Home »Magazine »Madhurima» Mrinmayee Ranade Writes About Not-To-Do List

हे नाही करायचंय

आपल्यापैकी अनेकांना रोजच्या कामांची यादी करून त्यानुसार कामं पार पाडायची सवय असते. कित्येक जण असेही असतात, जे यादी करतात

मृण्मयी रानडे, मुंबई | Sep 26, 2017, 03:00 AM IST

  • हे नाही करायचंय
आपल्यापैकी अनेकांना रोजच्या कामांची यादी करून त्यानुसार कामं पार पाडायची सवय असते. कित्येक जण असेही असतात, जे यादी करतात, पण त्यातली कामं सगळीच पार पाडतात असं नाही. अनेक जण अर्थात असेही, जे यादी न करताही कामं संपवतात. पण दिवस संपताना यादीवर नजर टाकल्यावर लक्षात येतं, बरीच कामं झालीच नाहीयेत, असा अनुभव जे यादी करतात, त्यांना अनेकदा आला असेल. कामं न हाेण्यामागे त्यांचा दोष असतो असं नाही, इतरही काही कारणं असू शकतात. पण लक्षात काय राहतं की, यादीतली कामं बाकी आहेत. आणि याचा तणाव त्यांच्यावर येतो. किंवा, सकाळीसकाळी ती यादी पाहिल्यावरही ताण येऊ शकतो. कारण यादीत अशा अनेक गोष्टी असू शकतात, ज्या आपल्याला मनापासून करायच्या नसतात, ज्यांच्या आठवणीनेही मनावर प्रचंड ताण येतो, त्यांच्यापासून पळून जावंसं वाटतं.
यावर उपाय काय?
काही व्यक्तींनी यावर मार्ग काढलाय.
त्या यादी करतातच. पण नकाे असलेल्या, न करायच्या गोष्टींची.
ही यादी करता करताच लक्षात येतं की, आपल्याला अनेक छोट्याछोट्या गोष्टी अप्रिय असतात, नकोशा असतात. आणि त्यांचं सावट दिवसावर पडलेलं असतं. काम करायलाच हवीत, त्याशिवाय घर चालणार नाही, आॅफिस चालणार नाही. पण काही गोष्टी आपण नाही केल्या तर करायलाच हवीत ती कामं नीट पार पडतात. म्हणजेच आपला प्राधान्यक्रम नीट ठरवायला हवा. काही गोष्टी असतात ज्या आपण टाळू शकतो, किंवा दुसऱ्या कोणावर त्याची जबाबदारी टाकू शकतो. अनेकदा आपणच ते करायला हवं, इतर कोणाला ते नीट नाही जमणार, अशी काहीशी भावना आपल्यात असते. ती दूर ठेवून दुसरी व्यक्ती जसं ते काम करेल, ते स्वीकारायची तयारी ठेवायला हवी. आपण आपला वेळ वायाही घालवायचा नाही, आपली कौशल्यं पुरेपूर वापरायची, स्वत:साठी वेळ ठेवायचाच, नकारात्मक विचारांना/गोष्टींना थारा द्यायचा नाही, अशा दिशेने आपली यादी तयार करायची. टू डू लिस्ट करतो, तशी नाॅट टू डू लिस्ट करायची, म्हणजे आयुष्य जरा सुखकर, शांत, समाधानी होईल.
तुम्ही अशी नाॅट टू डू लिस्ट केलीत, तर काय असेल त्यात? कळवणार ना आम्हाला?
mrinmayee.r@dbcorp.in

Next Article

Recommended