आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सास भी कभी बहू थी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेमविवाह असो की, ठरवून केलेला, लग्न म्हणजे दोन जिवांचा मेळ असतो. तारेवरची कसरत असते. अशा वेळी मुलामुलीच्या खुशीत आपण आपली खुशी मानली तर काय हरकत आहे. आज त्यांना आपली गरज आहे, उद्या आपल्याला त्यांची गरज असेल, असा विचार केला तर नजारा कुछ और होगा. मुलगा व मुलगी शारीरिक, मानसिकरित्या लग्नासाठी तयार असतात, पणआपण मुलाचे आईवडील या नात्याने लग्नासाठी मानसिकरित्या तयार असतो का, तयारी करतो का?
 
मग थोडा या दृष्टीने विचार करायला काय हरकत आहे. नवीन नवरी येणार तिचे प्रेमाने, सन्मानाने स्वागत करायचे आहेच. पण नवीन व्यक्तीचे आचारविचार वेगळे, जडणघडण वेगळी असणार, त्यामुळे ती घरी आल्यावर तिला आधी आपल्याला आपलेसे करावे लागेल, जेणेकरून तिला घर आपले वाटेल. इतके मोठेपण कुटूंबातल्या मोठ्या माणसाला अाधी दाखवावे लागेल. आपण आपल्याच विचारावर अडून राहिलो तर दुसरा गुदमरून जाईल! हल्ली लग्न झाल्याच्या एकदोन वर्षांतच घटस्फोट, आत्महत्या घडतात. या परिस्थितीवर काहीतरी सुवर्णमध्य साधावाच लागेल. काही तुझे सांग, काही माझे ऐक, हे धोरण असावे. ज्या घरून मुलगी आलेली असते त्या घरच्या पध्दती वेगळ्या, खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या. त्यामुळे तिला जुळवून घ्यायला वेळ लागेल. ती तिचे घरदार सोडून आलेली असते, अशा वेळी तिला तुमच्या मायेची व प्रेमाची गरज असते.  तिला थोडा वेळ द्या. तिला तुम्ही आपल्यात सामावून घेतले तर ती तुमची होईल. आताच्या युगात नोकरी, मुलांचा अभ्यास, घर सांभाळणे ही सर्व तारेवरची कसरत आहे. कोणतीही गोष्ट लादून तर होत नाही, सगळ्याला इच्छा असावी लागते. आणि इच्छा प्रेमातून निर्माण होते. म्हणून म्हणते मैत्रिणींनो,
नात्याला हवा आपुलकीचा भाव,
नात्याला नको नुसतं नाव.
नातं कसं हवं?
मनातून मनाला जपणारं,
प्रेमाचं, ऋणानुबंध जपणारं, हवंहवंसं वाटणारं.
neetatijare444@gmail.com
बातम्या आणखी आहेत...