आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळाची गरज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'पाळणाघर हे केवळ नोकरी करणार्‍या स्त्रियांच्या दृष्टीनेच गरजेचं आहे असं नाही. समवयस्क दोस्तांची सोबत आणि व्यक्तिश: लक्ष देणारं, वेळ देणारं माणूस उपलब्ध असणं ही मुलांच्या दृष्टीने पाळणाघराची जमेची बाजू. एकप्रकारे या मुलांचं ते दुसरं घरच असतं म्हणा ना... अशाच या ‘दुसर्‍या घराच्या’ विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा हा ‘गोष्ट दुसर्‍या घराची’ विशेषांक...'

मुंबईच्या एका उपनगरातली मध्यमवर्गीय बहुतांश मराठी वस्ती. काळ 1970चं दशक. दोन मुलं आणि आईवडील नोकरी करणारे, असं बहुतेक घरांमधलं चित्र. काही घरांमध्ये आजी-आजोबा होते, काही घरांमध्ये ते नव्हते. जिथे ते नव्हते तिथल्या मुलांना सांभाळण्यासाठी या वस्तीमध्ये एक-दोन पाळणाघरं होती. जेमतेम दोन खोल्यांचं घर, घरातला पुरुष गिरणीत कामगार, तीन-चार मुलं. या संसाराला हातभार लावण्यासाठी स्त्री ऊर्फ ‘ताई’ सकाळी लवकर काही घरी स्वयंपाक करे व दिवसभर मुलं सांभाळे. पाच-सहा मुलं एका वेळी या पाळणाघरात राहायला असत. तार्इंच्या घरासमोर मैदान होतं, जवळच एक देऊळ होतं. तार्इंचं घर लहान असलं तरी मुलं बराच काळ, विशेषकरून सुटीत, या मैदानात नाहीतर देवळात खेळत असत. मुलं बारा-तेरा वर्षांची होईपर्यंत तार्इंकडे राहत. नंतर ती एकटी आपापल्या घरी राहू शकत, तेवढी जबाबदारी त्यांना कळू लागे.
आज तार्इंकडे राहणार्‍या मुलांची मुलं पाळणाघरात असतात, काही त्यापेक्षा मोठी झाली आहेत. तार्इंकडे राहावं लागलं म्हणून कोणत्याच मुलाला आईविषयी राग नाही की मुलांना दूर ठेवावं लागलं म्हणून आईच्या मनात अपराधाची भावना. आईने नोकरी करणं किती आवश्यक होतं, किंबहुना ती थोडीफार शिकलेली होती म्हणून तिला नोकरी मिळू तरी शकली, याची जाणीव मुलांना होती. घराची आर्थिक बाजू सांभाळायला पत्नीने काहीतरी काम करायची आवश्यकता आहे, अशी अनेक घरं होती. काही वर्षांनी अशाच एकदोघींनी पाळणाघर सुरू केले. त्यातली एक मावशी. आठ ते दहाच मुलं तिने दहा ते पंधरा वर्षांच्या काळात सांभाळली असतील. पण ती सगळी आजही मावशीच्या प्रेमात आहेत. मावशीच्या हातची अमृततुल्य आमटी चाखायला आजही आतुर आहेत. आपल्या मुलांना ती मावशीकडे घेऊन येतात आणि तिच्याशी गप्पा मारता मारता भूतकाळात सैर करून येतात.

पुढील स्लाइड्‍सव वाचा सविस्तर लेख ...

(mrinmayee.r@dainikbhaskargroup.com)