा, घरी मांजर असल्यास त्याला बरोबर घेऊन बसणारा कोणीतरी, नायलॉन, टिश्यू पेपर, पॅकिंगसाठी वापरलेले प्लास्टिक शीट वगैरे.
स्थिर विद्युत निर्माण करणारी वस्तू दुस-या वस्तूवर घासली म्हणजे स्थिर विद्युत निर्माण होते. घर्षणामुळे ऋण भार तयार होतो. घर्षणानंतर तो दुस-या वस्तूवर साठला म्हणजे स्थापित होतो. उदाहरणार्थ लोकरी गालिच्यावर पाय घासला म्हणजे स्थिर विद्युत पायाच्या त्वचेवर साठते. अशा वेळी जमिनीवर उभे असलेल्या मित्राला स्पर्श केला म्हणजे त्याला स्थिर विद्युतमुळे सौम्य धक्का बसतो.
प्रयोगाच्या जुळणीसाठी एका लाकडी टेबलावर अ‍ॅल्युमिनियमची प्लेट ठेवा. स्टायरोफोमच्या ग्लासमध्ये तळापासून दोन सेमी उंचीवर समोरासमोर स्क्रू ड्रायव्हरने प्लास्टिक स्ट्रॉ शिरेल अशी दोन छिद्रे पाडून घ्या. आकृतीमध्ये दाखवल्यप्रमाणे स्टायरोफोम ग्लास अ‍ॅल्युमिनियम प्लेटमध्ये उलटा ठेवा. त्यात आधी पाडलेल्या छिद्रामधून प्लास्टिक स्ट्रॉ घाला. स्ट्रॉच्या एका टोकास एक अ‍ॅल्युमिनियम प्लेटच्या कडेजवळ पोहोचेल असा दोरा बांधा. दो-याच्या खालील टोकाशी अ‍ॅल्युमिनियम फॉइलपासून केलेली एक गोळी अडकवा. ही गोळी प्लेटच्या कडेजवळ येईल, पण कडेशी सहजासहजी चिकटणार नाही, अशी याची खात्री करून घ्या. तुमचा स्थिरविद्युत दर्शक तयार झाला. तुम्ही गोळा केलेल्या वस्तूंमधून स्थिरविद्युत मिळते की नाही याचा प्रयोग आता चालू करू शकता.
प्रत्यक्ष प्रयोग
नायलॉनचा कपडा स्टायरोफोमच्या प्लेटवर घासा आणि तो तुम्ही बनवलेल्या स्थिरविद्युत दर्शकाच्या प्लेटला चिकटवा. दोरीच्या टोकाशी असलेली अ‍ॅल्युमिनियमची गोळी प्लेटच्या कडेपासून दूर जाईल. स्थिरविद्युत दर्शक यशस्वी झाल्याची ही खूण आहे. दुसरी वस्तू स्थिरविद्युत निर्माण करते की नाही हे पाहण्यासाठी हाताने अ‍ॅल्युमिनियम प्लेटला स्पर्श करा. विद्युतभार नाहीसा होईल. हे करताना तुमच्या पायाचे तळवे जमिनीस टेकलेले हवेत. म्हणजे स्थिरविद्युत भार जमिनीत नाहीसा होईल. अ‍ॅल्युमिनियम गोळीचे विचलन किती जोरात किंवा हळू होते यावरून ती वस्तू किती स्थिरविद्युत निर्माण करते हे समजेल. स्थिरविद्युत पाहणी करण्यासाठी ज्या वस्तू तुम्ही वापरणार आहात त्यांचा सर्वसाधारण पृष्ठभाग सारखाच असावा. उदा. 25 गुणिले 25 सेमी. याचे मोजमाप करायचे असल्यास मूळ ठिकाणाहून अ‍ॅल्युमिनियम गोळीचे विचलन सेमी पट्टीच्या साहाय्याने मोजता येते. (थोडे डोके चालवले तर ही पट्टी तुम्हाला चिकटपट्टीच्या साहाय्याने स्टायरोफोम ग्लासवर बसवता येईल) स्थिरविद्युत वस्तू घासल्याने निर्माण झालेल्या इलेक्ट्रॉन इकडून तिकडे गेल्याने निर्माण झालेली असते.
madwanna@hotmail.com