आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूळव्याधीवर वेदनारहित शस्त्रक्रिया : स्टेपलर हेमरॉयडेक्टमी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मूळव्याध म्हणजे काय?
मूळव्याध म्हणजे गुद्द्वार मार्गात असलेल्या रक्तवाहिन्यांमध्ये सूज येणे. मूळव्याधीचे मुख्य कारण आहे बद्धकोष्ठता (कॉन्स्टिपेशन). बद्धकोष्ठतेमुळे गुद्द्वार मार्गात ज्या रक्तवाहिन्या असतात त्यावर सतत दाब पडतो. मलविसर्जनाच्या वेळी जोर द्यावा लागत असल्याने त्यांना धक्का बसतो. यामुळे त्या प्रसरण पावतात. मग त्यावर सूज येते. सुजेवर आणखी दाब पडल्यावर त्या फुटतात व त्यातून रक्त येते.
मूळव्याधीची लक्षणे
मूळव्याधीची लक्षणे म्हणजे गुद्द्वाराच्या ठिकाणी खाज येणे, जळजळ होणे व मलविसर्जनाच्या वेळी लालभडक रक्तस्त्राव होणे. सुरुवातीच्या अवस्थेत मूळव्याधीचे काही प्रकारे उपाय संभाव्य आहेत. जसे- आहारात रसयुक्त फळे व पालेभाज्यांचा जास्त प्रमाणात वापर, इंजेक्शन थेरपी, ब्रॅडिंग ट्रीटमेंट, क्रायो थेरपी, इन्फ्रारेड कोगोलेशन इ. हे सर्व उपचार आजाराच्या सुरुवातीच्या काळात चालू शकतात, पण नंतरच्या अवस्थेमध्ये फायदेशीर होत नाहीत. मूळव्याध पुन्हा उद्भवतो. या अवस्थेमध्ये शस्त्रक्रिया हा एकच पर्याय राहतो. मूळव्याधीसाठी सर्वसाधारणपणे जी शस्त्रक्रिया केली जाते त्यामध्ये सूज आलेल्या नसांना बांधून कापले जाते. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर तिथे जखम होते व सूज येते. ती जखम भरून येण्यास खूप वेळ लागतो. रुग्णाला कमीत कमी 4-5 दिवस रुग्णालयात राहावे लागते. 2 ते 3 आठवडे खूप त्रास होतो.
अमेरिकेतील पद्धत आता भारतात
यासाठी आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अतिप्रगत तंत्रज्ञानाद्वारे स्टेपलर पद्धतीने मूळव्याधीवर शस्त्रक्रिया उपलब्ध झाली आहे. स्टेपलर हेमरॉयडेक्टमी या नावाने प्रचलित हे तंत्र म्हणजे मूळव्याधीच्या उपचारावरील एक अत्यंत उपयुक्त, परिणामकारक, कायमस्वरूपी व वेदनारहित इलाज आहे. स्टेपलर पद्धत म्हणजे सोप्या भाषेत याला ‘दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणे’ असे म्हणतात. अमेरिकेत स्टेपलर पद्धत खूप प्रचलित आहे. भारतातसुद्धा आता ती प्रचलित होत आहे.
स्टेपलर हेमरॉयडेक्टमी
यामध्ये प्लास्टिक गन वापरून केलेल्या या तंत्रास ‘प्रोसिजर फॉर प्रोलॅप्स अ‍ॅँड हेमरॉइड्स बाय स्टेपलर टेक्निक (पीपीएच)’ असेही म्हणतात. हे आॅपरेशन मूळव्याधीच्या स्लायडिंग अ‍ॅनल थेअरीवर अवलंबून आहे. मूळव्याध म्हणजे गुद्मार्गाच्या अंतर्गत नसांमध्ये सूज येऊन श्लेषमल त्वचेचे (मकस मेम्ब्रेन) खाली ढळणे होय. या शस्त्रक्रियेत एक वर्तुळाकार डायलेटर वापरून हे ढळणे पुन्हा जागेवर सरकवले जाते व अतिरिक्त श्लेषमल त्वचा नसांबरोबर काढून टाकली जाते. ही शस्त्रक्रिया एका विशिष्ट स्टेपलिंग गनद्वारे केली जाते. त्यामुळे मूळव्याधीस रक्तपुरवठा करणाºया रक्तवाहिन्याच्या शेवटच्या शाखाही बांधून टाकल्या जातात.
थोडक्यात, अतिरिक्त श्लेषमल त्वचेचा एक वर्तुळाकार भाग त्यातील फुगलेल्या रक्तवाहिन्यांसकट आपोआपच काढून टाकला जातो व उरलेला भाग आपोआपच स्टेपल केला जातो. यात गुद्द्वाराच्या 4-5 सेंटिमीटरवर आॅटोमॅटिक पद्धतीने स्टेपल मशीनने टाके पडतात. गुद्द्वाराच्या वरचा भाग कमी संवेदनशील असल्यामुळे पेशंटला आॅपरेशननंतर त्रास होत नाही.
यासाठी जी स्टेपलर गन वापरली जाते ती पुन्हा उपयोगात येत नाही. या गनद्वारे गुद्मार्गाची पूर्ण रचना
मूळ पदावर आणली जाते. या संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान किंवा नंतरही रुग्णाला कुठल्याही तºहेच्या वेदनांना सामोरे जावे लागत नाही. या पद्धतीत गुद्द्वाराच्या ठिकाणी टाके किंवा जखम नसल्यामुळे रुग्णाला काहीही त्रास होत नाही व रुग्णाला दुसºया दिवशी रुग्णालयातून सुटी दिली जाते. रुग्ण 1-2 दिवसांतच कामावर रुजू होऊ शकतो.