आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Defence Acadamy And Navel Acadamy Exmination 2013

राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमी परीक्षा : 2013

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमीमध्ये प्रवेश देऊन त्याद्वारा सैन्यदलात प्रवेश देण्यासाठी खालीलप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
*जागांची संख्या व तपशील : या योजनेअंतर्गत एकूण उपलब्ध जागांची संख्या 355 आहे. यामध्ये राष्ट्रीय संरक्षण अकादमीअंतर्गत सैन्यदलाच्या 195, नौदलाच्या 39 तर हवाई दलाच्या 66 जागा व नौदल अकादमीच्या 55 जागांचा समावेश आहे.
*आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार खालीलप्रमाणे पात्रताधारक असावेत.
*राष्ट्रीय संरक्षण अकादमी : उमेदवार बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत.
*नौदल अकादमी : उमेदवारांनी बारावीची परीक्षा गणित व भौतिकशास्त्र या विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी.
*विशेष सूचना : अर्जदार विद्यार्थी वरील पात्रता परीक्षेला बसणारे असतील तरीसुद्धा ते अर्ज करण्यास पात्र आहेत. मात्र ते शारीरिकदृष्ट्या सक्षम असायला हवेत.
*वयोमर्यादा : अर्जदारांचा जन्म 2 जानेवारी 1995 ते 1 जुलै 1997च्या दरम्यान झालेला असावा.
*निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर 14 एप्रिल 2013 रोजी घेण्यात येईल. मुंबई व नागपूर या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल. लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुण मिळवणा-या उमेदवारांना मुलाखत व शारीरिक क्षमता पात्रतेसठी बोलावण्यात येऊन त्याद्वारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
*अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क 100 रु. रोखीने स्टेट बँक ऑ फ इंडियाच्या कुठल्याही शाखेत रोखीने भरावे.
*अधिक माहिती व तपशील : अर्जाचा नमुना इतर तपशील व माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 22 ते 28 डिसेंबर 2012 च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पहावी किंवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
*अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsconlinc.nic.in या संकेतस्थळावर पाठवण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2013.