आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Power Training Institute Admission, Divya Education

नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे विशेष अभ्यासक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली येथे उपलब्ध असणार्‍या खालील पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश उपलब्ध आहेत-

> थर्मल पॉवर प्लँट इंजिनिअरिंगमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम : अर्जदारांनी मेकॅनिकल वा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेली असावी.

> पॉवर ट्रान्समिशन अ‍ॅण्ड डिस्ट्रीब्युशन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम : उमेदवारांनी इलेक्ट्रिकल, पॉवर, इलेक्ट्रिकल वा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमधील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

> निवड पद्धती : अर्जदारांची संबंधित पात्रता परीक्षेतील गुणांच्या टक्केवारीच्या आधारे त्यांना समूहचर्चेसाठी बोलाविण्यात येऊन त्यानुसार संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना इन्स्टिट्यूटतर्फे वसतिगृहाची सोय उपलब्ध करून दिली जाईल.

> अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास 800 रु.चा एनपीटीआय, बद्रपूरच्या नावे असणारा व नवी दिल्ली येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह इन्स्टिट्यूटच्या कार्यालयात पाठवावा.

> अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, नवी दिल्लीच्या दूरध्वनी क्र. 011-26940722 वर संपर्क साधावा अथवा इन्स्टिट्यूटच्या www.upti.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

>अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले प्रवेशअर्ज दि प्रिंसिपल डायरेक्टर, नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, बद्रपूर, नवी दिल्ली 110044 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट 2014.