आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीतामुळे बेघराला घर, कुटुंब, प्रतिष्ठाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोनाल्डचा व्हिडिओ आणि मुलाखत डोनीला दत्तक घेणाऱ्या कौटुंबिक मित्राने पाहिला. त्यांनी मुलाखत छापणाऱ्या वृत्तपत्राला माहिती दिली. वृत्तपत्राने व्हिडिओ चॅटद्वारे डोनाल्ड आणि डोनी यांचा संवाद घडवून आणला. डोनी म्हणाला, माझे वडील अप्रतिम पियानो वाजवतात. पुनर्वसन केंद्रात जात आहे. कोर्स पूर्ण केल्यानंतर डोनीला आपले करण्यास सक्षम होईल, असे डोनाल्ड यांनी सांगितले.
डोनाल्ड सारोसोटा शहरात रस्त्याच्या कडेला पियानो वाजवत होते. त्यांची बोटे पियानोवर फिरतात तोपर्यंत लोक जागचे हलत नाहीत. दोन आठवड्यांपूर्वी डोनाल्डने "कम सेल अवे'ची धून वाजवली तेव्हा एका प्रेक्षकाने त्याचे ध्वनिमुद्रण केले आणि यूट्यूबवर पोस्ट केले. व्हिडिओ व्हायरल झाला आणि डोनाल्डची रॉकस्टार म्हणून वाहवा झाली. लोकांनी त्यांच्यासाठी एका घराची व्यवस्था केली आणि २५ लाख रुपये जमा केले.

फ्लोरिडा | संगीतानेडोनाल्डकडून सर्वकाही हिसकावून घेतले होते. त्याचा मुलगा आणि पत्नीही दुरावली. त्याच्यावर ओढवलेल्या प्रसंगामुळे त्याला बेघर व्हावे लागले. मात्र, याच संगीताने त्याला पुन्हा एकदा सर्वकाही परत मिळवून दिले. १५ वर्षांनंतर डोनाल्डने व्हिडिओ चॅटद्वारे मुलगा डोनीशी संवाद साधला. महाविद्यालयाने त्याला संगीताची पदवीही बहाल केली. घर मिळाले अणि नव्याने आयुष्य जगण्यासाठी लाखो रुपयेही.
डोनाल्ड यांची कथा त्यांच्याच तोंडून
मीयूएस मेरीन कॉर्प बँडमध्ये सनई वाजवत होतो. संगीत शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी मी नोकरी सोडली. महाविद्यालयात प्रवेश घेतला. तीन सेमिस्टर पूर्ण केले. अनेक वाद्ये शिकलो. मात्र, पैस नसल्यामुळे कॉलेज सुटले. पदवी नसल्यामुळे संगीत शिक्षकाची नोकरी मिळाली नाही. घर चालवण्यासाठी लहान-मोठे काम करू लागलो. मद्य आणि अमली पदार्थाचे व्यसन लागले आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी माझ्याकडून मुलगा हिसकावून नेला. पत्नीने आत्महत्या केली आणि मी बेघर झालो. वेड्यासारखा इकडे-तिकडे भटकत राहिलो. मात्र, संगीतावरचे प्रेम कमी झाले नाही. आता १५ वर्षांनंतर काळ बदलला आहे. मला माझा मुलगा, घर आणि आनंद परत मिळाला आहे.
पियानो व्हिडिओ व्हायरल