आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय साहित्यातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षासह 15 महिन्यांच्या कालावधीतील भारतातील प्रकाशित पुस्तके पुरस्कारासाठी ग्राह्य :
या वर्षी क्रॉसवर्ड बुक अवॉर्ड 2013 या पुरस्कारांसाठी आर्थिक वर्षावर आधारित कालावधी विचारात घेतला गेला होता. त्यामुळे 1 जानेवारी, 2012 ते 31 मार्च 2013 (प्रवेश अर्जासाठी 15 महिन्यांचा कालावधी) या काळात भारतात प्रकाशित झालेली पुस्तके ग्राह्य धरण्यात आली. पुढील वर्षासाठी एप्रिल 2013 ते मार्च 2014 या काळात प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा विचार पुरस्कारासाठी केला जाईल.

पुरस्काराची एका तपाची परंपरा :
क्रॉसवर्ड म्हणजे भारतातील सर्वाधिक वेगाने वाढत असलेली पुस्तकविक्री दालनांची शृखला आहे. भारतात लाइफस्टाइल बुक स्टोअर ही संकल्पना प्रथम सादर करणा-या क्रॉसवर्डने भारतीय साहित्यातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करणा-या क्रॉसवर्ड बुक अवॉर्डस 2013 या पुरस्कार सोहळ्यात भारतातील अनेक उत्कृष्ट साहित्यकार आणि त्यांनी लिहिलेल्या इंग्रजीतील पुस्तकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सलग 12 वर्षांपासून होत असलेला हा भव्य पुरस्कार सोहळा नुकताच सहा डिसेंबर रोजी मुंबईतील मेहबूब स्टुडिओ येथे लिटररी कार्निव्हलमध्ये पार पडला.
जेरी पिंटो, मुंबई (अलेफ पब्लिकेशन) यांचे ‘एम अँड द बिग हूम’ आणि जेनिस परियात, नवी दिल्ली (रँडम हाऊस पब्लिकेशन) यांचे ‘बोट्स ऑ न लँड’ या पुस्तकांना भारतीय ललित पुस्तक विभागातील पुरस्कार विभागून दिला गेला. जेरी पिंटो यांनीदेखील पुरस्काराद्वारे प्राप्त झालेला निधी ‘मेलजोल’ या लहान मुलांसाठी काम करणार्‍ या स्वयंसेवी संस्थेला देणार असल्याचे सांगितले. पुरस्कार सोहळ्याचे हे बारावे वर्ष आहे आणि या वर्र्षी अनेक मान्यवर लेखक, प्रकाशक, समीक्षक आणि पुस्तकप्रेमी रसिकांनी या सोहळ्यास प्रचंड प्रतिसाद दिला.
विशेष म्हणजे वॉल स्ट्रीट जर्नलने ज्यांचे वर्णन जॉन ग्रिशॅम ऑ फ बँकिंग या शब्दांत केले आहे, त्या रवी सुब्रमण्यन यांनी सलग तिस-यांदा क्रॉसवर्ड पुरस्काराचा बहुमान प्राप्त केलेला आहे. याआधी द इन्क्रिडिबल बँकर, या पुस्तकासाठीही त्यांना पॉप्युलर अवॉर्डने सन्मानित केले गेले होते आणि आता पुन्हा एकदा बँकस्टर या पुस्तकासाठी हाच पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. लेखकांना प्रोत्साहित करणारे व्यासपीठ या निमित्ताने सादर केल्याबद्दल त्यांनी क्रॉसवर्डचे आभार मानले. या कार्यक्रमाची रंगत सुचित्रा पिल्ले यांच्या सूत्रसंचालनामुळे आणि तौफिक कुरेशी यांच्या तालवादनामुळे अधिकच वाढत गेली.
भारतीय साहित्यातील मान्यवरांची मांदियाळी, तर परीक्षक होते अंतरा दत्ता, रिटा कोठारी, दीपक दलाल, दिलीप कुमार. पुरस्कारांसाठी तयार केलेल्या निवडक सूचीमध्ये समावेश असलेले लेखक राहुल पंडित, रश्मी बन्सल, रवी सुब्रमण्यन, अरुणवा सिन्हा, जेरी पिंटो, जेनिस परियात, आनंद नीलकांतन, अनुजा चौहान, अनन्या वाजपेयी, हिमांजली संकर, पायल कपाडिया, रणजित लाल, डॉ. एम. असादुद्दीन, अंचिता घातक, रविशंकर बाल हे सर्व जण याप्रसंगी उपस्थित होते. परीक्षक म्हणून काम पाहणारे दिलीप कुमार, अंतरा दत्ता, रिटा कोठारी, दीपक दलाल इत्यादी साहित्य क्षेत्रातील मान्यवरही आवर्जुन या कार्यक्रमास उपस्थित राहिले.
पुरस्कारांसाठी 552 प्रवेश अर्ज, सहा महिन्यांपासून पुस्तक परीक्षणाची (निवड) प्रक्रिया व सूचीही तयार :
क्रॉसवर्डचे संस्थापक आर. श्रीराम म्हणाले की, या पुरस्कारांसाठी 552 प्रवेश अर्ज आले होते. आजपर्यंतच्या पुस्तकविषयक पुरस्कारांसाठी प्राप्त झालेले हे सर्वाधिक प्रवेश अर्ज ठरले. पुस्तकांच्या परीक्षणाची संपूर्ण प्रक्रिया ६ महिने सुरू होती आणि अंतिम विजेता जाहीर करण्यासाठी पुस्तकांची निवडक सूची बनवण्याचे कामही या कालावधीत केले गेले.
इतर विभागांतील पुरस्कार विजेते लेखक :
1. अंजना वाजपेयी (हार्वर्ड बिझनेस प्रेस) लिखित राइटियस रिपब्लिक आणि पंकज मिश्रा,उत्तर प्रदेश लिखित (पेंग्विन प्रकाशन, दिल्ली) फ्रॉम द रुइन्स ऑफ एम्पायर, या पुस्तकांना भारतीय ललितेतर विभागातील पुरस्कार विभागून दिला गेला.
2. भारतीय भाषेतील अनुवाद या विभागात डॉ. एम. असादुद्दीन, दिल्ली यांनी (पेंग्विन प्रकाशन) अनुवाद केलेल्या अ लाइफ इन वडर्र्स या इस्मत चुगताई लिखित पुस्तकास गौरवण्यात आले.

छायाचित्र -जेरी पिंटो, मुंबई (अलेफ पब्लिकेशन) यांचे ‘एम अँड द बिग हूम’ आणि जेनिस परियात, नवी दिल्ली (रँडम हाऊस पब्लिकेशन) यांचे ‘बोट्स ऑ न लँड’ या पुस्तकांना भारतीय ललित पुस्तक विभागातील पुरस्कार विभागून देण्‍यात आला.