आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संताचे विचार सर्वत्र पेरण्याची गरज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ज्ञानदेव तुकारामाला ग्रंथातून मुक्त करून सर्वत्र पेरण्याची खरी गरज होती. महारा ष्‍ट्रा ची समृद्ध सांस्कृतिक,परंपरा लक्षात घेऊन उच्चतर ध्येयानं नवी पावलं टाकणं वास्तविकच होतं. छत्रपती शिवाजीराजे, फुले, आंबेडकरांना स्मारकांच्या तुरुंगातून मुक्त करण्याचा सर्वत्र जागर व्हावा. न्या. रानडे, लोकमान्य टिळक, ना. गोखले, आगरकर, छत्रपती शाहू महाराज, महर्षी शिंदे, महर्षी कर्वे, स्वातंत्र्यवीर सावरकर, कर्मवीर अण्णा, लक्ष्मणराव किर्लोस्कर, यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशी या उत्तुंग समाजधुरिणांनी या रा ष्‍ट्रा चा मजबूत पाया घातल्यावर महाराष्‍ट्रा ची मराठमोळी इमारत आज उभी आहे.

विचारांचं घट्ट मुंडासं, हातात भविष्याचा रोख धरणारी काठी असल्यावर वर्तमानाचा घाट चढता येतो. काळाची गरज ओळखून त्यांनी नवे नवे उपक्रम राबवले, नव्हे आपल्या शेतकरी समाजापर्यंत नेऊन पोहोचवले, हे त्यांचं एकनंबरी वैशिष्ट्य होतं. माणूसपणाचे निरीक्षण करण्यात ते खरेच पटाईत होते. कष्टाची सवय असलेली माणसं त्यांना भलतीच प्यारी होती. वेगळ्या वाटेनं जाणारा हा कलंदर शेतकरी. खरोखरीच तो बाणा निराळा होता. सहकार हेच त्यांचं जीवनकार्य झालेलं. त्यांची एकमेव मालमत्ता म्हणजे सहकार क्षेत्र होय. कारखाना उभा केला खरा, पण त्या भागात रस्त्यांची सोय नव्हती.उसाच्या वाहतुकीकरिता रस्त्यांची नितांत निकड होती. कच्चे खाचखळगे असणारे रस्ते पक्क्या स्वरूपात करणे अगत्याचे होते. सर्व शेतक-यांचे सहकार्य घेऊन केन-सेस फंडातून प्रमुख पक्के रस्ते तयार केले. कारखान्याचा परिसर ओसाड,उघडा होता. वन महोत्सवाचा कार्यक्रम हाती धरून झाडे लावण्याचा उपक्रम नेटाने राबवला.