आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Institute Of Food Technology Syllabus, Divya Education

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजीचे अभ्यासक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी अँटरेप्रन्युअरशिप अ‍ॅण्ड मॅनेजमेंट, सोनपत येथे उपलब्ध असणार्‍या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत अहेत.

> बीटेक- पदवी अभ्यासक्रम : चारवर्षीय पदवी अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागा 180.

> आवश्यक पात्रता : अर्जदारांनी 10+2 अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, संगणक विज्ञान, जीवशास्त्र यासारख्या विषयांसह व कमीत कमी 50% गुण घेऊन उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय जेईई मेन 2014 ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.

> एमटेक - पदव्युत्तर अभ्यासक्रम : दोनवर्षीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी एकूण उपलब्ध जागांची संख्या 90.

> आवश्यक पात्रता : अर्जदारांनी फूड टेक्नॉलॉजी वा संबंधित विषयातील पदवी परीक्षा कमीत कमी 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय ‘गेट’ प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.

> अर्ज पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2014.

> निवड पद्धती : पात्रताधारक उमेदवारांना त्यांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे संबंधित अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.

> अभ्यासक्रमासाठी भरावयाचे शुल्क : अभ्यासक्रमासाठी भरावयाचे शुल्क म्हणून 250 रु. संगणकीय पद्धतीने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजीच्या www.niftech.ac.in या संकेतस्थळावर भरणे आवश्यक आहे.

> अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी दूरध्वनी क्र. 0130-2281041 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.