आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Kulathe About, Migraine Treatment, Niramay, Health

मायग्रेनमधून 15 दिवसांत मुक्तता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी दोन वर्षांपासून मायग्रेनच्या आजाराने त्रस्त होतो. दर 4 - 5 दिवसांनी माझे अर्धे डोके दुखत असे. सुरुवातीला डोळ्यासमोर काजवे चमकल्यासारखे वाटत असे. त्यानंतर तीव्र डोकेदुखी होत असे. डोते दुखत असताना प्रकाश किंवा मोठा आवाज अजिबात सहन होत नसे. एकदा डोके दुखण्यास सुरुवात झाली की दुसरे काहीही सूचत नसे. गोळ्या घेऊनही फारसा फरक पडत नव्हता. या त्रासासाठी अ‍ॅलोपॅथीच्या एक तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवले. त्यांनी मायग्रेन, असे निदान केले. जेव्हा डोके दुखेल तेव्हा एक गोळी घेऊन झोपून राहणे एकढाच यावर उपचार असल्याचे सांगितले. ती गोळी घेऊन डोकेदुखी कमी होत होती. परंतु 4 - 5 पुन्हा डोके दुखु लागे आणि पुन्हा गोळी घ्यावी लागत होती. ती गोळी खाऊन कंटाळल्याने मी इतर पॅथीची औषधे घेण्याचे ठरवले. माझ्या एका मित्राची ट्रिटमेंट (उपचार) शहरातील एका आयुर्वेद तज्ज्ञाकडे सुरु होती. त्यांना चांगला फरक असल्याने मी सुध्दा औरंगाबादेतील त्या आयुर्वेदीक तज्ज्ञाकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्या डॉक्टरांनी माझी व्यवस्थित तपासणी करून या त्रासासाठी पंचकर्माद्वारे पूर्णपणे बरे होणे शक्य आहे असा विश्वास दिला. नंतर त्यांनी विशिष्ट औषधांनी सिद्ध तेलाने नस्यकर्म 7 दिवस केले आणि जोडीलाच 15 दिवसांची औषधी दिली. या 15 दिवसांतच मला खूप फरक जाणवला. डोकेदुखी तर पूर्णपणे थांबली. शहरातील त्या आयुर्वेदीक डॉक्टरांनी 2 - 3 महिने औषध द्यावे लागेल, असे सांगितले होते. परंतु केवळ 15 दिवसांतच माझा त्रास पूर्णपणे थांबला ते बर झाला. आज या गोष्टीला 7 महिने झाले तरी मला डोकेदुखीचा कोणताही त्रास नाही. 2 वर्षापासूनचा त्रास फक्त 15 दिवसांत बरा झाला. याचे मलाही आश्चर्य वाटले. त्या औरंगाबाद शहरातील आयुर्वेदिक डॉक्टरांचे मी दिव्य मराठी, निरामय पानाच्या माध्यमातून आभार मानतो.
(मो. 9421304179)