आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मौखिक स्वच्छता महत्त्वाची

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मौखिक स्वच्छता म्हणजे काय?
* मौखिक स्वच्छता म्हणजे दात, हिरड्या, जीभ, टाळू आणि गालाच्या आतील भाग या सर्व अवयवांची स्वच्छता, प्लाक, कॅल्क्युलस, अन्नकण या सर्वांपासून मुक्तता.
*  मौखिक स्वच्छता न राखल्यास कोणते मौखिक आजार होऊ शकतात?
* मौखिक स्वच्छता न राखल्यामुळे हिरड्यांचे आजार, दंतक्षय, मुखदुर्गंधी इत्यादी आजार होऊ शकतात.
पायोरिया म्हणजे काय?
हिरड्यांच्या आजारात पायोरिया हा प्रामुख्याने आढळणारा रोग आहे. पायोरियामध्ये हिरड्या लाल होतात, सुजतात. त्यातून रक्त व पू येतो. हिरड्या सळसळ करतात. तोंडाची दुर्गंधी येते. दात हलू लागतात, त्यालाच पायोरिया असे म्हणतात. पायोरियाच्या रुग्णांना प्रतिजैविके, वेदनानाशक औषधी दिली जाते. दाताभोवती जमा झालेले प्लाक, कॅल्क्युलसच्या साह्याने काढली जातात. गरज पडल्यास हिरड्यांच्या शस्त्रक्रिया केल्या जातात.
हिरड्यांचे आजार कसे टाळावेत?
दैनंदिन आहारात सर्व अन्नघटकांचा समावेश करावा. ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, अंडी, मोड आलेली कडधान्ये यांचा आहारात समावेश असावा. टूथपेस्ट आणि ब्रशने सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात साफ करावेत. तसेच हिरड्यांना मसाज करावा.
दात साफ करण्याची पद्धत कोणती?
दात टूथपेस्ट व ब्रशने साफ करावेत. वरच्या जबड्यातील दात साफ करताना ब्रश वरून खालच्या दिशेने फिरवावा म्हणजे दातांत अडकलेले अन्न कण निघून जातात. खालच्या दातासाठी ब्रश खालून वर फिरवावा. प्रत्येक दात टाळूच्या आतील बाजूने व बाहेरच्या म्हणजे गालाच्या दिशेने तसेच चावण्यासाठी वापरण्यात येणा-या दातांचा भाग ब्रशने साफ करावा.
जीभ कशी साफ करावी?
जिभेचा पृष्ठभाग खडबडीत असल्याने तिथे अन्नकण साठतात, त्यामुळे जीभ मऊ ब्रशने किंवा स्टीलच्या पट्टीने साफ करावी.
प्लाक म्हणजे काय?
प्लाक म्हणजे दातांवर आणि हिरड्यावर सतत साचणारा अतिशय पातळ व चिकट जंतंूचा थर होय. सदर प्लाक टूथब्रश आणि पेस्टने दंतवैद्याने सांगितलेल्या शास्त्रोक्त पद्धतीने साफ केल्यास निघून जातो.
कॅल्क्युलस म्हणजे काय?
प्लाक दातांवर व हिरड्यांवर साठत राहिल्यास त्याचे रूपांतर कडक व टणक पिवळ्या रंगाच्या थरात होते. त्याला कॅल्क्युलस असे म्हणतात. कॅल्क्युलसचा थर टूथपेस्ट व टूथब्रशच्या साह्याने निघत नाही. विविध उपकरणांच्या साह्याने दंतवैद्य दात साफ करून कॅल्क्युलस काढून टाकतात.