आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Multinatonal Compay's Monopoly On Health Production

आरोग्य उत्पादनात बहुराष्ट्रीय कंपन्यांची दादागिरी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आर्थिक सुबत्तेच्या बळावर महासत्ता बनलेले देश आपले हे स्थान अढळ राहावे म्हणून काय वाट्टेल ते करतात. प्रसंगी युद्धाची धमकी देऊन वेळ आल्यास इतर छोट्या मोठ्या देशांवर युद्ध लादले जाते. येथील राजवट उलथून टाकली जाते. हे सारे काही आपले हितसंबंध जपण्यासाठीच केले जाते. अशा प्रकारची वर्तणूक महाकाय बहुराष्ट्रीय कंपन्यांचीही असते. या मोठ्या कंपन्या आपल्याला अडचणीच्या ठरवू पाहणा-या दुस-या कंपन्यांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना त्या स्थिरावू देत नाहीत. या प्रतिस्पर्धी कंपन्यांची उत्पादने आरोग्यास हानिकारक आहेत. त्यातील अमुक अमुक द्रव्ये शरीराला अपाय करतात, अशा प्रकारचे जावईशोध या बहुराष्ट्रीय कंपन्या लावतात. लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो. या बहुराष्ट्रीय कंपन्या एवढ्या सामर्थ्यवान असतात की, त्यांच्यापुढे काही देशातील सरकारांना झुकावेच लागते. तसे झाले की आपल्याला पाहिजे तसे बदल व कायदेकानून करण्यास या कंपन्या यशस्वी होतात. भारतात औषधांचे मोठे मार्केट आहे. त्याचेही आकर्षण या कंपन्यांना आहे. आमच्याकडेही औषधे बनवणा-या ख्यातनाम कंपन्या आहेत. त्यातून निर्माण होणारी औषधे आम्ही परदेशी पाठवतो. त्याचबरोबर आयुर्वेद व इतर फॉर्मस ऑफ अल्टरनेट मेडिकल ट्रीटमेंट आमच्याकडे चांगल्यापैकी विकसित झाल्या आहेत. अ‍ॅलोपॅथी औषधाला पर्याय म्हणून ही औषधे अनेक देशांतून स्वीकारली जात आहेत.

आम्ही अनेक प्रकारची आयुर्वेदिक औषधे निर्यात करतो. मध्यंतरी काही आयुर्वेदिक औषधांमध्ये हेवी मेटल्स जास्त प्रमाणात आहेत अशी ओरड करण्यात आली. काही देशांनी ही औषधे आयात करण्यास बंदी घातली. जगातील बनावट औषधांपैकी जवळजवळ 30-35% औषधे भारतीय असतात अशा स्वरूपाचा प्रचार या मल्टिनॅशनल कंपन्या करीत आहेत. वास्तविक बनावट औषधींचा डेटा आमच्याकडेही काही प्रसिद्ध व कार्यक्षम संस्थांमध्ये जमा केला जातो. त्याच्या माहितीप्रमाणे हे प्रमाण केवळ 0.045% पेक्षाही कमी आहे. आमच्याकडेही काही राज्यातील विशेषत: केरळ व महाराष्ट्र या राज्यांत अशी औषधे आढळून आली, पण त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे काही आंतरराष्ट्रीय बंधनांमुळे अशा स्वरूपाच्या घटनांबाबत काही कारवाई करता येत नाही. रेग्युलेटरी एजन्सीची हीच अडचण आहे. आमच्या औषध कंपन्या पुरेशा सक्षम आहेत. आपण त्यांना सपोर्ट केले पाहिजे.

viccolabs@satyam.net.in