आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभ दिपावली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागच्या दीपावली विशेषांकातील कथांना तुमचा छान प्रतिसाद मिळाल्याने आम्हाला आणि लेखकांना प्रोत्साहन मिळालंय. यातले बरेच लेखक प्रस्थापित नाहीत, लेखनाची सुरुवात करत आहेत. त्यांच्यासाठी असा प्रतिसाद अगदी महत्त्वाचा आणि आवश्यक. आजच्या अंकात आणखी काही कथा देत आहोत, या कथा मानवी नातेसंबंधांवर टिप्पणी करणाऱ्या आहेत, आपल्यातल्या कमतरतांवर हलकेच बोट ठेवणाऱ्या आहेत, पण काहीतरी चांगलं सुचवणाऱ्याही आहेत. त्याही तुम्हाला आवडतील, याची खात्री वाटतेय.

पुढच्या चार दिवसांत मस्त फराळावर ताव मारा (त्याआधी घरी फराळाचे पदार्थ करणाऱ्या व्यक्तीला हातभारही लावा). कुटुंबीय/नातलग/शेजारी/मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवा. जे लांब असतील त्यांच्याशी फोनवरनं गप्पा मारा.

दारासमोर, जिथे जागा मिळेल तिथे रांगोळी काढा, कंदील लावा, पणत्या लावा, दिवाळी अंक वाचा.  पुढचे अनेक दिवस पुरेल इतकी ऊर्जा या उत्सवाच्या निमित्ताने गोळा करा व साठवून ठेवा. सर्व वाचक मित्रमैत्रिणींना दीपावलीच्या भरभरून शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि समाधान घेऊन येवो.

- मृण्मयी रानडे, मुंबई, mrinmayee.r@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...